आपलेच दात आणि...
एक विचित्र विषय आणि समस्या मांडत आहे, माझ्या बोलण्याचा कृपया कुणीही विपर्यास करून घेऊ नये कारण हा धागा मी तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी अजिबात काढलेला नाही तर कोणाला असे अनुभवले असतील तर त्यांनी अश्या प्रसंगी काय केले हे जाणून घेणे हा एकच या धाग्याचा हेतू.
समस्या अशी आहे कि माझा एक मित्र आहे ज्याने तीन वर्षांपूर्वी लग्न केलं. तो मुंबईच्या एका उपनगरात राहात होता एका चाळीतली वन रूम किचन खोली होती ती काही दिवसांनी त्याची आई त्यांच्याकडे राहायला आली आणि तिचं विक्षिप्त वागणं सुरु झालं. हे नवदाम्पत्य दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचं अमी आईसाहेब घरी दिवसभर मस्त झोप घ्यायच्या. पण समस्या त्यांच्या झोपण्याची नाहीये, ती आहे रात्रीच्या जगण्याची. आईसाहेब रात्रभर झोपत नव्हत्या. आणि सतत काहीतरी धडपड करत असायच्या. उद्देश एकच- या दोघांना एकत्र येऊ न देणे. आधी या दोघांना काही कळले नाही पण हे प्रकरण चालूच राहिले जेव्हा त्याने चाळीतली खोली सोडून एक वन बेड रूम किचन वाला फ्लॅट भाड्याने घेतला. आता आईसाहेबांची अस्वस्थता वाढली होती कारण घर चाळीच्या मानाने मोठे असल्याने त्यांची उपद्रवक्षमता कमी झाली. पण हार मनातील त्या आईसाहेब कसल्या, त्यांनी उपद्व्याप तीव्र केले जसे कि, रात्री पुन्हा पुन्हा पाणी पिण्यासाठी उठणे, वारंवार लघुशंकेला जाणे, उगीचच मित्राला हाक मारणे, किचनमधली भांडी पाडणे आणि अजून काहीबाही... बरं आईला हे सगळं आवरतं घ्यायला कसं सांगायचं म्हणत दोघे नवरा बायको मूग गिळून गप्प.
एवढं सगळं करूनही आईसाहेबांच्या कानांवर अचानक एक दिवशी बातमी धडकली कि सुनबाई गरोदर आहे. आणि आभाळ कोसळलं. आईसाहेबांना आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास की हे गरोदरपण आपल्या मुलाबरोबरच्या मिलनाने झालं असेल हे मान्य करायला त्या तयार नाहीत. आणि त्यांनी सुंबाईच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. चक्क बिल्डिंगच्या बाहेर येऊन तमाशे केले. आता तिच्या सुनबाईला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितलंय आणि आईसाहेबांनी घरकामाला असहकार सुरु केलाय, त्याहून महत्वाचे कि ती कधी सुनबाईंवर हात उचलेल ते सांगता येत नाही. दिवसभर हि जीव मुठीत घेऊन राहते. या समस्येवर आता काय करावे या चिंतेने आम्हाला ग्रासले आहे कारण आईसाहेब हार मानायला तयार नाहीत.
आता तुम्ही म्हणाल कि एखाद्या व्यक्तीचं वागणं असं असू शकते पण खरी मेख पुढे आहे,
आताच एका ओळखीच्या मुलाचे लग्न झाले आणि त्याची बायको माझ्या बायकोची जिवलग मैत्रीण आहे. आणि लग्नानंतर तिच्या सासूच्या वागण्यात तोच विक्षिप्तपणा यायला लागलाय. त्याच्या घरी देखील 'रात्रीस खेळ चाले' अशी परिस्थिती.
आता या दोन्ही प्रकरणात खालील बाबी तंतोतंत जुळतात:
प्रेम विवाह.
प्रेमविवाहाला घरून झालेला विरोध.
दोघांच्या आईचे वैधव्य.
दोघीही सुना तोंड दाबून बुक्यांचा मर दिला तरी गुपचूप सहन करतील अश्या आहेत(अजून तरी).
आणि आई कशीही वागली तरी दोघेही मित्र त्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाहीत. तेच त्यांचे आधार आहेत.
हा धागा काहींना मनोरंजक वाटेल कदाचित(काही अंशी आहे ही) पण ही दोन्ही प्रकरणे गंभीरही आहेत कारण दिवसभर दोन्ही सुना त्यांच्या सासवांच्या हवाली असतात.
या अश्या वागण्यामागे नक्की काय कारण असावे आणि यावर काय उपाय करता येऊ शकतात याची जर कोणा जाणकाराला माहिती असेल तर कृपया कळवावी.
💬 प्रतिसाद
(56)
स
सच्चिदानंद
Sun, 06/04/2017 - 03:30
नवीन
अहो, कारण तुम्ही अजूनही पुरुषप्रधान व्यवस्थेप्रमाणे विचार करताय. सोच को बदलो जरा आनि मग देखो.
अर्थात, त्यावेळी बर्याच मुलांना त्यांच्या माहेरी गेल्यावर असा प्रश्न पडेल कदाचित. ;)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 06/04/2017 - 10:49
नवीन
मातृसत्ताक की पितृसत्ताक असा फिक्स्ड पॅटर्न वापरण्यापेक्षा, दोघांनी परस्पर संमतीनं जो योग्य वाटेल तो पॅटर्न आणि त्यातही कालानुरुप फ्लेक्सिबिलिटी ठेवली तर ती जास्त योग्य होईल.
तस्मात, मातृसत्ताक हा 'मुळाशीच घाव ' वगैरे वाटत नाही. वरील उदाहरणात तर आईश्री विडो आहेत. त्या एकट्या किती वेळ विंडोतून बाहेरची मजा बघणार ? मला एकटीला करमत नाही म्हणून त्या सूनबाईंच्या घरी मुक्कामाला आल्या तर एका ऐवजी दोन घरात राडा सुरु होईल.
थोडक्यात, वेगळा विचार म्हणून मातृसत्ताक प्रयोग करायला प्रॉब्लम नाही पण ते धाग्यातल्या प्रश्नाला उत्तर नाही.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 06/02/2017 - 19:33
नवीन
:O
अवघडे.. नवराबायकोनी शिस्तीत वेगळा संसार उभा करावा. केसरी, वीणा वर्ल्डच्या टूरला वरचेवर आईसाहेबांना पाठवीत जावे.. सणासुदीला आपले आईसाहेबांकडे जाऊन चार दिवस पूर्ण त्यांच्या मनासारखे वागावे. सुनांनी कितीही वाईट वाटले तरी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन राहावे.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Sat, 06/03/2017 - 18:52
नवीन
कठीण परिस्थिती आहे खरी. मुलगा आणि सुनेने स्पष्टपणे आईला फक्त एकदा समजावून सांगावे आणि तरीही न ऐकल्यास (न ऐकण्याची शक्यता जास्त आहे) तिची वेगळी सोय करावी. आईची वेगळी सोय करताना 'जग काय म्हणेल' असली बिनकामाची फालतू विचारणा डोक्यात अजिबात आणू नये. जग काही म्हणाले तरी आपल्या अंगाला भोके पडत नाहीत हे लक्षात ठेवावे.
- Log in or register to post comments
द
दशानन
Sat, 06/03/2017 - 19:10
नवीन
मी जाती बाहेर प्रेम विवाह केला, अगदी जगाची दोन टोकं म्हणजे माझी आई व बायको! जैन असल्याने आम्ही शाकाहारी व बायको आगरी असल्याने फक्त नो शाकाहारी! शहाणंपणा केला व सर्वात आधी मी वेगळी चूल मांडली, लग्न झाल्या झाल्या. पण नवीन घर देखील जवळच अगदी हाक पोचेल एवढ्या अंतरावर. पण त्या आधी आईला तिचा व्यवसाय सुरू करून दिला होता त्यामुळे तसा काही त्रास नाही. आता मुलगी झाली आहे दिवसभर आज्जीकडे व रात्री आमच्याकडे. ना तिला त्रास ना आम्हाला.
मोकळ्या हाताला काम द्या, भले राम नामची मणीमाळ द्या, काही त्रास होणार नाही. बाकी प्रत्येक घरात अडचणी वेगळ्या, वेगळे स्वभाव, हे असतेच, जमेल तेवढे सगळ्यांना सोबत घेऊन आंनद घ्यावा! हाच सल्ला.
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
Sun, 06/04/2017 - 09:47
नवीन
आंतरजातीय विवाह असूनही माझ्या आई बाबांनी उशिरा का होईना पण आम्हाला सकारात्मकतेने स्वीकारले, आई आणि बायकोचे नाते तर माय लेकीसारखे आहे. आम्ही आजही वेगळेच राहतो पण हाकेच्या अंतरावर. कित्येक वेळा जर आम्ही खूप बिझी असलो तर आई दोघांसाठी डबे पाठवते. आणि आमच्या छोट्याश्या घरातही आईबाबा कधीही असले वागले नाहीत.
मित्राच्या बाबतीत हे घडताना त्यामुळेच कदाचित जास्त सलते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2