Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लाल दिवा . . . . . .

म — माम्लेदारचा पन्खा, Mon, 05/29/2017 - 19:23
होय मी लाल दिवा बोलतोय . . . . . . माझं मन आज पहिल्यांदाच मांडतोय . . . . . मी तोच ज्याची शान आगळीच होती . . . प्रतिष्ठेची एक खूण म्हणून मजा वेगळीच होती . . . दुतर्फा रस्ते रिकामे व्हायचे, कित्येकजण दर्शनासाठी तिष्ठायचे . . "टोल"वाटोलवी म्हणजे काय ते तर मला कधीही नाही समजायचे . . . . गाडीवर असता विराजमान . . . पाहिले फक्त जोडलेले हात अन् झुकलेली मान . . . . माझ्या अस्तित्वाने गाडीतले व्हायचे माजोरी . . . भरतच राहिले ते आपापली तिजोरी . . . जनतेच्या पैशाने जनतेचेच प्रश्न सोडवायचे . . . . पैसे मिळायचे साहेबांना पण प्रश्न तसेच रहायचे . . . . आजूबाजूला कायम लवाजमा . . . आतल्या साहेबांना नव्हती कधीच कसली तमा . . . मी पाहिल्यात कौतुकयुक्त हेटाळणीच्या नजरा आणि आशाळभूतही . . . . .साहेब बदलत राहिले पण मला कधी पर्यायच उरला नाही . . . दिसत होतं सगळं पण काहीच नाही बोलायचं. . . . फटफट्यांच्या कानठळ्यात मग सगळं विसरून जायचं . . . जाईन तिथे सन्मान . . . . मागाहून यथेच्छ अपमान . . . सवय झाली सगळ्यांची नंतर ,काम केलं गपगुमान . . . लालबत्तीच्या बाईची माडी अन लाल दिव्याच्या साहेबांची गाडी . . . . एकदा मागे लागले की पळता भुई थोडी . . . . एक मे ला आला अध्यादेश . . . . माझ्या दर्शनाला कायमचा पारखा झाला देश . . . . एक लाल कहाणी संपली अचानक अशी . . . . . जनता म्हणे आणली अधिक जवळ साहेबांपाशी . . . आता काम होतंय की रेंगाळतंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल . . . पहायचं आता तुम्ही कारण माझी नजर तिथे नसेल !

प्रतिक्रिया द्या
1974 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
प्रचेतस Tue, 05/30/2017 - 05:18 नवीन
:) ह्या कवितेमुळे पूर्वी गाजलेल्या मी बोर्ड बोलतोय... ह्या गुर्जी कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा