गावाकडच्या मावळतीचे रंग बिलोरी
गावाकडच्या मावळतीचे
…….रंग बिलोरी
प्रसन्न पिवळे, गडद गुलाबी
निवांत निळसर, कबरे करडे
पाहून निवती माझे डोळे
…....निब्बर शहरी
प्रसन्न पिवळ्या संध्याकाळी
खेळ अ॑गणी रंगुनी जावा
दावण तोडुन, आचळ सोडुन
....अचपळ गोऱ्हा
.....पिऊन वारा....
उधळत जावा
गडद गुलाबी संध्याकाळी
शुक्र जरासा तेजाळावा
उडता उडता पुन्हा थव्याची
.........नक्षी मोडुन......
.........चुकार पक्षी......
उतरून यावा
निवांत निळसर संध्याकाळी
फड गप्पांचा मस्त जमावा
सळसळ रोखून वृद्ध वडाने
........टाळीसाठी........
.......पारंबीला.......
झोका द्यावा
कबऱ्या करड्या संध्याकाळी
धूसर ढग ओथंबुन यावा
पायतळीच्या वाटेवरचा
.......भिरभिरणारा.......
........एक काजवा.......
लखलख व्हावा
💬 प्रतिसाद
(33)
स
संजय क्षीरसागर
Tue, 05/30/2017 - 11:27
नवीन
.
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 05/30/2017 - 11:46
नवीन
छान कविता. आकृतिबंधदेखील आशयाइतकाच सुंदर आहे.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 05/30/2017 - 14:11
नवीन
फार सुरेख जमलीय कविता. अर्थपूर्ण, लयबद्ध आणि अतिशय प्रसन्न.
पहिल्या कडव्यात काही रंग छटान्चा उल्लेख करून नंतर एक एक करून त्या रंगावर एकेक कडवे रचलेय ही कवितेची रचना खूप आवडली.
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Tue, 06/20/2017 - 23:05
नवीन
कविता वाचतानाच,कवीच्या कुंचल्याने चितारलेले चित्र,त्यातिल विविध रंग-ढंग,त्यांच्या च्छटा ई. बारकाव्यांसह पाहू शकणारा,आपल्यातील रसिक वाचक,अत्यंत अभिनंदनीय आहे!
याआधीही,काही कवितांवर आपण दिलेल्या प्रतिसादांत ही बाब जाणवते!
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 05/30/2017 - 14:25
नवीन
जबरदस्त खुप आवडली
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 07:02
नवीन
स॑जय, एस, पद्मावति, स्पा
-आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
पुंबा
Wed, 05/31/2017 - 08:18
नवीन
झकास..
खुप खुप आवडली.
रादर मिपावरिल सर्वाधिक आवडलेल्या कवितांत ही असेल.
विलक्षण चितारलायत तो सारा माहौल तुम्ही.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 09:58
नवीन
_____/\_____
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 05/31/2017 - 11:43
नवीन
अप्रतिम!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 05/31/2017 - 12:25
नवीन
अगदी चित्र उभं केलंत. खूप आवडली कविता.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 06/21/2017 - 06:27
नवीन
+१
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Wed, 05/31/2017 - 15:37
नवीन
लयबद्धता फार आवडली, आणि कवितेचा फॉर्म तर विशेष आवडला. ज्या सहजपणे वर्णन केलेत, त्यावरून तर बाकीबाब आठवले..
अवांतर-बिलोरी म्हणजे नक्की काय?
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 16:59
नवीन
-बिलोरी = crystalline = नितळ.
-मोल्स्वर्थ च्या मराठी-इ॑ग्रजी शब्दकोषानुसार बिलोर हा शब्द पर्शिअन भाषेतून मराठीत आला आहे.
-बाकीबाबा॑च्या शब्दकळेची जातकुळीच वेगळी अन अतुलनीय !
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 05/31/2017 - 17:18
नवीन
____/\_____
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 05/31/2017 - 17:59
नवीन
खूपच छान लिहिलंय!
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Wed, 05/31/2017 - 18:49
नवीन
__/\__
कवितेचा फॉर्मॅट, आशय, तिचं चित्रस्पर्शी असणे हे सगळंच खूप जास्त आवडलय. असेच लिहिते रहा.
ह्यच्याशी सहमत!!
- Log in or register to post comments
उ
उल्का
Wed, 05/31/2017 - 18:51
नवीन
खूप आवडली.
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 05/31/2017 - 22:16
नवीन
सुरेख कविता!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 06/01/2017 - 05:42
नवीन
____/\_____ !
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 06/02/2017 - 15:29
नवीन
सुंदरच!!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 06/02/2017 - 17:02
नवीन
____/\____
- Log in or register to post comments
स
सानझरी
Sat, 06/03/2017 - 03:39
नवीन
सुरेख कविता.. खूप आवडली!!
लिहीत रहा.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sat, 06/03/2017 - 07:26
नवीन
_______/\_______
- Log in or register to post comments
म
मितान
Sat, 06/03/2017 - 13:37
नवीन
खूप आवडली !
- Log in or register to post comments
द
दशानन
Sat, 06/03/2017 - 18:25
नवीन
छान कविता, आवडली.
- Log in or register to post comments
स
स्पा
Sat, 06/03/2017 - 19:37
नवीन
परत वाचली परत आवडली
शेवट एकदम गूढसा ,:)
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sun, 06/04/2017 - 17:54
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Tue, 06/20/2017 - 22:54
नवीन
क्या बात है! क्या ब्बात है!!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 06/21/2017 - 07:04
नवीन
प्रतिसादा॑बद्दल धन्यवाद !
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
Tue, 09/26/2017 - 19:31
नवीन
अप्रतिम रे...
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 09/27/2017 - 05:52
नवीन
दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 09/27/2017 - 06:40
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 09/27/2017 - 07:07
नवीन
____/\___
- Log in or register to post comments