ग्रह व त्या॑च्या उपग्रहा॑च्या निरीक्षणासाठी कोणती दुर्बीण घ्यावी?
मी हौशी व प्राथमिक स्तरावरचा आकाश निरीक्षक आहे. मला परवडेल अशी (सुमारे १५ ते २० हजार रु. पर्य॑तची) शक्यतो भारतीय बनावटीची दुर्बीण विकत घेण्याबद्दल मिपाकरा॑कडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. आपण सुचविलेल्या दुर्बिणीतील त्रुटी / मर्यादा , उत्पादक, अ॑दाजे कि॑मत याबाबत सविस्तर माहिती दिल्यास उपयोग होईल.
खर सांगू का ? ह्या सगळ्यात शेवटी काही समाधान मिळत नाही, आपल बजेट हे शेवटी तोकड पडतच.. त्यापेक्षा हबलच्या कम्पोसिट इमेजेस पहा. पैसे पण वाचतील.. Smileसहमत. मी बर्डींग बायनाक्युलर घेताना इतका रिसर्च केला की त्या पांच सहा महिन्यातच मी घेणार होतो ते मॉडेल बंद झाले, नंतर झक मारत निम्म्या क्षमतेची दुर्बीण घ्यावी लागली. :(