कर्जमाफी करताना बोके कसे वगळायचे ?
कर्जमाफी या विषयावर दुसरी बाजू मांडताना काही जणांचे मुद्दे विचारात घ्यावेसे वाटले. त्यात दम आहे.
शासनाला आणि संपक-यांना देण्यासाठी एक प्रस्ताव तयार करायचा आहे. अगदीच कच्चा आराखड्याचा चर्चाप्रस्ताव आपणासमोर ठेवत आहे. या आराखड्याचे नेमक्या प्रस्तावात रुपांतर करण्यासाठी आलेल्या सूचनांचे स्वागत आहे.
आराखडा
अपेक्षा
१. सरसकट करमाफी करताना ज्यांना भाव पडल्याचा फटका बसलेला नाही त्यांना कर्जमाफी नको.
२. मोठे बागायतदार , ज्यांच्या जमिनी बागायती आहेत आणि वेगवेगळी पीके घेतली जातात, त्यातील एक दोन पिकाचे भाव पडले असल्यास संपूर्ण क्षेत्रासाठी घेतलेल्या कर्जाची सरसकट कर्जमाफी नको.
३. ज्यांच्या नावे कारखाने आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, ग्रामपंचायत सदस्य ते वरची पदे भूषविली आहेत, भूषवत आहेत अशा सधन व मातब्बर लोकांचा समावेश कर्जमाफीत नको
अर्हता :
कर्जमाफीसाठी अर्हता ठरवणे हा ग्रे एरिया आहे. कुणाला फटका बसला व कुणाला नाही हे ठरवणे जिकीरीचे आहे. हे कसे ठरवावे यासाठीच सूचना अपेक्षित आहेत. अर्हता निश्चित करण्यासाठी कृतीआराखडा बनवावा लागेल. त्याची कच्ची रूपरेषा खालीलप्रमाणे. प्रस्तावक या विषयात ढ आहे. फक्त कल्पना मांडतो आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबत विकलांग आहे. त्यामुळे ही बाजू माहीतगारांनी सावरावी ही विनंती.
कृती आराखडा :
१. मोदींनी किसान कार्ड आणले आहे. त्याचे स्वरूप काय आहे याची कल्पना नाही. पण या किसान कार्डाचा विकास करून प्रत्येकाचे क्षेत्र किती, त्यात कुठले पीक किती क्षेत्रात आहे याची माहिती अपडेट केली जावी.
२. बी बियाणे खरेदी करण्यासाठी किसान क्रेडीट कार्डाचा वापर व्हावा. ही कार्डे जोडली जावीत अथवा एकाच कार्डात सगळी कामे व्हावीत. यामुळे कुठले बियाणे प्रत्यक्षात कुणी किती खरेदी केले हे समजेल.
३. याचा उपयोग या वर्षी कुठले पीक किती येईल याचा अंदाज घेण्यासाठी होईल
४. बाजारात मागणीपेक्षा एखादे पीक आल्यास निर्यातीसाठी स्कोप आहे का हे पाहणारी यंत्रणा असावी जेणेकरून शासनावर हमीभावाचा बोजा पडणार नाही.
५. मागणीपेक्षा लागवड जास्त होत असल्यास पुढच्या शेतक-यांना बियाणे मिळणार नाही असा प्रोग्राम कार्डाशी संलग्न असावा. प्रथम येईल त्यास प्रथम हे तत्त्व आंतरजालाच्या मदतीने अंमलात आणावे. त्यामुळे एकाच पिकाने लागवडीचे क्षेत्र अडवून दुस-या मालाची टंचाई होते हे थांबेल.
६. कुठे अवर्षण होते, कुठे पाऊस माफक झाला , कुठे पीके वाया गेली हा डेटा कृषी खात्याने अपडेट करावा. सबसिडी अथवा कर्जमाफी करताना त्याचा वापर व्हावा.
७. यासाठी कायदा व्हावा. एकदा कर्जमाफी झाल्यानंतर पुढे किती वर्षे कर्जमाफ होणार नाही याचा सभागृहात चर्चा करून निकष निश्चित करावा. कर्जमाफीतून वगळायचे घटक याचाही समावेश कायद्यात असावा.
८. पीक विक्रीला नेताना कार्डाशिवाय खरेदी विक्री होऊ नये. पैसे रोखीने ने देता चेक अथवा ट्रान्स्फरने दिले जावेत. त्यामुळे शेतक-याचाही फायदा होईल व पारदर्शकता आल्याने नेमके किती कर्ज माफ करायचे याचा अंदाज येईल.
९. नुकसानीची निश्चिती ही प्रत्येक करण्यासाठी यंत्रणा उभारावी. तीत सरकारी अधिकारी, संस्था, व्यक्ती यांचा समावेश असावा.
१०. वरील त्योजनेत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी लूपहोल्स शोधून ती बुजवणे.
इतकाच विषय अपेक्षित आहे.
टीप : फोकस या विषयावरच राहू द्यावात ही नम्र विनंती.
तळटीपः कुणी कुणाची गाय मारली, कुणी घोडा मारला मग आम्ही कसे बरोबर हे दळण दळण्यासाठी नवा धागा काढता येईल किंवा मागणी झाल्यास काढून देईन. तिथे जे धारातिर्थी पडतील त्यांच्या येईल मिपावर दगड उभारण्यात येईल. जखमींना मोलाचे सल्ले मिळतील.
अर्धटीप : विषय बोके गाळणे इतकाच आहे. उगीच कर्जमाफीसाठी सनीताई लहाने यांच्यासारख्या समाजसेवकांनी चॅरिटी शोज करून निधी जमवावा असे सल्ले देऊ नयेत.
💬 प्रतिसाद
(66)
ख
खटासि खट
Wed, 06/07/2017 - 20:41
नवीन
आपल्या पोस्टच्या विषयानुसार जो कुणी पहिला प्रतिसाद देईल त्यास शादलबाबा येथे ओली पार्टी
- Log in or register to post comments
ज
जानु
Wed, 06/07/2017 - 22:08
नवीन
हा प्रतिसाद बोक्यांच्या संदर्भात आहे. या बोक्यांना आवरणे हा प्रश्न आहे. तसे आम्ही माळकरी त्यामुळे ओली पार्टी नकोच....
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 06/07/2017 - 22:30
नवीन
ECON १०१ दृष्टिकोनातून कर्जमाफी हा प्रकारच मुळांत "you cant get it right" प्रकारचा आहे. तरी सुद्धा लेखकाने विनंती केल्या प्रमाणे फक्त बोक्यांना कसे वगळावे ह्यावर काय पॉलिसी असू शकते ह्यावर माझे विचार खालील प्रकारचे आहेत.
खालील मुद्धे माझ्या माता प्रमाणे समस्या आहेत.
१. "बोके" हा प्रकार बायनरी नाही पण कर्ज माफी हा प्रकार सध्या बायनरी आहे.
म्हणजे आपण समजा कायदा काढला कि ज्या लोकांनी सरपंच पद भूषवले आहे त्यांना कर्ज माफी नाही. म्हणजे कुठलाही शेतकरी ह्या पुढे सरपंच व्हायला पाहणार नाही. गावाच्या दृष्टीने हे चांगले नाही. त्या शिवाय सरपंच म्हणजे सगळे निळू फुले प्रकारचेच लोक असतात असे नाही.
कुठल्याही सरकारी स्कीम मध्ये आपण बायनरी classification आणले तर एका ग्रुप मधून दुसऱ्या ग्रुप मध्ये ऊडी मारण्याची धडपड सुरु होते. ह्या धडपडीत गरजू पेक्षा राजकीय वजन असलेल्या ग्रुप ला जास्त फायदा होतो. (उदा स्वतःला मागास घोषित करण्याची चढाओढ).
समाधान: सर्व प्रथम कर्जमाफीवर एक सिलिंग ठेवावे. सरसकट माफी कुणालाच नको. कर्ज समजा X असेल तर log स्केल प्रमाणे माफी द्यावी. म्हणजे १ लाख कर्ज १००% माफ २ लाख असेल तर १.२५ लक्ष माफ आणि > ५ लाख कर्ज असेल तर जास्तीत जास्त १.५० लक्ष माफ इत्यादी.
२. कर्ज माफी कायदा अमलांत आणावा:
कर्ज माफी सध्या सरकारी लहर आणि शेतकऱ्यांची हिंसा करण्याची क्षमता ह्या वर अवलंबून आहे. आता दर वर्षी कर्ज माफी म्हणून शेतकरी बोंबलत बसतील. ह्या साठी कायदा आणून माफी कशी आणि कधी मिळू शकते हे स्पष्ट करावे म्हणजे शेतकऱ्यांना हिंसा करायला कारण कमी पडेल.
दुष्काळ, महागाई, बाजार दार इत्यादी घटक घेऊन एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया ठेवावा. म्हणजे बँक, शेतकरी आणि कर दाते ह्यांना आपल्या पैसे नक्की कुठे जाईल हे समजेल.
३. कर्ज माफी फंड
कर्ज माफी फंड निर्माण करावा आणि सर्व शेती मालावर लागू करावा. किती कर्ज माफी दिली जाऊ शकते हे ह्या फंड कडे पाहून समजू शकू. ह्याशिवाय आम्ही जेव्हा तांदूळ, साखर साठी पैसे मोजू तेंव्हा अकार्यक्षम शेत्कार्यामुळे आम्हाला नक्की किती पैश्यांचे नुकसान होत आहे हे समजेल.
शेवटी काय तर कुठल्याही अर्थव्यवस्थेंत कार्यक्षम धंदे चालू राहायला पाहिजेत आणि अकार्यक्षम असे धंदे लवकरांत लवकर बंद पडायला पाहिजेत. अकार्यक्षम अश्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कुबड्या देणे समाज आणि धरणी माता ह्यांवर अन्याय आहे,
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 06/08/2017 - 06:23
नवीन
सरपंचा बद्दलचा मुद्दा मान्य. एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला फटका बसू नये ही अपेक्षा योग्यच आहे.
दोन टर्म सरपंच होणारी व्यक्ती प्रस्थापित राजकारणी म्हणून गृहीत धरावी काय ? राजकारण हा मुख्य व्यवसाय असेल तर पाच वर्षांपेक्षा अशी पदे एखाद्याकडे राहतात.
किमान आमदारन, खासदार झालेला व्यक्ती प्रस्थापित असावा. त्याला वेतन, भत्ते आणि पेन्शन सुद्धा मिळते. त्याला अपात्र का ठरवले जाऊ नये ?
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 06/08/2017 - 06:19
नवीन
आपणा सर्वांचे आभार.
धाग्याचा विषय समजण्यास जटील नसावा अस्शी अपेक्षा आहे. विषयावर प्रतिसाद यावेत ही अपेक्षा गैर नसावी.
तंत्रज्ञानाचा वापर शेतकीसारख्या विषयात केल्यास जटील समस्यांचे सुलभीकरण होईल का असा विचर होता. त्या दृष्टीने एक समस्या निश्चित केली. कर्जमाफी करताना नाहक फायदे लाटणारे (गरज नसणारे) लोक हे रोषाचे कारण आहे. त्यावर कशी मात करता येईल असा आपला विषय होता. अल्पभूधारक शेतकरी तर अनेक प्रस्थापित राजकारणी आहेत. त्यांच्या शाळा, कॉलेजेस आहेत.
समस्या अत्यंत गुंतागुंतीची आहे. तीवर उपापयोजना कशी करावी या समस्येत रस नसल्याने हा धागा बंद करण्यात यावा ही विनंती संपादक मंडळास करतो.
(इथे अवांतर असणा-या मुद्द्यांवर जुन्या धाग्यांवर चर्चा झालेली असल्याने पुन्हा एकदा तीच उत्तरे देण्यात हंशील नाही).
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 06/08/2017 - 08:26
नवीन
फ्युचर ऑप्शन शेतमालाला लागु करा अशी मागणी वाचायला मिळते आहे. ते कसं काम करेल कोणाला कल्पना आहे काय?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 06/08/2017 - 10:38
नवीन
आडत्यांच्या माध्यमातून शेतीमालासंबंधी फ्युचर्स व्यवहार अनेक वर्षं झाली होतात. पण त्यामध्ये आणि (उदा०) सिक्युरिटीज फ्युचर मार्केटमध्ये फरक असा की सि० फ्यु० मा० मध्ये एक 'मधला कावळा' असतो. त्या मधल्या कावळ्याचं मुख्य काम म्हणजे 'काऊंटरपार्टी डिफॉल्ट रिस्क' घेणे. (समजा, कोणीतरी फ्युचर्स कॉण्ट्रॅक्ट करून मग टांगला - म्हणजे डिलिव्हरी दिली नाही - तर या मधल्या कावळ्याचं नुस्कान होतं. त्यामुळे तो ते सगळं रेग्युलेट करतो.) तर असा मधला कावळा शेती-फ्युचर्समध्ये आणावा अशी मुख्य मागणी आहे. त्याचा मुख्य फायदा म्हणजे ते मार्केट ऑर्गनाईज्ड होईल.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 06/08/2017 - 10:59
नवीन
मधला कावळा म्हणजे एक्श्चेँज राईट? MCX सारखा?
- Log in or register to post comments
अ
अभिनाम२३१२
गुरुवार, 06/08/2017 - 10:22
नवीन
मी शेतकरी विरोधात नाही पण मुळात कर्जमाफी ची गरज आहे का आणि खरच जे गरजू आहेत त्याना ती मिळेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे.....आज पर्यंत ज्यानी या शेतकर्यांचा पैशावर सत्ता मिळवली ....आणि बाजार समित्या स्वतः च्या हातात ठेवल्या तेच त्यांचा नावाने कर्जमाफीचा गळा काढत रडत आहेत....शेवटी काय नेते तुपाशी आणि शेतकरी व सामान्य माणूस उपाशी ....!!!!
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
गुरुवार, 06/08/2017 - 15:54
नवीन
गांधीजींच्या तत्त्वांना स्मरुन बोक्यांच्या सदसदविवेकबुद्धीला आवाहन करायचे की 'बा बोकोबा, तुझे पोट भरलेले असेल तर तु मनीच्या दुधावर डोळा ठेऊ नकोस. ती उपाशी आहे, तीचे पोट भरु दे".
या आवाहनाचा परिणाम व्हायला वेळ लागेल पण एक ना एक दिवस नक्की बोक्यांची सदसदविवेकबुद्धी जागृत होईल व इतरांना न्याय मिळेल.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 06/13/2017 - 14:42
नवीन
कर्जमाफी करताना बोके कसे वगळायचे ?
या चर्चेसाठी चंदू दादा साहेबांकडे गेले होते.
http://abpmajha.abplive.in/mumbai/chandrakant-patil-discussed-with-sharad-pawar-on-loan-waiver-latest-updates-417683
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 06/15/2017 - 05:32
नवीन
सर्वांचे आभार.
खरे तर पोस्ट लिहीतानाच प्रस्ताव तयार होता. त्यात सुधारणा करण्यासाठी सूचना हव्या होत्या. प्रस्ताव योग्य आणि जबाबदार व्यक्तीमार्फत शासनाकडे, सक्षम अधिका-यांकडे पोहोचला असावा ही अपेक्षा आहे. (पोहोच मिळालेली नाही. मिळते कि नाही ठाऊक नाही ). नुकताच एक शासनाचा निर्णय सोशल मीडीयातच वाचनात आला. त्याचा आणि या प्रस्तावाचा किती संबंध आहे हे कळण्यास मार्ग नाही. पण जर एक टक्का जरी वाटा असेल तर सोशल मीडीयावर लिहीलेले वाया जाते असे समजण्याचे कारण नाही असे म्हणावेसे वाटतेय.
(फोटो अपलोड नाही करता येत का ? )
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/15/2017 - 16:18
नवीन
मिपावर चित्रे टाकण्याची कृती
- Log in or register to post comments
श
शलभ
Fri, 06/16/2017 - 04:43
नवीन
लोकसत्ता वरून..
यांना कर्ज मिळणार नाही..
राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, महापालिका व पालिकांचे नगरसेवक, केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक, डॉक्टर, वकील, लेखापरीक्षक, अभियंते, व्यावसायिक, नोंदणीकृत सेवा पुरवठादार, कंत्राटदार, ठेकेदार, ज्यांच्याकडे दुकान परवाना आहे असे दुकानदार, चारचाकी वाहन असलेले मालक यांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील एखादीही व्यक्ती या संवर्गात मोडत असेल तर त्यांना १० हजारांचे कर्ज मिळणार नाही. त्यामुळे आता कर्जमाफीतूनही हे घटक पूर्णपणे वगळले जातील हे स्पष्ट झाले आहे.
हाच नियम कर्जमाफी ला पण लावला जाईल असं वाटतंय.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Sat, 01/13/2018 - 18:27
नवीन
पारदर्शक कर्जमाफीची प्रोसेस किती बोगस होती याची प्रचिती आता येत आहे.
कितीही निकर्ष लावले तरी त्यात न बसणारे सुद्धा लाभार्थी झाले आहेत. उदाहरणे अगदी डोळ्यासमोर आहेत.
एवढी नाटकं करण्याची काय गरज नव्हती.
कितीतरी असे गरजू होते ज्यांना सिस्टिम डाउन असल्यामुळे फॉर्म भरता आले नव्हते.
मोठी लाभार्थी तर कर्जमाफीची सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी ठरली.
जय हो ..!
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 01/03/2019 - 16:55
नवीन
मुळात शेतकरी कर्जबाजारी का होतो हे शोधून उपाय योजना करणे हा खरा उपचार आहे .कर्जमाफी करून रोग नष्ट होणार नाही .tyachya फायदा फक्त काही लबाड शेतकरीच घेतात आणि खऱ्या शेतकऱ्याची ती मागणी सुधा नाही .
त्यापेक्षा तीच पैसा पाणीपुरवठा,वीज,शेतापर्यंत रस्ते आणि हमी भाव ह्यासाठी वापरला तर शेतकरी स्वलंबी होईल त्याला कर्जाची पण गरज नाही
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2