Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सध्या काय वाचत आहात?

म
मुक्त विहारि
Sat, 06/10/2017 - 19:14
🗣 79 प्रतिसाद
तसे आम्ही छंदी-फंदी पण दुर्दैवाने वाचनाचे व्यसन पण असेच.घरात तशी २०००च्या आसपास पुस्तके आहेत, पण आवडलेले पुस्तक दरवेळी विकत घेणे परवडत नाही. म्हणून २ वाचनालये लावली आहेत.सगळीच पुस्तके विकत घेणे एकाच वाचनालयाला पण परवडत नसतील, असे मला वाटते. तर महत्वाचा मुद्दा असा की. आज एक मस्त पुस्तक मिळाले. पुस्तकाचे नांव : आलेख (विश्वसंस्कृतीचा) लेखिका : आशा दामले प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन , बोरीवली, फोन नंबर ०२२-२८६४५२१२, ०२२-२८६३५२२१२ ह्या प्रूथ्वीवर अगणित पुस्तके असतील, आणि मिपावर पण असंख्य वाचनव्यसनी मिपाकर असतीलच. वाचनव्यसनी मिपाकरांमध्ये एकमेकांना आवडलेल्या पुस्त्कांच्या गाभ्या बद्दल आदान-प्रदान व्हावी ह्या हेतूने हा धागा काढला आहे.
वर्गीकरण
वाचन प्रेमी

प्रतिक्रिया द्या
19585 वाचन

💬 प्रतिसाद (79)
म
मोदक Sun, 06/11/2017 - 04:16 नवीन
"नाईलकाठची मिठ्ठास कहाणी" हे एक भन्नाट पुस्तक आहे. साखरेच्या टंचाईने त्रस्त असलेल्या सुदान देशात १९८५ साली पहिलाच असा "केनाना साखर कारखाना" कसा उभा राहिला याची कहाणी आहे. या साखर कारखान्यामध्ये अकाऊंट्सचे काम बघायला गेलेल्या आणि नंतर आफ्रिकेतच उरलेले आयुष्य व्यतीत करणार्‍या गोविंद देसाई या मराठी माणसाची कथाही सोबत येतेच. आफ्रिकन लोकांना बाहेरच्यांमुळे बसलेले सांस्कृतीक धक्के... अमेरिका, युरोप, भारत, पाकिस्तान, कोरीया, बांग्लादेश, फिलीपीन्स अशा वेगवेगळ्या देशातून आलेले आणि एकत्र राहिलेले लोक आणि त्याच्या संस्कृत्यांचे एकमेकांना बसलेले धक्के असे अनेक किस्से लहान लहान लेखांच्या स्वरूपात लिहिले आहे आणि त्यातूनच कारखान्याची कथा पुढे सरकते. गोविंद देसाईंच्या पत्नीने एका मराठी गृहिणीच्या नजरेतून हा सगळा प्रवास टिपला आहे. http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=271213120428&PreviewType=ebooks
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 06/11/2017 - 04:19 नवीन
हे विश्वाचे आंगण - सुधीर जांभेकर हे ही ठीकठाक पुस्तक आहे. मराठी माणूस अमेरिकेत जातो आणि जागतिक पातळीवरचा यशस्वी आर्किटेक्ट होतो ही गाथा त्रोटक स्वरूपात मांडली आहे
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 06/11/2017 - 04:26 नवीन
जानेवारीत बुक केलेले आणि खूप गाजावाजा करून आलेले पुस्तक "तुमचा आमचा नाना" हाती पडले, सपशेल निराशा झाली. मोठमोठ्या व्यक्तींनी नाना पाटेकर वर अगदीच त्रोटक लिहिलेले लेख असे स्वरूप आहे. अक्षरशः पान दिड पानात लेख आवरते घेतले आहेत आणि सोबतीला भयाण शब्दांकन! पुस्तकात चांगले फोटो आहेत हीच एक जमेची बाजू. पण पैसे वाया गेल्याचा फील आला पुस्तकाची किंमत 800/-
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 06/11/2017 - 04:33 नवीन
आत्ता अनिल अवचटांचे कार्यमग्न हाती आहे. "कार्यरत" चे पुढचे व्हर्जन म्हणावयास हरकत नाही. नक्की वाचावे असे पुस्तक आहे. http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=090716010457&PreviewType=ebooks
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 06/11/2017 - 06:54 नवीन
यासाठी धन्यवाद. हे 'कार्यरत'चं पुढचं व्हर्जन आहे की पुढचा भाग? (म्हणजे आगोदरच्या कार्यकर्त्यांवर अपडेटेड लेख + थोडे नवीन लेख असं आहे का?) दुसरं असं की अनिल अवचट हल्ली लय पाट्या टाकतात असं मत झालं आहे. पूर्वी विडीकामगारांवर किंवा बुवाबाजीवर लेख लिहिताना जो rigour असे तो जाऊन गेली काही वर्षं ते कायच्याकाय बेंगरूळ लिहिताहेत. तसेच लेख आहेत का? की मूळ 'कार्यरत'च्या वळणावर जाणारे आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सतिश गावडे Sun, 06/11/2017 - 08:10 नवीन
दुसरं असं की अनिल अवचट हल्ली लय पाट्या टाकतात असं मत झालं आहे. पूर्वी विडीकामगारांवर किंवा बुवाबाजीवर लेख लिहिताना जो rigour असे तो जाऊन गेली काही वर्षं ते कायच्याकाय बेंगरूळ लिहिताहेत.
प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अमर विश्वास Sun, 06/11/2017 - 08:20 नवीन
दुसरं असं की अनिल अवचट हल्ली लय पाट्या टाकतात <<< पूर्वी ते "मुशाफिरी" करत होते .. त्यामुळे त्याचे लेखन प्रत्य्क्ष अनुभवांवर आधारित होते, त्याची डॉ आनंद नाडकर्णींबरोबरची गर्द वरची लेखमाला "माईलस्टोन" होती पण आता ते जुन्या आठवणींवर लहितात .. फरक पडणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मुक्त विहारि Sun, 06/11/2017 - 08:27 नवीन
श्री तुषार नातू ह्यांचे नशायात्र पुस्तक कुणी वाचले आहे का? गर्दच्या भयानक व्यसनातून श्री. तुषार नातू, फार परीश्रमाने बाहेर पडले आहेत. त्यांच्या स्वानुभवावर आधारीत पुस्तक असल्याने, "सीधी बात नो बकवास." ह्या उक्ती वर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Sun, 06/11/2017 - 13:23 नवीन
नशायात्र वाचाल आहे .. तुषार नातू हे थोपु वर सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. नुकतीच त्याच्याशी थोपु मैत्री झाली आहे. तेथे ते अनेक अनुभव शेअर करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मोदक Sun, 06/11/2017 - 19:00 नवीन
अनिल अवचटांचे सध्याचे लिखाण हा एक वादाचा मुद्दा आहे. सप्तरंग / सकाळ मध्ये लिहिलेली बालीश लेखमाला असो की वेगवेगळ्या छंदांची वेगवेगळी पुस्तके असोत.. हाती फारसे कांही लागत नाही किंवा पुस्तकांची किंमत पटत नाही. मी वर उल्लेखलेले कार्यमग्न, संभ्रम, शिकवले ज्यांनी, कोंडमारा वगैरे पुस्तके नवीन असली तरी यातील लेख पूर्वी दिवाळी अंकात लिहिलेले आहेत.. त्यामुळे जुना टच अनुभवता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अप्पा जोगळेकर Mon, 06/12/2017 - 13:53 नवीन
अनिल अवचट भारी माणूस आहे. पण त्यांची पुस्तके कंटाळवाणी असतात. त्यांचे 'अमेरिका' हे एक पुस्तक मात्र खूप आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मारवा Sun, 06/18/2017 - 02:51 नवीन
एकदा जरुर वाचावा ब्लॅाग मधील ग्रॅंड ब्युटी वरील लेखही ब्युटीफुलच हा एक तुकडा गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच. त्यातही पुण्यातल्याच', या सुनील तांब्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण तो लेखक माणूस संपूर्ण न मांडताच मध्यमवर्गीय जगणं रोम्यॅंटिक करून मांडायला जातो हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ अशा आविर्भावात उपदेशामृताचे घुटके पाजणारे अवचट मला जाम वात आणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मारवा Sun, 06/18/2017 - 02:53 नवीन
http://dnyanadadeshpande.blogspot.in/2010/10/blog-post_29.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मोदक Sun, 06/18/2017 - 11:34 नवीन
हा लेख खूपच एकांगी वाटला. पूर्वी वाचकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं होतं. पुलं आवडणारे आणि पुलं नावडणारे; आता, नवीन जगात एकतर तुम्हाला अनिल अवचट आवडतात किंवा त्यांचा कंटाळा येतो. हे वाक्य म्हणजे अगदीच अतिशयोक्ती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
आ
आदूबाळ Sun, 06/18/2017 - 22:39 नवीन
ही ब्लॉग पोस्ट आधी वाचली होती. पण माझा आक्षेप थोडा वेगळा आहे. प्रेडिक्टेबल होण्याला किंवा त्याच त्या जिलब्या परत पाडण्याला नाही. मर्जी है आप की, क्यूं की कीबोर्ड है आपका. आक्षेप आहे अनभ्यस्त लिहिण्याला. "मला एवढंच दिसलं म्हणून मी एवढंच लिहिलं" ही सोयीस्कर पळवाट काढण्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मोदक Sun, 06/18/2017 - 22:58 नवीन
अनभ्यस्त = अन+अभ्यस्त असे आहे का..? पहिल्यांदा हा शब्द सामोरा आला आहे. ("संमींक्षंक म्हंणूंनं नांव कांढांऽऽल" असा मधल्या आळीतून एक सल्ला..!) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 06/19/2017 - 10:58 नवीन
लोल. असाच अर्थ आहे 'अनभ्यस्त'चा. आल्सो नोन अ‍ॅज 'घोका आणि ओका' किंवा 'सीपीए' (कॉपी पेस्ट अ‍ॅप्रोच).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रदीप Mon, 06/19/2017 - 16:27 नवीन
अवचटांचे लिखाण अनभ्यस्त आहे, हा तुमचा आरोप त्यांच्या कुठल्या लिखाणावर आहे? सर्वच? काही ठराविक? ठराविक लिखाणाविषयी असेल, तर नेमके कुठले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 06/19/2017 - 16:44 नवीन
सगळ्या नाही. वर लिहिल्याप्रमाणे विडीकामगारांवरचा लेख (आणि "माणसं" हे एकंदर पुस्तकच), पूर्णिया, संभ्रम, कार्यरत हे आवडतात. त्यातल्या लेखनात (वर लिहिल्याप्रमाणे) रिगर जाणवतो. पण तसं हल्लीच्या लेखनात जाणवत नाही. चट्कन आठवलेली उदाहरणं म्हणजे जिऑलॉजीवरचा लेख, आणि मला वाटतं मायक्रोब्जवरचा लेख. ललित लेखनातही "स्वतःविषयी"सारख्या पुस्तकांत जाणवणारा नितळपणा जाऊन बनचुकेपणा आला आहे. अर्थात ललित लेखन अमुकच प्रकारचं असलं पाहिजे असा आग्रह धरायचा नसतो, त्यामुळे ते सोडून सोडा. हे बघा: http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=070113065558&PreviewType=ebooks जी काही चारपाच पानं वाचली ती पुरेशी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Mon, 06/19/2017 - 16:57 नवीन
चट्कन आठवलेली उदाहरणं म्हणजे जिऑलॉजीवरचा लेख, आणि मला वाटतं मायक्रोब्जवरचा लेख. अलिकडच्या त्यांच्या लिखाणांत तो पूर्वीचा कस राहिला नाही, ह्याच्याशी मी सहमत आहे. आणि ही जी दोन उदाहरणे दिली आहेत, त्यांजविषयीही. त्यांचे शास्त्रज्ञांच्या कार्यावरील लेख मला बरेच भाबडे वाटत आले आहेत. तसे ते 'कार्यरत' मधेही होते असे वाटले, व अलिकडील 'कार्य..(नक्की नाव विसरलो)' मधीलही तसेच आहेत असे वाटत राहीले. तुम्ही उल्लेखिलेले दोन्ही लेख ह्या नव्या संग्रहात समाविष्ट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मोदक Mon, 06/19/2017 - 17:33 नवीन
कार्यमग्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
आ
आदूबाळ Mon, 06/19/2017 - 18:07 नवीन
कुठे थांबावं हे खूप लोकांना कळत नाही. अवचट त्यात आलेले पाहून दु:ख झालं खूप. कालांतराने ढासळत गेलेलं दीर्घ लेखनकरियर असण्यापेक्षा वन-बुक-वंडर परवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
म
मोदक Mon, 06/19/2017 - 17:11 नवीन
मला वाटले होते की हे पुस्तक लहान मुलांसाठीचे आहे, म्हणून चाळून ठेऊन दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ग
गामा पैलवान Mon, 06/19/2017 - 19:58 नवीन
मोदक, वार्धक्य हे दुसरं बालपणच आहे. फक्त ते निभावून न्यायचं असतं इतरांना. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रदीप Sun, 06/18/2017 - 10:11 नवीन
माणसं, गर्द, संभ्रम, हमीद, प्रश्न आणि प्रश्न, कार्यरत ह्यांपैकी नक्की कुठले ‘अरे माझ्या मध्यमवर्गीय भांडवलशाहीत राहून मिडिऑकर झालेल्या प्रॉडक्टांनो, हे घ्या माझं सामाजिक जाणिवेचं इंजेक्शन’ ह्या सदरातले आहे? अशा तर्‍हेने जगातील कसल्याही लिखाणाची, कलाकृतीची संभावना करता येतेच, हे मान्य आहे. सतीश तांबेंचे सनसनाटी लिखाणही अशाच तर्‍हेने टिचकीनिशी उडवून लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सौन्दर्य Sun, 06/11/2017 - 05:37 नवीन
सध्या श्री अशोक समेळ लिखित 'मी अश्वत्थामा चिरंजीव' ही कादंबरी वाचत आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरूनच कळते की ही अश्वत्थाम्याच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी आहे. पण खरं सांगू ६८७ पानांपैकी १३८ पाने वाचली पण ग्रीप आली नाही. अश्वत्थामा चिरंजीव आहे हे एकवेळ जरी मान्य केले तरी अश्वत्थामा इंग्रजी बोलतो, मराठी, गुजराथी बोलतो हे काही पटत नाही. बघू पुढे वाचताना काय वाटतं ते.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 06/11/2017 - 05:53 नवीन
श्रीमान योगी ची नरहर कुरुन्दकर लिखित प्रस्तावना परखड आणि सडेतोड वाटली
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sun, 06/11/2017 - 06:27 नवीन
सचिनचे अत्मचरित्र Image removed. काही दिवसांपूर्वी साक्षात सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र "Playing it my way" वाचायला घेतले जवळ जवळ ३०-३५ वर्षांचा कालखंड (लहानपण धरून) अनेक नव्या गोष्टी काळतील, अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल होईल ... पुस्तक वाचून संपले .. पण हाती नवीन काहीच लागले नाही ... सचिनच्या इनिंग्स, मॅचचे वर्णन, इतकेच काय सचिन कशा पद्धतीने बाद झाला हे सारे आमच्या डोळ्यासमोर आहे .. तेच परत वाचण्यात काय मजा? तेही अत्यंत पुळकावण्या भाषेत :( ग्रेग चॅपल एपिसोड, मॅच फ़िक्सिन्ग या बद्दल सोईस्कर मौन बाळगले आहे. २००७ वर्ल्ड कप मधील घसरण अगदीच वरवरची व्यक्त झालीय ... डेझर्ट स्टॉर्म किंवा २०११ वर्ल्ड कप चे वर्णन एखाद्या समांतर सिनेमा सारखेच आहे .. रटाळ .... विनोद कांबळीचा माफक उल्लेख समजू शकतो .. पण फॅब फोर किंवा वीरू सारखे खंदे सहकारी ,, यांच्या बद्दल सचिनच्या नजरेतुन बघायला नक्की आवडले असते .. पण .... सचिन ला वेळोवेळी सतावणाऱ्या दुखापती व त्यावर केलेली मात याबद्दल वाचताना सचिनची थोरवी व त्याची खेळाप्रतीची निष्ठा परत एकदा अधोरेखित होते व त्याचे निवृत्तीचे वानखेडे वरून केलेले भाषण परत वाचायला मिळते या जमेच्या बाजू ... हे म्हणजे मिसळ खायला जावे .. छान चांदीच्या थाळीतून मिसळ समोर यावी ... पण - अरे तर्री कुठाय? - तर्री कशाला ? चांदीची थाळी दिली आहे कि - बर थोडा कांदा तरी ... - कांदा??? चांदीची थाळी आहे कि -बर फरसाण .... चांदीची थाळी .... अहो मिसळ खाणाऱ्याला चांदीच्या थाळीचे कौतुक नसते हो .. हे त्या बोरिया मुजुमदारला कोणीतरी समजावुन सांगा .. ता.क. : हे पुस्तक वाचल्यावर मूळ मसुदा लिहून झाल्यानंतर तो वकील PR आणि इमेज कन्सल्टंट यांच्या टीम ने "सेन्सॉर" केला असावा असे वाटते .. आपण हे पुस्तक वाचले असेल तर आपले मत जरूर सांगा .. वाचले नसेल तर ... फार काही गमावलेले नाही ... पुन्हा ता.क. : हे पुस्तक वाचल्यावर सचिन चा चित्रपट बघावा का (किंवा का बघावा) असा प्रश्न पडला आहे
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 06/11/2017 - 06:50 नवीन
विथ ड्यु रिस्पेक्ट फॉर यु (सचिनवरचे पुस्तक विकत घेऊन वाचल्याबद्दल), सचिन आणी अमिताभ ! पण सचिन आणि अमिताभ यांच्या बायकापोरांना कदाचित माहित नसतील एवढया सगळ्या गोष्टी माध्यमे कित्येक वर्षे आपल्यासमोर भसाभसा ओतीत आहेत. सचिन आणि अमिताभ मला पण आवडतात. पण जाहिरातीत, बातमीत यत्र तत्र सर्वत्र त्यांना झेलणे आता अवघड झाले आहे. आपली ब्रँड व्हॅल्यू आहे ती अगदी उसाचा रस काढतात त्याप्रमाणे पिळून पिळून त्यातून कमाई करायची असा त्यांचा समज झालेला दिसतोय असे मलातरी वाटते. कायेकी दोघांनीही आपली प्रतिमा अगदी घाऊक प्रमाणात विक्रीला काढल्यामुळे त्यांची प्रतिमा माझ्यासारख्या अनेकांसमोर अगदीच किरकोळ झालेली आहे असा माझातरी (गैर !) समज झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
M
mayu4u Mon, 06/12/2017 - 17:55 नवीन
सचिन चं आत्मचरित्र भन्नाट बोर आहे... कुणीतरी अगदी चपखल म्हटलेलं: It is a mile long and an inch deep!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अमर विश्वास Sun, 06/11/2017 - 07:28 नवीन
धर्मराजजी मी सचिनचा फॅन नाही .. पण हा ३० वर्षांचा क्रिकेटचा इतिहास या दृष्टीकोनातून वाचले .. अर्थात भ्रमनिरस झाला .. तो माझ्या प्रतिक्रियेतही दिसतोच .. विशेषतः माझा ता.क. जर वाचलात तर मी वकील PR आणि इमेज कन्सल्टंट इत्यादी वर (थोडक्यात व्यापारीकरणावर) टीकाच केली आहे :) बाकी विकत घेऊन वाचण्याबद्दल ... मला हिटलर पण आवडत नाही. तरी मी नाझी भस्मासुराचा उदयास्त विकत घेऊनच वाचले ... (ह.घ्या :) :) )
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 06/11/2017 - 08:46 नवीन
हे बहुतांशी एकाच भुमिकेतून लिहितात, अपवाद श्री. वसंत शिंदे ह्यांनी लिहिलेले आर्मचरित्र. (पुस्तकाचे नांव विसरलो.) बाकी मग ते शांतारामा असो , हसरे दू:ख असो, शहेनशा असो किंवा सनी डेज असो. सगळे मी-मी वर आधारीत. खूल्लम खूल्ला लिहिणारे जवळपास नाहीतच, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
ग
गामा पैलवान Sun, 06/11/2017 - 10:57 नवीन
मुक्तविहारी, मला वाटतं की आत्मचरित्र वाचनीय होण्यासाठी जीवनप्रवास तितकाच रोचक असावा लागतो. सचिन वा अमिताभ यांना त्यांच्या क्षेत्रांत संघर्ष खूप करावा लागला. मात्र तो वगळता बाकीचं आयुष्य लोकांना एकसुरी वा कंटाळवाणंही वाटू शकतं. आत्मचरित्रात केवळ एका क्षेत्राचा विचार न करता समग्र आयुष्याचं प्रतिबिंब पडायला हवं. त्यामुळे सचिन/अमिताभ यांची आत्मचरित्रे रोचक बनवणे ही एक व्यावसायिक कला या अर्थी बघायला पाहिजे. एखाद्या थरारक चित्रपटात मूळ कथाबीज एक असतं आणि इतर घटना पूरक म्हणून दाखवल्या जातात. तशी सोय आत्मचरित्रात उत्पन्न करणं हे त्या व्यावसायिक लेखकाचं कौशल्य आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sun, 06/11/2017 - 11:56 नवीन
+ १ किंबहूना ह्यामुळे मला, मेळघाटातील मोहोर, ही तर श्रीची इच्छा, आणि दोन हात, बॅरिस्टराचे कार्ट इत्यादी आत्मचरित्रे आवडली असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
स्पा Sun, 06/11/2017 - 13:47 नवीन
अत्रारचा फास - नारायण धारप :)
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Sun, 06/11/2017 - 14:24 नवीन
शिवाजी कोण होता? - गजानन भास्कर मेहेंदळे त्या काळचे उत्तम ऐतिहासिक विवेचन. 15% पर्यंत वाचून झालंय. निजामशाही संपली तिथपर्यंत. Six Easy Pieces - Essentials of Physics - रिचर्ड फाईनमन सुप्रसिद्ध फाईनमन लेक्चर्स चा भाग. भौतिक शास्त्राचा विचार कसा करावा यासाठी जरूर वाचावे. अर्धेअधिक वाचून झालेय
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 06/12/2017 - 07:00 नवीन
'शिवाजी कोण होता' याच नावाचे एक पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
S
sagarpdy Mon, 06/12/2017 - 09:15 नवीन
यायला, गल्तीसे मिष्टेक हो गया. श्री राजा शिवछत्रपती (चा अनुवाद-टाईप) : Shivaji : his life and times
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
वरुण मोहिते Mon, 06/12/2017 - 07:37 नवीन
पंकज कालुवाला ह्याच एक चांगलं पुस्तक आहे . ते वाचतोय सध्या ४-५ दिवसांपासून . त्यात इंदिरा गांधी ह्यांची हत्या त्याचे परिणाम . राजीव गांधी ह्यांची हत्या त्याचे परिणाम ,जनरल झिया उल हक,बेनझीर भुट्टो ,सद्दाम हुसेन ,श्रीलंकेचे भंडारनायके ,इस्राईल चे यित्झाक राबिन ,अफगाणिस्तानचे हाफिझउल्लाह अमीन अश्या अनेकांच्या हत्येची माहिती आहे . पुस्तक मोठं आहे पण चांगलं आहे .
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 06/12/2017 - 09:50 नवीन
माझ्याकडे "रा का बर्वे" या लेखकाने लिहिलेले याच नावाचे पुस्तक आहे. तुम्ही म्हणताय त्या पुस्तकाची अनुक्रमणिका देऊ शकाल का..? किंवा ISBN नंबर..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Tue, 06/13/2017 - 05:30 नवीन
९७८-९३-८६०५९-००-० .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 06/13/2017 - 06:12 नवीन
सापडले.. धन्यवाद. http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5656817409215453294?BookName=Rajkiya-Hatya
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अद्द्या Mon, 06/12/2017 - 10:01 नवीन
The discovery of India. नेहरूंचे हे पुस्तक भेट म्हणून मिळालंय.. तेच सुरुवात करतोय आता.
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 06/12/2017 - 13:16 नवीन
Game of Thrones वाचतोय.. ५व्या सिझन पर्यंत मालिका पाहिलीपण होती.. आज दुपारीच 'किंग जॉफरी' गचकला..
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Mon, 06/12/2017 - 13:20 नवीन
देव तुम्हाला spoilers पासून वाचवो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
S
sagarpdy Mon, 06/12/2017 - 16:31 नवीन
मस्त. लय भारी. सगळी बुकं वाचून नंतरच पुढचे सिजन पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
सागर Mon, 06/12/2017 - 17:06 नवीन
सध्या भा.रांनी लिहिलेली शेरलॉक होम्स ही ५ छोट्याशा पुस्तकांची सिरिज डोके हलके व्हावे म्हणून वाचतोय. पुढच्या आठवड्यात एक मोठे पुस्तक घेईन. बहुतेक कुरुंदकर अथवा शेषराव मोरे अथवा दुर्गा भागवत यांपैकी एक.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/13/2017 - 06:43 नवीन
मिरासदारी =)) व्यंकुची शिकवणी आणि शिवाजीचे हस्ताक्षर अगणित वेळा वाचूनही प्रत्येकवेळी तेवढंच हसू येतं.
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 06/13/2017 - 08:41 नवीन
प्रेटी गर्ल्स - करीन स्लाउटर आजकालच्या कल्पित गुन्हे/थरार लेखिका फारच grotesque लिहितात :(
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 06/13/2017 - 09:44 नवीन
अ‍ॅमी - तुझ्या लाडक्या पॉला हॉकिन्सचं (गर्ल इन अ ट्रेन वाल्या बै) नवं पुस्तक आलंय म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा