सध्या काय वाचत आहात?
तसे आम्ही छंदी-फंदी पण दुर्दैवाने वाचनाचे व्यसन पण असेच.घरात तशी २०००च्या आसपास पुस्तके आहेत, पण आवडलेले पुस्तक दरवेळी विकत घेणे परवडत नाही.
म्हणून २ वाचनालये लावली आहेत.सगळीच पुस्तके विकत घेणे एकाच वाचनालयाला पण परवडत नसतील, असे मला वाटते.
तर महत्वाचा मुद्दा असा की. आज एक मस्त पुस्तक मिळाले.
पुस्तकाचे नांव : आलेख (विश्वसंस्कृतीचा)
लेखिका : आशा दामले
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन , बोरीवली, फोन नंबर ०२२-२८६४५२१२, ०२२-२८६३५२२१२
ह्या प्रूथ्वीवर अगणित पुस्तके असतील, आणि मिपावर पण असंख्य वाचनव्यसनी मिपाकर असतीलच.
वाचनव्यसनी मिपाकरांमध्ये एकमेकांना आवडलेल्या पुस्त्कांच्या गाभ्या बद्दल आदान-प्रदान व्हावी ह्या हेतूने हा धागा काढला आहे.
💬 प्रतिसाद
(79)
ए
एमी
गुरुवार, 06/15/2017 - 11:30
नवीन
awww अर्धे पुस्तक वाचेपर्यंतच त्या बाई माझ्या लाडक्या होत्या. पूर्ण पुस्तक वाचून भ्रमनिरास झालेला :D
हो नवीन पुस्तक आलय तिचं माहित होतं.
सध्या मी फारच क्रीपी पुस्तक वाचतेय you, the breakdown, the couple next door, end of watch, woman in cabin-10... जरा ब्रेक घेऊन वुडहाउस वगैरे वाचायला पाहिजे आता ^_^
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 06/15/2017 - 14:32
नवीन
माझंही असंच मत झालं. किंबहुना ती नायिका सारखी टल्ली होऊन आगगाडीतून चकरा मारायला लागल्यावरच वैताग यायला लागला होता. हॉकिन्स असूनही डाळ शिजली नाही.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 06/15/2017 - 18:22
नवीन
हॉकिन्स असूनही डाळ शिजली नाही. >> =))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 06/19/2017 - 05:59
नवीन
हाहाहा
तिच्या प्रेस्टीजचीच शिट्टी वाजवली.
=))
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 06/15/2017 - 14:47
नवीन
बोलणार्यांबद्दल असं बोलू नका हो :))
असो वुडहाऊस आवर्जून वाचाच सगळ्यांनी .
फिरत फिरत चर्चगेट ला मागे मिळालेलं पुस्तक आता परत वाचायला घेईन .
नाव सिलेक्टड शॉर्ट स्टोरीज .
आय एस बी एन नंबर -८१-९०३२६८ -३ -एक्स
वाचून पहा छान आहे . ओ हेन्री पासून चेकॉव्ह ह्या सगळ्यांच्या कथा आहेत . माझा एक भाग वाचायचा राहिलेला म्हणून वाचतोय परत . ७०० -८०० पानाचं आहे पुस्तक .
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 06/15/2017 - 18:32
नवीन
वुडहाऊस आवर्जून वाचाच सगळ्यांनी >> येस. वाचावाच लागणार आहे आता. नाहीतर मलाच टल्ली व्हावे लागेल क्रिपी गोष्टी वाचून झोप येणे बंद झाले म्हणून :-P
===
कोणाकडे jeeves चे epub कलेक्शन आहे का? किंवा कुठून डाउनलोड करता येईल?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 06/16/2017 - 11:20
नवीन
इथे बरीच आहेत. एकदोन जीव्जचीही आहेत. पण क्लासिक जीव्ज (आन्ट्स आरन्ट जेन्टलमन वगैरे) नाही दिसली.
http://www.gutenberg.org/ebooks/author/783
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 06/16/2017 - 16:36
नवीन
हो ती सगळी झालीयत वाचून कधीच :)
- Log in or register to post comments
प
प्रभू-प्रसाद
Sat, 06/17/2017 - 20:00
नवीन
सध्या फक्त मिपा..
बाकी वपु, सुशि ची पारायणे झाली आहेत.
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 06/19/2017 - 07:24
नवीन
वीकएंड ला आवराआवरी करताना MBA च्या काळात वाचलेली दोन पुस्तके हाती लागली ..
Third Wave आणि future shocks .. दोन्ही Alvin Toffler ची ..
त्याने १९८० साली लिहिलेले आजही अनुभवास येते ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 06/19/2017 - 16:24
नवीन
(अधाशी ) मुवि
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 06/20/2017 - 08:24
नवीन
'जैतापूरचे अणुमंथन'
लेखक: राजा पटवर्धन
ग्रंथाली प्रकाशन.
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Fri, 06/30/2017 - 08:20
नवीन
४ वर्षांपूर्वी आलंय. वीजनिर्मिती उद्योगातील अपघात ,अणुवीज प्रकल्प जागतिक पसारा ,जैतापूर चे राजकारण असे काही भाग वाचनीय आहेत .
आय एस बी एन नंबर -९७८-९३-८००९२ -७३-७
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 06/30/2017 - 07:59
नवीन
मला राऊ ही ना.स ईनामदारांची कादंबरी pdf मध्ये मिळेल का? कृपया सांगावे.
- Log in or register to post comments
व
विचित्रा
Fri, 06/30/2017 - 08:56
नवीन
गणेश मतकरींचं इन्स्टॉलमेंट
शिवाय त्यांनीच संपादित केलेल्या रत्नाकर मतकरींच्या श्रेष्ठ कथा.
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 06/30/2017 - 11:23
नवीन
टेड बंडीबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा होती म्हणून the stranger beside me वाचायला चालू केलं होतं. पण लेखनशैली फारशी पकड घेणारी वाटली नाही. सुरुवातीची 2 3 पानच वाचली आहेत. कोणी वाचलंय का हे पुस्तक? पुढे पुढे पकड घेतं का??
सध्या हॅरी पॉटर अँड करस्ड चाईल्ड वाचतेय.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 07/01/2017 - 09:08
नवीन
कुठे थांबावं हे खूप लोकांना कळत नाही. अवचट त्यात आलेले पाहून दु:ख झालं खूप. कालांतराने ढासळत गेलेलं दीर्घ लेखनकरियर असण्यापेक्षा वन-बुक-वंडर परवडले. >>>> +१००००. बहुप्रसव होणे म्हणजे दर्जा घसरणे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 07/01/2017 - 12:41
नवीन
ह्याला काही अपवाद....
१. बाबूराव अर्नाळकर (ह्यांनी १४००च्या वर लेख आणि कादंबर्या लिहिल्या आहेत.सध्या "निवडक बाबूराव" वाचत आहे. ह्या व्यक्ती विषयी परत कधी तरी.)
२. प्र.के.अत्रे
३. ग.दि.माडगूळकर
आणि
४. पु.ल.देशपांडे
जाताजाता वाचक नसतील तर लेखक होत नाहीत, ही पण एक वस्तूस्थिती.कारण वरील ४ही उदाहरणे एका ठरावीक कालावधीतच होती.सध्या मात्र बहू आयामी व्यक्तीमत्वे फारच कमी किंबहूना नाहीतच.असे मला वाटते. कुणी माझे हे अज्ञान दूर केल्यास आनंदच होइल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 07/21/2017 - 11:45
नवीन
पु. लं. बद्दल संपूर्ण सहमत!
माझ्याकडे पु. लं. ची अनेक पुस्तके आहेत. अनेकदा सर्व पुस्तकांची पारायणे केली आहेत. कोणत्याही कारणाने कंटाळा आला की पु. लं. चे कोणतेही पुस्तक उघडून वाचायला लागतो आणि कंटाळा घालवितो. माझ्या दृष्टीने पु. ल. अजरामर आहेत. पूर्वी परदेशी जाताना विमानतळावर, विमानात व परदेशात हॉटेलमध्ये रिकाम्या वेळी वाचायला पु. लं. ची पुस्तके नेत होतो.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 07/01/2017 - 16:43
नवीन
मुक्त विहारी, काही अंशी सहमत. ४ उदा. पैकी 'गदिमा' फक्त मान्य. बाकी तिघांबद्दल वाद-प्रवाद आहेत. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करुन काही म्हणतो :
१. अर्नाळकर : कादंबर्या संख्येने हजारात असल्या तरी त्या सर्वच दर्जेदार म्हणायच्या ?
२. अत्रे : कमरेखालचे विनोद, घणाघाती भाषा इ. चा अतिरेक नको वाटतो.
३. पु. ल. : 'कोट्यां'चा अतिरेक शेवटी नकोसा झाला होता.
तरुणपणी वरील तिघेही माझे आवडते होते. पण आज त्यांची काही पुस्तके वाचवणार नाहीत. हेच वपुंबाबातही खरे.
तेव्हा 'संख्या' आणि 'दर्जा' यांचे नाते मला तरी व्यस्त च वाटते.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sun, 07/02/2017 - 07:30
नवीन
मराठीतील एक ख्यातनाम लेखक लक्ष्मण लोंढे यांचे २०१५ मध्ये झाले. गेल्या वर्षी त्यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा झाला व त्यानिमित्ताने ‘ओंजळभर’ हा स्मृतीग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाशी माझा काही कारणाने संबंध आल्याने माझ्या या आवडत्या लेखकाच्या काही पुस्तकांची आठवण चाळवली गेली. त्यापैकी ‘लक्ष्मणझुला’ या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते.
हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना.
माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते.
स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते.
‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे.
पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो.
‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही?
.. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 07/21/2017 - 11:10
नवीन
Double indemnity झक्कास आहे!!
James M. Cain ने लिहिलेले Mildred Pierce पण आवडले होते!
- Log in or register to post comments
ए
एमी
Tue, 07/25/2017 - 05:06
नवीन
ओम शांती ओम चित्रपटात राम कपूर ला तीन तीन फिल्मफेअर नामांकन मिळालेली असतात. तिन्हीत तेचते बाहें फैलाने असतं, तीचती शिफॉन साडीतली हिरवीण केस उडवत पळत येते, तेचते आ आ आ आ आ संगीत....
मराठी आंजादेखील तसंच आहे. तीचती पापड लोणची करणारी, भाकर्या बडवणारी आई आजी पणजी चुलतसासु मावशी... किंवा तेचते रम्य बालपण...
जर कोणाला यातली दुसरी गोष्ट ऐकूनऐकून बोर झालं असेल तर Let's pretend this never happened वाचा. टोटल लोटपोट आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 07/25/2017 - 09:14
नवीन
अॅमी,
या विधानाशी सहमत आहे. मराठी आंजा महिला क्रिकेटप्रमाणे आहे. एकतर खेळ पुरुषी क्रिकेटच्या मानाने मंद असल्याने कमी प्रेक्षणीय, शिवाय खेळाडूही विशेष प्रेक्षणीय नाहीत. महिला क्रिकेटचं काही खरं नाही बुवा!
आ.न.,
-गा.पै.
वि.सू. : स्त्री ही अनंतकाळाची माता आहे हे पटवण्यासाठी महिला क्रिकेटाचं उदाहरण दिलं आहे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 07/25/2017 - 09:31
नवीन
- Log in or register to post comments
ए
एमी
Fri, 08/04/2017 - 07:33
नवीन
James Hadley Chase ची सगळी 90 पुस्तकं मिळाली.आता एकेक करून वाचणार !
सध्या A wrinkle in time वाचतेय.
===
साहित्य/संपादक हे पुस्तकां विषयीचे सगळे धागे नीट लावून 'वाचू आनंदे' सारखा वेगळा विभाग करता येईल का? त्यात साध्या काय वाचताय, कोणती पुस्तक खरेदी केली, कुठे प्रदर्शन चालुय, कुठे काही स्कीम चालुय, पुस्तकंच्या समीक्षा सगळे धागे टाकता येतील.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Fri, 08/04/2017 - 11:28
नवीन
विरंगी मी विमुक्त मी
लेखिका: अंजली जोशी
प्रकाशनः शब्द पब्लिकेशन
अंजली जोशी यांची ही कादंबरी, मुख्यतः स्त्रियांच्या कामेच्छा आणि त्या पुर्ण करण्यासाठी काय करावे ह्यावर बेटी डॉडसन केलेल्या प्रयत्नांचा मागोवा आहे. स्त्रियांनी तर ही कादंबरी नक्किच वाचायला हवी...सविस्तर लेख पुन्हा केव्हातरी..
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 08/04/2017 - 12:14
नवीन
जग बदल घालूनी घाव - एकनाथ आवाड
.

- Log in or register to post comments
ए
एमी
Sun, 10/22/2017 - 07:43
नवीन
Tana French चं In the Woods वाचायला चालू केलं आहे नुकतंच. रोचक वाटतय सध्यातरी.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2