Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साक्षात्कार

अ — अनन्त्_यात्री, Mon, 06/12/2017 - 17:53
माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले तेव्हा दिसलं इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी रिमझिमतं आभाळ तर कधीचं ओथंबून वाकलंय वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं तेव्हा दिसलं मी सहज फेकलेल्या विटेवर माझं श्रेय-प्रेय तर कधीचं उभं ठाकलंय अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत तेव्हा दिसलं माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय

प्रतिक्रिया द्या
2815 वाचन

💬 प्रतिसाद (13)
र
रुपी Mon, 06/12/2017 - 20:16 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 06/13/2017 - 03:14 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 06/13/2017 - 11:52 नवीन
गुड. तुमच्या कवितांच्या फॉर्ममधले वेगळेपण छान असते.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले गुरुवार, 06/15/2017 - 17:44 नवीन
सहमत. सुंदर प्रतिमा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अनन्त्_यात्री Tue, 06/13/2017 - 18:30 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Wed, 06/14/2017 - 07:32 नवीन
माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय हे विशेष आवडलं
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 06/15/2017 - 05:19 नवीन
____/\___
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 06/15/2017 - 11:28 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
स
सनकी गुरुवार, 06/15/2017 - 17:01 नवीन
"रिमझिमतं आभाळ तर, कधीचं ओथंबून वाकलंय". भिडलं मनाला अगदी! चौकटीबाहेरचा विचार करून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकायचीच काय ती खोटी... सारं जग तुमचंच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 06/15/2017 - 18:12 नवीन
आपल्या प्रतिसादा॑बद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 06/20/2017 - 21:13 नवीन
शेवटचा बंध अगदीच क्लासिक! अवांतर—वातावरण म्हणा किंवा काय,पहिला नि तिसरा बंध वाचताना,पावसाळ्यातली एखादी ओलसर,कुंद पहाट-ऊषा,आठवुन गेली!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 06/22/2017 - 17:44 नवीन
...ही एक नवी सुरुवात ठरावी अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/22/2017 - 21:01 नवीन
मेळविता एकेक पणती,उजळता प्रकाश-पंक्ती सूर्य व्हाव्या लक्ष ज्योती,अखंडीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा