Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ?

स
सतिश पाटील
गुरुवार, 06/15/2017 - 12:09
🗣 85 प्रतिसाद
आपल्याही घरी, शेजारी किंवा नात्यागोत्यात कोणाचातरी 'निकाल' लागलाच असेल. अपेक्षेप्रमाने काही जणांनी पेढे वाटले असतील , काही जणांना अपेक्षेपेक्षा जरा कमी गुण आले असतील. निकालाच्या निमित्ताने मी देखील १७ वर्ष पूर्वीच्या आठवणीत हरवलो. गणितात नापास झालो होतो मी. धाग्याचा उद्देश हाच की इथल्या सदस्यांनी देखील त्यांचे १० वीचे खरे मार्क सांगावेत. त्याच सोबत आज ते व्यवसायिक आयुष्यात कुठपर्यंत पोहोचलेत हे ही सांगावे. इतरांचे निकाल पाहताना बर्याच चर्चा केल्या असतील आता जरा स्वतःच्या निकालाची चर्चा सुद्धा होऊ दे की.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
39880 वाचन

💬 प्रतिसाद (85)
अ
अभ्या.. Sun, 06/09/2019 - 19:53 नवीन
आपणाला किती होते? आणि पार त्या काळचे ७० टक्के असले तरी सातत्याने असे अधांतरी लिहिण्यामुळेच मिळाले असे आपणास वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Sun, 06/09/2019 - 20:07 नवीन
माझ्या अगोदरच्या पिढीतील 7 वी पास सुधा व्याकरण शुद्ध इंग्लिश बोलायचे . आता graduate Sudha व्याकरण शुद्ध इंग्लिश बोलू शकत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रलयनाथ गेंडा… Mon, 06/10/2019 - 09:34 नवीन
कॉल सेंटर मध्ये शुद्ध इंग्लिश बोलू शकणारे किती ? परकीय चलन भारतात आणणारे शुद्ध इंग्लिश बोलू शकणारे किती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ग
गब्रिएल Mon, 06/10/2019 - 14:23 नवीन
खरं हाय तुम्चं. मिपावर बगा. हाल्ली शिकलेल्ये लोकबी दोन मराटी वाक्यबी धड लिवू शकत नाय बर्का. पन त्येच लोक मराटि बुडतिया म्हनून गळा काढाया पुडं पुडं आसत्यात. आता ब्वोला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ए
एकुलता एक डॉन Sun, 06/09/2019 - 19:53 नवीन
२० वर्षा आधीचे ८५% ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
ब
बेकार तरुण Mon, 06/10/2019 - 07:31 नवीन
मला दहावीला ८३.१४% होते. १९९४ साली. पुढे कॉमर्सला जाउन (भरपुर उनाडक्या केल्याने) आणी एक दिवस ईन्स्टिट्युटलाच आमचा कंटाळा आल्याने सी ए अन सी एस झालो. सध्या नोकरी करतो, ईक्वीटी अ‍ॅनालिस्ट म्हणुन. बेकारही नाही अन तरुणही नाही :(
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 06/10/2019 - 08:29 नवीन
वामन देशमुख इसवी सन १९९२ इयत्ता दहावी ७१% गूण ---
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Mon, 06/10/2019 - 10:12 नवीन
१९९२ दहावीचे मार्क्स ८८.७१% नंतर अकरावीला नापास झालो. एक वर्ष घरी होतो. मग १९९५ ला बारावी झालो. ८०% मार्क्स मिळाले. बारावीनंतर अभियांत्रिकीला नगरच्या विळद घाटातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. दोन दिवसांत कंटाळलो. नंतरच्या फेरीत नागपूरला प्रियदर्शिनी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे एका आठवड्यात कंटाळलो. मग ते संपूर्ण वर्ष काहीच केलं नाही. १९९६ ला पुन्हा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सज्ज झालो. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे रमलो. खूप मजा केली. जमेल तसा अभ्यास करून २००० मध्ये पदवी मिळवली. नंतर ३-४ वर्षे भयानक गेली. २००४ पासून स्थिर नोकरी मिळाली. अजून तरी ठीक सुरू आहे. माझ्या कामाचा आणि शिक्षणाचा अजिबातच संबंध नाही. इच्छा आणि वकूब नसतांना अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यामुळे त्या क्षेत्रात नोकरी मिळवणं खूप कठीण होतं. चार वर्षांच्या शिक्षणानंतर विद्युत अभियांत्रिकी या विषयातलं काहीच येत नव्हतं. इच्छा, आवड, वकूब, आणि संबंधित विषयांत उपयुक्त गुण नसतांना अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे हा निर्णय आयुष्याची सोन्यासारखी वर्षे बरबाद करू शकतो हे मात्र शिकलो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 06/10/2019 - 20:23 नवीन
या धाग्याच्या संदर्भात असलेले हे ग्राफिक आजच व्हॉट्सॅपवरून आले. बोलके आहे म्हणून इथे टाकत आहे. काही दशकांपूर्वीचे आणि सद्याचे गुण यांची तुलना का होऊ शकत नाही हे जराश्या विनोदी अंगाने सांगितले आहे. :) Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 06/11/2019 - 05:30 नवीन
दहावीला 93%. 2006 ची बॅच. (मार्क न वाटलेली शेवटची बॅच बहुदा) बारावीला पीसीएमबी ला 94%. बायोलॉजि 100/100. पीसीएम ला 90%. सीईटी: मेडिकल : 167/200 इंजि: 129/200 लहानपणापासून उत्तम चित्रकला. परिस्थिती बेताची त्यामुळे इंजिनिअरिंग केले. करताना पार्टटाईम जॉब केला. इंजिनअरिंग मध्ये मात्र अवांतर गोष्टींकडे लक्ष दिल्याने प्रचंडच गंडलो. तरीही आतापर्यंत कसातरी एक सॉफ्टवेअर जॉब करतोय. एक ना धड भाराभर चिंध्या. कशातही इंटरेस्ट तयार होत असल्याने वाट्टेल ते केलं. सध्या बृहतसंहिता वाचत आहे. (कारण बुद्धीला अतिताण दिल्याने यकृतावर परिणाम होतोय असं माझ्या वैद्यांचे मत आहे.) खाण्या-पिण्यात खूप रस. लोकसंग्रह अत्यंत तोकडा आणि तुसडेपणा टोकाचा. कालच 'भारतीय मूर्तीशास्त्र' हे पुस्तक आलं आहे! एखादी गोष्ट तडीस नेणे हे कधीही जमले नाही. त्यामुळे गेटसाठी दोन वर्षे घालवूनही मी exam च देऊ शकलो नाही. परीक्षेची प्रचंड भीती बसली आहे. मी सध्या सरासरी तीन मुलाखती प्रत्येक आठवड्याला घेतो, पण मला स्वतःला एकाही मुलाखतीत स्वतःहुन जाण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे जिथे फक्त कोड हाच इंटरव्ह्यू असतो तिथेच आजवर निवडला गेलोय. तीन जॉब बदलेले ते सगळे ओळखीतून मिळाले आहेत. मला सर्जन व्हायचं होतं, झालो सर्जनशील!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/11/2019 - 07:55 नवीन
१० वि ला भरमसाट गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मूळ विषय नीट समजलेला नसतो असे अनेक वर्षे पाहत आलो आहे. १२ वि ला जीवशास्त्रात १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्राची मूलभूत समज नसते हे आढळून येते. उत्क्रांती, नैसर्गिक निवड, सुदृढ तोच जगेल अशा अनेक मूलभूत गोष्टी समजलेल्याच नसतात ज्या पुढे तुम्हाला जीवशास्त्रात करियर करायचे असेल तर फार महत्त्वाच्या ठरतात. उद्या केवळ २० ते ३० पाढे यावर १०० गुणांची परीक्षा घेतली तर पढिक मुले १००% गुण मिळवतील. पण त्यांना गणिताची मूलभूत समज असेल का? आज विचारावे त्या मुलाला ९५ % गुण मिळालेले असतात. यामुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांना आपले मूल "भयंकर हुशार" आहे असा साक्षात्कार होतो. त्यामुळे आपल्या मुलाला "मुंबई आय आय टी च्या खाली कुठलेही अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा एम्स च्या खालचे वैद्यकीय महाविद्यालय" चालणारच नाही असे वाटू लागते. परंतु हे गुण ना त्याला विषयात काही रस असतो म्हणून मिळालेले असतात कि त्यातील मूलभूत ज्ञान असते म्हणून मिळतात. कोणत्या तरी क्लास ला जाऊन "गिळा आणि ओका" या सूत्रावर एवढे गुण मिळवलेले असतात. केवळ ९० % वर गुण मिळाले म्हणून शास्त्र विषयात आलेली कित्येक मुले पुढे रखडताना दिसतात. हा "गुण फुगवटा" थांबवला गेला पाहिजे ज्यामुळे मुलांची आणि पालकांची फार दिशाभूल होते आहे.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Tue, 06/11/2019 - 08:09 नवीन
काय केले पाहिजे व कसे केले पाहिजे हे साधार समजावणे अवघड असते व म्हणूनच आवश्यक ते बदल व्यवस्थेमधे होत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 06/11/2019 - 08:44 नवीन
करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि त्यावर तज्ज्ञ समित्यांनी बरीच गोष्टी सुचवलेल्या आहेत. व्यवस्थेत बदल शक्य आहे परंतु झारीतील शुक्राचार्य बरेच आहेत. राजकीय इच्छा शक्ती, सवंग लोकप्रियतेचे निर्णय (उदा कुणालाच ९ वि पर्यंत नापास करू नका, अभ्यासक्रम सोपा करा). क्लासेस बरोबरचे अर्थपूर्ण संबंध, विकेंद्रीकरणाच्या गरजा सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आवश्यक सुधारणा बासनात गुंडाळल्या गेलेल्या आहेत किंवा गोठवल्या गेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
जॉनविक्क Tue, 06/11/2019 - 09:32 नवीन
म्हणूनच वरील प्रतिसाद लिहला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 06/11/2019 - 13:43 नवीन
एका एमबीबीएस मुलीशी डेट करतानाचा एक अनुभव : आंबा खाता खाता सहज तिने म्हंटलं, निसर्गाची काय कमाल आहे, समर मध्येच एवढं गोड रसदार फळ आपल्याला मिळतं. अर्थात मी कपाळावर हात मारून घेतला. तिचे विधान निसर्गाला अ‍ॅक्टीव्ह एजंट मानून झालेल्या उत्क्रांतीच्या संकल्पनेला धरून सकृत दर्शनी बरोबर वाटतं, तरीही त्यातली तार्किक चूक तिच्या गावीही नव्हती. आपल्याला/ प्राणीपक्ष्यांना समर मध्ये गोड रसदार फळं खायला आवडतात म्हणून काळाच्या विशाल पटलावर आंबा नावाची स्पेसिज नॅचरली सिलेक्ट होत गेली आहे वगैरे तर तिच्या डोक्याच्या बाहेरचे. संध्याकाळी साईबाबाची आरती केल्याशिवाय घास न घेणारी बीजे मधली डॉक्टर. आणि आम्ही सॅपिओसेक्सुअल इकडे इंजिनिअरिंगला असून डार्विन फिशचा टी शर्ट घालून फिरत होतो. अर्थात सध्या तिच्या करियरला डार्विनची परडी कितपत लागते आहे याबद्दल साशंक आहे, तिचे उत्तम चालले आहे असे कळते. अर्थात हा ही स्कूलबॉय-अ‍ॅथिजमचाच एक प्रकार झाला. तो दिखावूपणा गळाल्यावरदेखील डॉकिन्स ते सॅम हॅरिस हा प्रवास व्हायला वेगळीच बुद्धी लागते. विषय बुद्धीचाच निघाला आहे तेव्हा, चरक सर्व बुद्धींना भाग्यविशेष म्हणतो हे वाचल्यावरच मी उडालो होतो. असो. तुमचे म्हणणे अतिशय बरोबर आहे, दहावीच्या गुणवाटप स्कीमनंतर ९०% हे अगदीच हॅ मार्क होत. यावर्षी हे गुण नसल्यामुळे गाडी मूळपदावर आली आहे असं वाटत आहे. बुद्धीच्या जोरावर जास्त मार्क मिळवणाऱ्यांबरोबर, निष्ठेने-व्यवस्थापनाने अतिशय कष्टकरून इतकेच मार्क मिळवणाऱ्यांबद्दल आदर आहे. त्यांना अगदीच टाकाऊ असं मात्र मी अजिबात समजत नाही. मार्क मिळवणे हे देखील एक वेगळं स्किलसेट आहे. एखाद्या निर्बुद्ध मुलाला उद्या गिळा आणि ओका या तत्त्वावर ९०% मार्क मिळाले तरी मी त्यामागच्या शिस्तीला, वेळेच्या व्यवस्थापनाला आणि प्रेरणेला नक्कीच दाद देईन.
परंतु हे गुण ना त्याला विषयात काही रस असतो म्हणून मिळालेले असतात कि त्यातील मूलभूत ज्ञान असते म्हणून मिळतात.
नववीच्या परीक्षेत अणू म्हणजे काय हे विचारलं तर तेवढंच रुडीमेंटरी उत्तर अपेक्षित आहे. तो विद्यार्थी अगदी क्वार्क बिर्क सांगून उत्तर लिहायला लागला तर त्याचा पेपर दोन तास सुद्धा संपणार नाही आणि तो नापास होईल. कोणत्या पातळीवर किती मुलभूत ज्ञान अपेक्षित आहे हे ठरवायला मुलभूत म्हणजे काय हे आधी स्पष्ट करावे लागेल. गिळा आणि ओका या तत्त्वावरच परीक्षेत सर्वोच्च गुण प्राप्त करता येत नाहीत. अगदी सर्वोच्च नाहीत पण उच्च मार्क मिळवून शास्त्र विषयात पुढे आलेली मंडळी जगातील यच्चयावत विषयांवर आपली मते मराठी संस्थळांवर रेटून मांडत शास्त्रांची सेवा करताना पाहतो तेव्हा मात्र मी धन्य धन्य होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. Tue, 06/11/2019 - 13:57 नवीन
अत्युच्च प्रतिसाद अर्थात दाद हि आपल्या डोसक्यालाही आहे. अशी मेंदूची जडणघडण होणे सोपे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
उ
उपेक्षित Tue, 06/11/2019 - 15:46 नवीन
आयला अण्णा डोका गरगरलतुमचा प्रतिसाद वाचून, जबरी प्रतिसाद होता हे काय सांगाया पायजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
ह
हस्तर Tue, 06/11/2019 - 17:43 नवीन
च्च मार्क मिळवून शास्त्र विषयात पुढे आलेली मंडळी जगातील यच्चयावत विषयांवर आपली मते मराठी संस्थळांवर रेटून मांडत शास्त्रांची सेवा करताना पाहतो तेव्हा मात्र मी धन्य धन्य होतो. आणि काही शुध लेखनाचा आग्रह पण धरतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपेक्षित
R
Rajesh188 Tue, 06/11/2019 - 09:29 नवीन
मला 1998 ला एसएससी का 63% मार्क मिळाले होते . खेडेगाव मधील शाळा ना क्लास ना कोणाचे मार्गदर्शन(शिक्षक सोडून). पण तेव्हा सुधा शिक्षकांचा भर विषय पूर्ण समजावण्या कडे असायचा. तेव्हा सुधा २१ अपेक्षित आणि guide होते . पूर्वीच्या प्रश्न पत्रिकेंचा उपयोग फक्त पॅटर्न समजण्यासाठी केला जायचा . संभाव्य प्रश्न कोणते येतील ह्याचा विचार करून प्रश्न उत्तरे पाठ करणे हा प्रकार कमी होता . पूर्ण धडा व्यवस्थित समजला की कोणताही प्रश्न आला तरी उत्तर लिहत येते आणि पुढच्या शिक्षणासाठी पाया मजबुत होतो . आता फक्त मार्क जास्त मिळवणे पाठांतर करून हेच ध्येय असते त्या मुळे पाया च कमजोर झाला आहे .
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 06/11/2019 - 10:54 नवीन
दहावी - ६०.२% बारावी - ६३.१७% पण त्यापुर्वी एकदा गणितात आणि भौतिकशास्त्रात, तसेच पुन्हा गणितात नापास. पदवी - बी. एस्सी.. ५६.६% रसायनशास्त्र/वनस्पतीशास्त्र / पर्यावरणशास्त्र सद्यपरिस्थिती - सरकारी नोकरी. २००९ बॅच आयएएस..
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Tue, 06/11/2019 - 12:01 नवीन
आपलं यश स्पॄहणीय आहे. दहावी-बारावीच्या मार्कांवर आयुष्य आणि यश अवलंबून नसतं हेच खरं. आयएएस होणं ही खरोखर खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आपले उदाहरण प्रेरणादायी आहे. इथे सगळ्यांचीच उदाहरणे प्रेरणादायी आहेत. परिस्थिती, आवड-निवड, स्पर्धा, पालकांचा आणि समाजाचा दबाव, आरोग्यविषयक समस्या, पैशांशी संबंधित समस्या, संगत अशा बर्‍याच आव्हानांचा आणि खडतर प्रवासाचा सामना करून सगळ्यांनीच कौतुकास्पद यश मिळवले आहे आणि सगळे आयुष्यात स्थिर, समाधानी, आणि आनंदी आहेत. इथले अनुभव वाचूनच इतकं सकारात्मक वाटतं की सकारात्मक अ‍ॅटिट्यूड कसा असतो हे समजण्यासाठी पुन्हा दुसरं काही करायची गरजच नाही. अजून येऊ द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Tue, 06/11/2019 - 12:51 नवीन
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद, समीरसूर.. पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणेच, इथे सगळ्यांचीच उदाहरणे प्रेरणादायी आहे. भूतकाळातील कमतरतेवर, अपयशावर मात करुन किंवा पुर्वी मिळालेल्या यशाला आणखी तेजस्वी करत जी व्यक्ती सुखी आयुष्य जगत आहे, ती प्रत्येक व्यक्ती माझ्यामते यशस्वी आहे. तुम्ही स्वतःदेखील 'वेव्ही बॉब' सारखी कादंबरी लिहीली आहे. आपापले छंद, आवडी सुखनैवः पुर्ण करु शकणे, हा पण एक माईलस्टोन आहे. मुद्दा एवढाच आहे, की अपयशात अडकण्यात आणि अडकून राहण्यात काहीच अर्थ नाही, कारण यश-अपयश हे नेहमीच सापेक्ष असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
R
Rajesh188 Tue, 06/11/2019 - 14:45 नवीन
शालेय जीवनात काही विषयात नापास होवून सुधा तुम्ही मनाने खचला नाही . आणि आता काय करायचे ,माझे कसे होणार असल्या निराशावादी विचारणा स्वतः पासून लांब ठेवून आयुष्य यशस्वी करून दाखवलं हे खूप मोठं यश आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
ज
जेम्स वांड Sun, 06/16/2019 - 10:13 नवीन
आयएएस, म्हणजे च्यायला विषयच कट, पुढली कथा प्रशासन विरुद्ध गावकरी लिहिणार होतो, आता काय त्यो विषय घेऊन लिहायची हिम्मत नाय आपली. कॅडर कुठलं चिगो सर? एकेकाळी एमपीएससी करायची प्रचंड इच्छा होती, करंट अफेयर्स वगैरे वाचत असे पण वर्ष वर्ष रिपीट करायचा पेशन्स नव्हता म्हणून सरळ पदरात पडलेली नोकरी करत बसलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Wed, 06/19/2019 - 14:00 नवीन
पुढली कथा प्रशासन विरुद्ध गावकरी लिहिणार होतो,
कृपा करुन लिहाच.. सरकारी नोकरीत असलो, तरी डोळ्यांवर कातडं ओढलेलं नाहीयं मी.. आणि तुमचं लेखन ही सगळ्या मिपाकरांसाठी मेजवानी आहे, तेव्हा लिहाच. विषय कट करायला कारणच नाही ना काही.. मी आसाम-मेघालय कॅडरमध्ये आहे, मेघालयला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
च
चावटमेला Tue, 06/11/2019 - 13:04 नवीन
साल २०००, दहावी - ८७%. आजूबाजूचे सायन्सला गेले म्हणून मी सुद्धा गेलो. पाठांतर करून १२ वी त पीसीएम ला ९४% मिळाले. आपल्याला ह्यातलं काहीही समजत नाही हे कळत असून सुध्दा बेअक्कलपणे इंजिनिअरिंग ला गेलो. ओ का ठो कळत नसून सुद्धा कसाबसा पास होत गेलो. आता एका सॉफ्ट्वेअर कंपनीत पाट्या टाकतोय...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 06/16/2019 - 09:59 नवीन
शाळेत असताना हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्धी(?) होती. अकरावी पर्यंत कधीही खास अभ्यास करावासा वाटला नाही, केलाही नाही. विशेष समजही नव्हती. ४२.६७% एवढ्या प्रचंड गुणांनी मा. शा. परीक्षा उत्तीर्ण झालो. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच नापास झालो. नापास झाल्यावरही वडलांनी काहीच दम दिला नाही, ओरडले नाहीत त्या मुळे की काय अभ्यास न केल्याचे अतिशय दुःख झाले. ओटीस एलेव्हेटर कम्पनीत अँप्रेंटीस म्हणून लागलो. दोनच महिन्यात एका सहकारी बँकेत कारकुनाची नोकरी मिळाली. पुढे तिथल्या सर्व परीक्षा देत शाखा व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालो. आत्ता पर्यंतचे आयुष्य नक्की आनंदात गेले ( यात पत्नी आणि मुलाचा मोठा सहभाग आहे). .... योग्य वयात कान पिचक्या न मिळाल्याने शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत नक्की जाणवते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 06/16/2019 - 10:10 नवीन
अजूनही बाहेरून परीक्षा देऊन बेसिक ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकाल. :) खरेच सांगतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
N
Nitin Palkar Mon, 06/17/2019 - 09:45 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आदेश007 Sun, 06/16/2019 - 17:49 नवीन
१९८७ साली दहावीत ७६% मिळाले. सगळे मित्र सायन्सला गेले मी मात्र कॉमर्स कॉलेजला ऍडमिशन घेतली. बारावीत ७२% मिळाले. बी कॉमनंतर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. एलएल बी फायनलमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आला. त्यानंतर लॉमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. तेंव्हाही युनिव्हर्सिटीमध्ये पहिला क्रमांक आला. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या. सध्या टॉप 5 मधील एका आयटी कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. थोडीफार समाज सेवा करायचा प्रयत्न चालू आहे. बाकी चांगलं चाललं आहे.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 06/16/2019 - 23:21 नवीन
शालेय जीवनात आणि पुढे शिक्षण पूर्ण होईतो सातत्याने अव्वल क्रमांक त्यामुळे स्कॉलर वर्गात गणना परंतु आज सिंहावलोकन करता आणि बेंच मार्किंग (मराठी प्रतिशब्द ?) करता असे दिसते की तेव्हा मार्कांमध्ये माझ्या मागे असणारी काही मित्रमंडळी आज तौलनिक दृष्टया जीवनामध्ये अधिक यशस्वी आहेत. अर्थात त्याचा आनंदच आहे "सक्सेस इन लाईफ" इज नॉट नेसेसरिली प्रोपोर्शनल टू "मार्क्स ऑन मार्कशीट", हेच खरे. पुस्तकी हुशार असण्यापेक्षा "स्ट्रीट स्मार्ट" (पुनःश्च मराठी प्रतिशब्द ?) असणे हे जीवनात यशस्वी होण्यासाठी जास्त गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 06/17/2019 - 05:30 नवीन
1989 बैच, आर.एम.भट हाईस्कूल हुशार मुलगा म्हणून ओळखत होते शाळेत सर्व शिक्षक! त्यांना तर धक्काच बसला, खरी गोम अशी होती कि अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी काहीही वाचायची आवड़ होती, अगदी पाककलेवरील पुस्तके सुद्धा! एका सर्वेक्षण कंपनीत सुपरवाइजर होतो, अचानक नोकरी सोडून एका फार्महाउसवर देखभालकर्ता म्हणून लागलो. आता एका डायग्नोस्टिक फर्मकरता मार्केटिंग करतो. कधी असे वाटते की अभ्यास केला असता तर चांगली नोकरी, पैसा, आराम मिळाला असता. गणित केले तेव्हा समजले की आता पण तेच करत आहे. माझ्या मुलाला पण जमेल तशी पुस्तके आणून देतो. परदेशी महागड़ी पुस्तके रद्दिमधे स्वस्तात मिळतात. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला पण शाळेमधे हुशार मुलगा म्हणून ओळखले जाते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार बहुतेक?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 06/17/2019 - 05:30 नवीन
1989 बैच, आर.एम.भट हाईस्कूल हुशार मुलगा म्हणून ओळखत होते शाळेत सर्व शिक्षक! त्यांना तर धक्काच बसला, खरी गोम अशी होती कि अभ्यासाची पुस्तके सोडून बाकी काहीही वाचायची आवड़ होती, अगदी पाककलेवरील पुस्तके सुद्धा! एका सर्वेक्षण कंपनीत सुपरवाइजर होतो, अचानक नोकरी सोडून एका फार्महाउसवर देखभालकर्ता म्हणून लागलो. आता एका डायग्नोस्टिक फर्मकरता मार्केटिंग करतो. कधी असे वाटते की अभ्यास केला असता तर चांगली नोकरी, पैसा, आराम मिळाला असता. गणित केले तेव्हा समजले की आता पण तेच करत आहे. माझ्या मुलाला पण जमेल तशी पुस्तके आणून देतो. परदेशी महागड़ी पुस्तके रद्दिमधे स्वस्तात मिळतात. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला पण शाळेमधे हुशार मुलगा म्हणून ओळखले जाते. इतिहासाची पुनरावृत्ती होणार बहुतेक?
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Mon, 06/17/2019 - 10:11 नवीन
बोर्डात. आलेलो . इंजिनिअर झालो त्यात रस नाही वाटला. परत पोलिटिकल सायन्स आणि कंपनी कायदा शिकलो. सध्याचे काम इंजिनिअरिंग सोडून फार वेगळे आहे.
  • Log in or register to post comments
क
के. सौरभ Fri, 06/21/2019 - 15:05 नवीन
१० वी पर्यंत सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले , ११ वी व नंतर सर्व विषय इंग्रजी माध्यमामधून होते परंतु काही अडले नाही. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे या मताचा मी आहे पण माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेत जातात, असो काळानुरूप बदल आवश्यक (पण खरच गरज आहे का ,या विषयावर वेगळा धागा उघडता येईल.) दहावीच्या निकालाविषयी चर्चा म्हणून एक आठवण नमूद करावीशी वाटते- बी. एम. जोशी (उत्कर्ष मंदीरचे अतिशय कडक शिक्षक, मुले काय मुलींना पण धोपटून काढायचे चुकले तर. तरीही विद्यार्थीप्रिय) सरांनी माझी गणिते तपासताना म्हटले होते तु ८० टक्क्याच्या आसपास जाणार आणि सरांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले. मी कधी मार नाही खाल्ला पण दुसर्याचा मार बघून फाटायची. मुलांना यावे ही कळकळ मी इतर कोणत्याही शिक्षकामध्ये एवढी पाहिली नाही. नंतर अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण करून मी आज हिंजवडी येथील एका माहीती तंत्रज्ञान कंपनी मध्ये उच्च प्रबंधक पदावर आहे. ठीक चालू आहे, अजून काही चांगले करता आले असते असे वारंवार वाटते. नोकरी बास असाही विचार डोकावत असतो. बाकी बघू स्वप्रयत्न आणि परमेश्वराची क्रुपा!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा