Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाघोबा वाघोबा किती वाजले

श — श्रीगुरुजी, Wed, 06/21/2017 - 11:33

वाघोबा वाघोबा किती वाजले

वाघोबा वाघोबा किती वाजले, पाऊस न येताच राजीनामे भिजले| वाघोबा वाघोबा किती वाजले, म्याव म्याव च्या डरकाळीने घसे बसले| वाघोबा वाघोबा किती वाजले, भूकंपाच्या धमकीने हसू फुटले| वाघोबा वाघोबा किती वाजले, आदिलशहा* येताच शेपूट घातले| वाघोबा वाघोबा किती वाजले, यांच्या मर्कटलीलांनी केजरीवाल लाजले| वाघोबा वाघोबा किती वाजले, धाकल्याच्या चतुराईने थोरले बिथरले| वाघोबा वाघोबा किती वाजले, बनियासमोर** लोटांगण घातले| वाघोबा वाघोबा किती वाजले, यांच्या वल्गनांनी मावळे शरमले| वाघोबा वाघोबा किती वाजले, असा पक्ष, असे नेते हे दुर्दैव आपुले| (* - विधानसभा निवडणुकीत उधोजींनी अमित शहांचा उल्लेख 'आदिलशहा' असा केला होता. ** - मुंबई महापालिका निवडणुकीआधी गुजरात्यांची मते मिळविण्यासाठी उधोजींनी हार्दिक पटेलला मातोश्रीवर निमंत्रित करून त्याच्याकडून पाठिंबा मिळविला होता.)

प्रतिक्रिया द्या
2914 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अभिजीत अवलिया Wed, 06/21/2017 - 12:26 नवीन
बडबडगीतासारखे वाटतेय :) राग मानू नका :)
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 06/21/2017 - 12:31 नवीन
हार्दिक पटेल बनिया नाही हा तांत्रिक भाग वगळता फर्मासच जमलं आहे काव्य, खूप आवडलं.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 06/21/2017 - 12:50 नवीन
जे न देखे रवी... या सदरामध्ये देखील गुरुजींचा दमदार शिरकाव. अभिनंदन..!! (कृपया हलके घ्या )
  • Log in or register to post comments
अ
अरूण गंगाधर कोर्डे Wed, 06/21/2017 - 13:06 नवीन
सद्यस्थितीवरील कविता चांगली जमवली आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 06/21/2017 - 17:13 नवीन
म्याव म्याव वाल्या वाघोबानी वाचावी अशी कविता. मस्त
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा