निळा प्रवासी
अजाण पक्षी सुजाण वारा
उन्मुक्तावर स्वच्छन्द पहारा
चुकवून अव्यक्तांच्या नजरा
उनाड पाऊस, अवखळ गारा
काळ्या डोही कातळपाणी
हिरवे असुनी रान अधाशी
वेशीवरती उभा थबकुनी
अवकाशीचा निळा प्रवासी
गंध मातीचा, धरा बहरली
पानोपानी ओजही सजले
डोळ्यांत कुणाच्या नीर निळे
हिरव्या तेजाने डोळे निवले
ये रे, ये रे ... अनंत याचना
जलदांचे अवगुंठन सरले
कोसळू लागल्या रेशिमधारा
धरतीचे मग मी पण सुटले !
© विशाल विजय कुलकर्णी
💬 प्रतिसाद
(4)
च
चांदणे संदीप
Sun, 06/25/2017 - 03:17
नवीन
कविता आवडली!
मी पण = मीपन??
Sandy
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 06/27/2017 - 06:08
नवीन
ते खरेतर 'मी'पण असे होते, मोबाइलमधल्या स्पेलचेक्याने काशी केली बहुदा ;)
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 06/25/2017 - 10:45
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 06/27/2017 - 06:09
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments