Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्याची गाडी

म — माम्लेदारचा पन्खा, Wed, 06/28/2017 - 06:18
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो फक्त आभास असेल एका ठिकाणाहून दुसरीकडे एवढाच तुझा प्रवास असेल हे एेकून अंतर्मुख झालो मी विचारलं एवढं फक्त आयुष्याला माझं वाटतं तरीही काहीच नाही माझं मग काय अर्थ आहे या धावपळीला ? हसलं आयुष्य आणि म्हणालं मला मी तुला अगदीच निराश नाही करणार अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !

प्रतिक्रिया द्या
7152 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पद्मावति Wed, 06/28/2017 - 09:51 नवीन
फारच सुरेख. वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो फक्त आभास असेल एका ठिकाणाहून दुसरीकडे एवढाच तुझा प्रवास असेलखरंय अगदी. हे लक्षात ठेवलं तर आयुष्य किती सुखकर होईल. अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार ! क्या बात है! खूप खुप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Wed, 06/28/2017 - 10:40 नवीन
खुप आवडली फारच सुरेख
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 06/28/2017 - 10:48 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/28/2017 - 12:23 नवीन
आहे जिलबी.. तरिही मनोहर. ;)
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Wed, 06/28/2017 - 12:28 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 06/28/2017 - 18:18 नवीन
"अनुभवांचं गाठोडं अन आठवणींची शिदोरी गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !" + १ ...मस्त
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले गुरुवार, 06/29/2017 - 10:17 नवीन
खूपच छान ! पण ...
गाडीतून उतरताना तुझं तुलाच परत देणार !
यापेक्षा .. 'गाडी चालू आहे तोपर्यंत भरभरून देणार' या अर्थाचं काही जास्त सुसंगत होईल असं वाटतं ! ;)
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 06/29/2017 - 15:19 नवीन
खरंय आयुष्य आहेच मुळी गाडी मनी फार चढाओढी पहिला डब्बा तो बालपणाचा गोडगोड खाऊ न द्वाडपणाचा दुसरा डब्बा शाळेचा हसत रडत घालवायचा तिसरा डब्बा कॉलेजमध्ये वेळ जाई पोरींमध्ये चौथा डब्बा नोकरीचा पाचवा नेहेमीच लग्नाचा सहावा वाटे नेहेमी असावा छकुल्यांचा आसरा सदैव लाभावा सातवा डब्बा काठीचा थेट वरच्या भेटीचा गाडी अशीच धावत असते इंजिन नेहेमीच बदलत असते डब्बे जोडत जोडत सुस्साट पळत असते मित्रा ,, आयुष्य वेचायचे असते , तिच्यासाठी जी आपलयाला जन्म देते , सोबत देते ... ती आई असते न दुसरी बायको असते ...........
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/29/2017 - 15:39 नवीन
बदा बदाबदा बदाबदा ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 06/29/2017 - 15:52 नवीन
बदा बदाबदा बदाबदा लिहिले आहे ...त्याच्या बाजूला जिलेबी पडायचं मशीन बसवलंय का दादा ? ....
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 06/29/2017 - 16:20 नवीन
गुर्जी खाकी गोळी संपली वाटत एम सील असेल देर्देकरांकडे मला पोचला आवाज तुमच्या अतृप्त आत्म्याचा मी बसलोय तुम्ही दिलेली खाकी गोळी शोधत वेदना फार होत असतील आवाजही फार फार येत असतील आषाढ चालू आहे ना .... आषाढीच्या कळा सोसत नसतील ... धैर्य बाळग जरा मनी सोबत देईल तुला यामध्ये माझी प्रेमळ बहीण .... जेनी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा