Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता :: II बॉस हा नेहमी बॉस असतो II

स — सिद्धेश्वर विलास पाटणकर, गुरुवार, 06/29/2017 - 11:47
बॉस हा नेहमी बॉस असतो तुमचा काय न आमचा काय एकदम झक्कास असतो आपल्या खाली वात लावून उजळतो कार्यालय सारे अन लख्ख प्रकाश टाकतो बॉस हा नेहमी बॉस असतो तुमचा काय न आमचा काय एकदम झक्कास असतो II नको वाईट वाटून घेऊ दुः ख समजतंय मला , मित्रा तू देखील आमच्या सारखाच येतोस कामावर बुडाखाली लावून पत्रा टक टक आवाज होई पत्र्याचा पत्रा निनादत राहे गरीब मेहनती कामकरूस तो ठोकुनी निरखुनि पाहे II बॉस वरचा क्लास असावा पाहताक्षणी तो उर भरावा पंचेन्द्रीयांनी सलाम ठोकावा जणू नकळत खाली भूकंप यावा II बॉसने शस्त्र हाती घेता होई पत्रासज्ज जनता मारे लाथ अन धरुन तो ठोके कुणासही न जुमानता II धावा धाव , काहूर ते माजे कुणी खुशामती तर कुणी बोले "मुजरा राजे " इतरत्र फक्त तो पत्रा वाजे टक टक टक …. अन टक टक टक …. बॉस हा नेहमी बॉस असतो तुमचा काय न आमचा काय एकदम झक्कास असतो II टक टक टक …. अन टक टक टक … सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
1390 वाचन

💬 प्रतिसाद (2)
R
Ranapratap गुरुवार, 06/29/2017 - 15:55 नवीन
बॉस नेहमी बॉस असतो, तुमच्या आमच्या गळ्याला फास असतो.
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… गुरुवार, 06/29/2017 - 16:25 नवीन
काही अंशी खरं आहे मी पण एक बॉस आहे म्हणून बरं आहे ....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा