मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
मांजर पाळण्यायोग्य प्राणी आहे का?
काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण.
पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?
💬 प्रतिसाद
(55)
अ
अहिरावण
Sat, 09/02/2023 - 10:03
नवीन
सध्या आहेत का हो तुमच्याकडे मांजरी?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 09/02/2023 - 15:55
नवीन
हो. वर ऊल्लेखलेल्या मांजरीची आठवी दहावी पिढी असेल.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Sat, 09/02/2023 - 17:34
नवीन
मांजर वृत्तीने घरातल्या लोकांशी लाडीगोडी करणारा, लळा लावणारा आणि तरीही स्वातंत्र्यप्रिय, खेळकर प्राणी आहे.
देशी मांजर पाळताना फारशी जिकीर नसते. वर्षातून एकदा लसीकरण करून घ्यावे लागते.
पर्शियन मांजर असेल तर ८-१० दिवसांनी आंघोळ घालण्याची आणि combing करण्याची जबाबदारी वाढते.
देशी मांजराला Cat food ची सवय विचारपूर्वक लावावी कारण ती कायमची जबाबदारी पत्करावी लागते.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 09/02/2023 - 17:43
नवीन
सहमत. मांजराचे वैशिष्ट्य म्हणजे बाधून ठेवावे लागत नाही, घाण करत नाही, चावत तर आजिबात नाही. पण माणसाळल्यामूळे स्वसंरक्शन विसरते नी रस्त्यावरील कूत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडते.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 09/03/2023 - 13:50
नवीन
मांजर दुसऱ्या कुणाला त्रास देत नाही.
>>रस्त्यावरील कूत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडते.>>
कारण ? कुत्रे उगाचच मांजरांना मारत नाहीत. कचऱ्यात कुणी मासळी साफ केलेली पुडी टाकली असेल तर मांजर ते खायला जाते. ते पाहून तिथले कुत्रे येऊन मांजराला मारतात आणि स्वतःही ती मासळीची पुडी उलगडून खात नाहीत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2