Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रावेरखेडी १

अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 07/01/2017 - 18:20
💬 29
www.misalpav.com/node/30970 मिसळपाव ही काय भानगड आहे हे माहित नव्हतं त्यावेळी श्री मोदक ह्यांचा हा लेख वाचला. बाजीराव पेशव्यांची समाधी मध्य प्रदेशात कुठेतरी आहे हे कळाल. लेख खुप छान होता. वडीलही इतिहास प्रेमी असल्याने त्यांनी सुध्दा पुन्हा पुन्हा वाचला. काही दिवसांनी मध्य प्रदेशात इंदौर च्या शंभर की.मी. अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावरील शाजापुर ह्या ठीकाणी पवनउर्जा कंपणीत नोकरी लागली. (आताही आहे.) कंपणीत सर्व भारतातील मुलं आहेत. पण जीतके मुलं आहेत त्यातल्या मराठी मुलांशी चांगली गट्टी जमली. श्री मोदक ह्यांचा लेख डोक्यात होताच एके दिवशी मी सर्वांना समाधी ला जाण्याचा बेत सांगीतला. पण म.प्र.शात अस काही असेल कोणाच्या गावीही नव्हते. तरी सर्व जण तयार झाले. रस्ता माहित नव्हता पण शोधून घेऊ ( ओवर काँन्फी. ) अशी तयारी करून आेमकारेश्वर व बाजीराव पेशवे समाधी अशी प्लानींग केली. कंपनीचे एक साहेब व्यक्ती मराठीच असल्याने त्यांना बेत सांगीतला.( गाडी चा जूगाड होईल म्हणून) त्यांनी देखील ऊत्साहात तयारी केली. (गाडी मिळाली.) आम्ही एकूण पाच लोक, चालक व बोलेरो सकाळी तयार झाली. सकाळी कुणालाही काही कळू न देता आपापल्या मार्गे रवाणा होऊन शहराबाहेर मिळावे असे ठरले.( पाच मध्ये सहावा वाढून बसायला अडचण होऊ नये म्हणून.). सकाळी ठरल्याप्रमाणे सर्व जमलो. व गाडी इंदोरच्या दिशेने रवाणा झाली.( रस्ता खराब) मुंबई आग्रा हाईवे हा मुंबई दे देवास पर्यंत चौपदरी आहे. आणि पुढे देवास ते ग्वाल्हेर दूपदरी व पुन्हा ग्वाल्हेर ते आग्रा चौपदरी.( सध्या देवास _ ग्वाल्हेर चौपदरी करण युध्द पातळी वर सुरू आहे) शाजापुर हुन इंदौर 100 km असल तरी रस्ता दूपदरी असल्याने ट्राफीक मुळे 3 तास लागतात.(च) सकाळी 8 ला आमजी गाडी निघाली. ड्रायवरची स्कील चांगली असल्याने त्याने अडीच तासात इंदौर टच केल. रस्त्यात देवास लागले. तीथे बस स्ट्यांड समोर टेकडीवर देववासीनी आणी तुळजा भवानी देवीची प्रसिद्ध मंदिरे आहेत. मी गाडीतल्या सर्वांना मंदीरांचा व देवासचे राजे पवार घराण्याचा ईतिहास सांगीतला.(देवास व धार धाकटी पाती मोठी पाती) आम्ही चार मित्रात एक कोल्हापुरातला., एक कराड चा, एक अकोल्याचा व मी धुळ्याचा. असे आम्ही चार व साहेब (बडोद्याचे) आम्ही सर्व नाश्त्या साठी इंदौर बाय पास ला थांबलो...... टीप= कृपया संभाळून घ्यावे. पहिल्यांदा (परिक्षा सोडून) कुठेतरी काही लीहीत आहे. क्रमश:
  • रावेरखेडी २
  • रावेरखेडी ३

Book traversal links for रावेरखेडी १

  • रावेरखेडी २ ›

प्रतिक्रिया द्या
14807 वाचन

💬 प्रतिसाद (29)
ए
एस Sat, 07/01/2017 - 18:51 नवीन
गुड. अजून लिहा. फोटो टाकायची कृती इतरत्र दिलेली आहेच. पुढील भाग लिहिणार असाल तर धाग्याच्या शेवटी 'क्रमशः' असे लिहावे. काही मदत हवी असल्यास साहित्य-संपादक यांना कळवावे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 18:57 नवीन
धन्यवाद. पुढे लीहीणार आहे. फोटोच तेवढ जमत नाहीये. पण प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 19:05 नवीन
धन्यवाद. पुढे लीहीणार आहे. फोटोच तेवढ जमत नाहीये. पण प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/01/2017 - 19:09 नवीन
उत्तम लेखांचे इथे स्वागतच होते. (मला पण सुरुवातीला फार टपल्या पडल्या होत्या...पण इथले सदस्य फार उत्तम स्वभावाचे आहेत....) लेख जमला आहे... मिपाच्या परंपरेला धरून २ चूका... (आम्ही वैयक्तिक सगळ्या चूका पचवू शकतो.पण "मिपा" हे सामाजीक आंतरजालीय स्थळ आहे. ) १. लेख थोडा मोठा हवा २. फोटो हवेत. (जमल्यास भटकंती ह्या विभागातील डॉ, सुहास म्हात्रे ह्यांचे धागे बघावेत,)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 19:24 नवीन
धन्यवाद मुक्त विहाली सर लेख मोठा च लिहायचा होता. पण पहिल्यांदा लीहुत असल्यानं आत्मविश्वास नव्हता. (पुढल्या वेळी चुक सुधारीण) आणि ह्या टप्पयात फोटो टाकण्यासारख काही नव्हतच.... त्यामुळे....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/01/2017 - 19:41 नवीन
इथे मला "मुवि काका" ह्या नावानेच ओळखतात. बस हमारे लिये इतना काफी़ है....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 20:03 नवीन
हो मुवि काका. मार्गदर्शन करत रहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 07/01/2017 - 20:47 नवीन
घंट्याचे मार्गदर्शन.... नविन सभासदाला सांभाळून घ्यावे, असे आम्हाला "गणपाने" जाणवून दिले आहे. "गणपा"ने त्यावेळी सांभाळून घेतले नसते तर, शायद हम यहां नहीं होते. (आता "गणपा" कोण? म्हणून विचारु नये."मिपावर" पा.कृ.च्या अनभिषिक्त बल्लवांपैकी ते एक आहेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
इ
इरसाल Mon, 07/03/2017 - 12:13 नवीन
मिपाचा प्रघात पाळणे आवश्यक असल्याने........... कोण हा गणपा ??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 07/04/2017 - 19:10 नवीन
आजकाल ते इथे जास्त नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
क
कपिलमुनी Sat, 07/01/2017 - 20:30 नवीन
विहाली आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जेनी... Sun, 07/02/2017 - 11:26 नवीन
मी पण मुवी काकाच म्हणते ... हो कि नै काका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 19:25 नवीन
धन्यवाद मुक्त विहारी सर लेख मोठा च लिहायचा होता. पण पहिल्यांदा लीहीत असल्यानं आत्मविश्वास नव्हता. (पुढल्या वेळी चुक सुधारीण) आणि ह्या टप्पयात फोटो टाकण्यासारख काही नव्हतच.... त्यामुळे....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 19:26 नवीन
धन्यवाद मुक्त विहारी सर लेख मोठा च लिहायचा होता. पण पहिल्यांदा लीहीत असल्यानं आत्मविश्वास नव्हता. (पुढल्या वेळी चुक सुधारीण) आणि ह्या टप्पयात फोटो टाकण्यासारख काही नव्हतच.... त्यामुळे....
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/01/2017 - 20:14 नवीन
बोलरोचा टाकला असता तरी आवडला असता. मस्त गाडी एकदम
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 07/01/2017 - 21:04 नवीन
अरे व्वा.. रावेरखेडी..!!!!! तुम्ही वर उल्लेख केला आहे त्या ट्रिप नंतर मी आणखी एकदा रावेरखेडीला जाऊन आलो. ते संपूर्ण गांव फिरून बघितले आणि तेथे एक "पँवार" नामक कुटुंबाच्या लग्नाची तयारी सुरू आहे असेही कळाले. आपल्याकडचे पवार आणि ते पँवार असाही काहीतरी संबंध असावा.. त्या विषयात फारसे गम्य नसल्याने नंतर पाठपुरावा केला नाही. लेख थोडा मोठा लिहा, कंस कमी करा आणि फोटो टाकाच. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे. (रावेरखेडीला भेट देऊ इच्छिणार्‍यांनी रस्ता / आणखी माहिती हवी असल्यास मला बिन्धास्त व्यनी करावा.)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 07/02/2017 - 10:37 नवीन
हे पवार नसून पंवार म्हणजे पहाडी लोक असतात. काही लोक स्वतः ला पन्वर असेही हिंदीत लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 23:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 23:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 23:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 07/01/2017 - 23:59 नवीन
फोटो काही अपलोड होईना. URL टाकला. Width height कीती ठेवायचीते सांगा. व alternative word काय घ्यावा? टीप = सदर खटाटोप मोबाईल वरन चाललाय
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 07/02/2017 - 04:18 नवीन
विड्थ 680 ठेवा, हाईट रिकामे सोडा आणि alternative text मध्ये एक डॉट टाका उभ्या फोटोना विड्थ 450 वगैरे ठेवा फोटो पब्लीक शेअर असुद्यात
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 07/02/2017 - 04:18 नवीन
विड्थ 680 ठेवा, हाईट रिकामे सोडा आणि alternative text मध्ये एक डॉट टाका उभ्या फोटोना विड्थ 450 वगैरे ठेवा फोटो पब्लीक शेअर असुद्यात
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 07/02/2017 - 13:28 नवीन
आभाार= http://www.misalpav.com/node/33685
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/02/2017 - 14:48 नवीन
प्रतिक, लेख चांगला होतोय. १) फोटो १ फ्लिकरवरच्या फोटोंच्या तीनचार लिंक्स असतात. दिलेली Link:https://www.flickr.com/photos/152194951@N02/35526459781/in/dateposted-public इथे चालणार नाही. फोटोवर क्लिक करून दुसरी बाणाखालची शेअरिंग लिंक वापरावी लागते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 07/02/2017 - 17:12 नवीन
फोटो १ मधून embed कोड कॅापी करून त्यामधला हा भाग <img src="https://farm5.staticflickr.com/4210/34847616863_7224e681fb_z.jpg" width="480" height="640" alt="IMG_20170106_172041"> वापरल्यावर आलेला फोटो- Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 07/03/2017 - 13:30 नवीन
मिपावर स्वागत. लिहा अजून. मलाही रावेरखेडीला कधीतरी जायचे आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 07/04/2017 - 15:14 नवीन
पुभाप्र!!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Wed, 07/05/2017 - 06:46 नवीन
आणि हो, जमतंय तुम्हाला. लिहा बिनधास्त.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा