Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुपारच्या कविता.

र — रामदास, Tue, 10/14/2008 - 15:37

प्रतिक्रिया द्या
8724 वाचन

💬 प्रतिसाद (23)
व
विनायक प्रभू Tue, 10/14/2008 - 15:54 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आता ह्या समस्येवर उपाय पण लिहा.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 10/14/2008 - 16:21 नवीन
कविता (नेहमीप्रेमाणेच) आवडली. आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..." त्या सुंदर कवितेत (आणि बाळासाहेब नि लताबाईनी अजरामर केलेल्या गाण्यात !) असा घरगुती, घरंदाज गोष्टी येतात. "नाही कशी म्हणू तुला , विडा रे दुपारी . परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी..." रामदासांच्या कवितेत नवपरिणित पत्नीच्या भावना "टच टच" वाजणार्‍या जोडव्यांच्या प्रतिमेत फारच सुंदर व्यक्त झाल्यात. ग्रेसच्या एका लेखात "तांदूळ मोजणार्‍या मुली" येतात - "निवडणार्‍या" नव्हे , "मोजणार्‍या" . इथे तीळ आहेत. या "मोजण्यातून" अशा , संसाराच्या गाड्यात अडकलेल्या आणि प्रसंगी हळुवार भावनांची परवड होणार्‍या स्त्रियांची व्यथा अधोरेखित होते. रामदास यांच्या कवितेतून पूर्वसुरींच्या दिग्गजांची आठवण येते. (मागच्या एका कवितेच्या बाबतीत जी ए / डाहाके यांचा मी उल्लेख केला होता.) आज सत्यकथा असती तर त्यांच्या कविता तिथे आल्या असत्या असे वाटते. मिसळपाववरील थिल्लरपणाचे आरोप करणार्‍याना या कविता दाखवाव्यात. तेव्हढे बस्स आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळ Tue, 10/14/2008 - 17:46 नवीन
मला वाटते हे तीळ आहेत ते अंगावरचे असावेत आणि कविता श्रुंगारिक अर्थाने असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अभिजीत Tue, 10/14/2008 - 17:07 नवीन
सुंदर कविता. >>आरती प्रभूंची कविता आठवते : "नाही कशी म्हणू तुला ..." मलाही असेच वाटले.. त्याच बरोबर आरती प्रभूंची थोडिशी आक्रमक असलेली 'लव लव करी पातं' ही कविताही आठवली त्यातले हे एक कडवे - तट तट करी चोळी तुट तुट गाठीची उंबर्‍याशी जागी आहे पारुबाई साठीची - अभिजीत
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 10/14/2008 - 17:50 नवीन
तीळ मोजून संपले पुरे झाली शिकवणी. छान आहे कविता. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/14/2008 - 17:52 नवीन
छानच! पण पहिली लयीत म्हणायला मला कठिण जाते आहे...
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 10/14/2008 - 18:56 नवीन
'माडीवरती येऊ कशी' केल्यास कसें? ठुमकणारी लय मिळते...लहान मुलांच्या गाण्यातली (वृत्त वगैरे आपल्याला समजत नाय बॉ...) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Tue, 10/14/2008 - 19:22 नवीन
टच् टच वाजती जोडवी किण् -किण करती काकण माडीवर कशी येऊ दारात आईची राखण. असे काही मला ठीक वाटते. पण स्वर ओढून ताणून जसे लिहिले आहे तसेही म्हणता येते : टच् टच वाजती जोडवी किण्ऽ -किणती काकण (किंवा किण् -किणतीऽ काकण) माडीवर कशी येऊ आई दारात राखण. (ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते. राखण=राखणदार असा अर्थ असल्यास ठीक आहे. पण हा अप्रसिद्ध अर्थ डोक्यात येईपर्यंत ओळ संपली नाही असे चुकल्याचुकल्यासारखे वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Tue, 10/14/2008 - 19:25 नवीन
>>ठेका ठीक आहे, पण वाक्य अर्धवट वाटते सहमत. मी फक्त ठेक्याचाच विचार केला (नेहेमीप्रमाणे) :( --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
र
राघव गुरुवार, 10/16/2008 - 15:40 नवीन
चालेल - दारात आईची राखण. दारी आईची राखण. बाकी कविता छानच. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बेसनलाडू Tue, 10/14/2008 - 18:51 नवीन
नेहमीप्रमाणेच छान! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 10/14/2008 - 19:18 नवीन
कविता, आवडली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/14/2008 - 20:56 नवीन
रामदासराव, वा वा! सुंदर कविता... आपला, (दुपारच्या वेळेला हळूच कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तात्या. ;)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 10/14/2008 - 23:43 नवीन
(दुपारच्या वेळेला हळूच कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तात्या.
आगायायायाया =)) =)) =)) च्यायला .. ह्यो तात्या अंमळ चालु माणुस दिसतोय .... डेंजर टाकलाय एकदम .... अवांतर : कविता अंमळ भावली आहे.. आम्ही दृष्य इमॅजिन (मराठी शब्द) करु शकतो .. जबर्‍या (कोणत्याही वेळेला हळूच कुठे काही चान्स मिळतोय का ते पाहणारा!) तार्‍या आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अरुण मनोहर Wed, 10/15/2008 - 04:29 नवीन
वही नको बुकं नको नको आता उजळणी तीळ मोजून संपले पुरे झाली शिकवणी. मस्त कविता. थीअरी घोटून पाठ झाली आता प्रॅक्टीकलचा तास सुरू कराना!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 10/15/2008 - 04:39 नवीन
कशा सुचतात हो तुम्हाला अशा सुंदर कविता :-) नेहमी सारखी खुप सुंदर कविता, अजुन येवुद्यात. टुकुल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/15/2008 - 06:31 नवीन
अती अवांतर :एक तीळ सात जणात वाटला हे उगाच आठवले ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/15/2008 - 07:11 नवीन
तिळा तिळा दार उघड का नाही आठवले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विसुनाना Wed, 10/15/2008 - 06:50 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/16/2008 - 15:45 नवीन
मस्त आहे प्रणयकविता !! आमच्या धोंडोपंतांची ही दुपारची कविता आठवली !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/16/2008 - 16:02 नवीन
तारुण्यविभोर भावअवस्थेचे सुंदर वर्णन. आम्हालाही- कसा ग गडे झाला ? कुणी ग बाई केला ? राधे, तुझा सैल अंबाडा ची आठवण झाली :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 03/20/2013 - 08:09 नवीन
खुपच सुंदर !!
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 03/22/2013 - 07:38 नवीन
कविता वाचून मन अगदी 'तिळ तिळ' तुटलं हो !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा