Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टाटा टियागो- पेट्रोल.

स
सतिश पाटील
Fri, 07/07/2017 - 08:57
🗣 47 प्रतिसाद
घरगुती वापरासाठी ४ जण बसतील अशी ४ चाकीचा शोध घेत असताना टाटा टियागो नजरेत आली. एकंदरीत गाडी फारच सुंदर आहे, आणि मुख्य म्हणजे बजेट मधे देखील.माझा वापर म्हणजे शनिवार रविवार भटकंती आणि वर्षातून ४- ५ वेळा गावी जाण्यासाठी. म्हणजे वार्षिक वापर १०-१२ हजार किमी. त्यासाठी टाटा टियागो पेट्रोल XM-O हे मॉडल पसंत पडले. भरपूर सारे फीचर आणि एयर ब्याग सहित सध्या ही गाडी ओन रोड ५.१० लाखात मिळतिए ( यामधे अजुन डिस्काउंट आणि GST नंतरची कमी झालेली किंमत धरलेली नाही ). फक्त म्युसिक सिस्टम आणि पार्किंग सेंसर बाहेरून घ्यावे लागतील. शोरुममधे त्या बाईने सुरुवातीलाच खुप डिमांड असल्याने टिगोर अणि टियागो गाड्यांवर कुठलाच डिस्काउंट मिळणार नसल्याचे सांगितले. चांगला डिस्काउंट किंवा दिवाळी ऑफर्स मिळणार असतील तर तो पर्यंत थांबयला मि तयार आहे. हायवेला २० आणि शहरात १६ चा मायलेज मिळेल अस ती म्हणत होती. बाकी क्विड , रेडी गो , मारुती सेलेरिओ यापेक्षा ही गाडी फारच उजवी आणि ग्रैंड आय १०, व्यागन आर यापेक्षा ही गाडी खुपच स्वस्त वाटली. आपल्यापैकी कुणी ही गाडी वापरत असल्यास किंवा जाणकार लोक आणखी सुचना, प्रकाश टाकू शकतील का?

प्रतिक्रिया द्या
12538 वाचन

💬 प्रतिसाद (47)
ए
एस Fri, 07/07/2017 - 10:48 नवीन
घेऊन टाका. एक नंबर गाडी आहे. रिव्हर्स पार्किंग सेन्सर बसवून घ्या. खूप सोयीचं पडतं.
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Fri, 07/07/2017 - 11:07 नवीन
मारुती सुझुकी बलेनोची टेस्ट राईड घेऊन पहा. . . खूप स्पेसिअस आहे, मी स्वतः वापरतोय
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 07/07/2017 - 11:22 नवीन
पण बलेनोची बेस मॉडल अणि टियागो XM-O मधे 1.२५ लाखाचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन५८८
न
नितिन५८८ Fri, 07/07/2017 - 11:25 नवीन
पण मारुती सुझुकी असल्यामुळे मेंटेनन्स कमी आणी spare पार्टस पण स्वस्त पडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
स
सतिश पाटील Fri, 07/07/2017 - 12:03 नवीन
आपला सल्ला विचाराधीन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन५८८
प
प्रसन्न३००१ Mon, 07/10/2017 - 08:06 नवीन
बलेनोला ७ महिने वेटिंग आहे असं ऐकलंय सगळीकडे, त्यामुळे हा मुद्दा पण गृहीत धरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
म
मराठी कथालेखक Fri, 07/07/2017 - 12:05 नवीन
मारुतीचे मेन्टेन्स / स्पेअर्स स्वस्त असं आपण समजतो. पण ते खरंच आहे का ? कुणाचा यावर काही अभ्यास आहे का ? मी टाटाची विस्टा (डिजेल) पाच वर्षांपासून वापरत आहे. मेंटेनन्स फारसा खर्चिक नाही. मी अनेकदा ओला/उबेरच्या कॅबने फिरतो अनेकदा ती कार टाटाची व्हिस्टा असते, दीड-दोन लाख किमी चाललेली कार असेल तर मी कधी त्या चालकाला कारच्या देखभाल्/दुरुस्तीच्या खर्चाबद्दल विचारतो. बहुतेक करुन चालकाचे उत्तर असते की "फारसा खर्च नाही काढला अजून" मी स्वतः जुनी मारुती ८०० पाच वर्षे वापरली. तिची देखभाल दुरुस्ती मी अधिकृत सर्विस सेंटरला करत असे. मला काही ती अगदी कमी खर्चिक वगैरे वाटली नाही. अर्थात ८०० हे खूप जून डिझाईन आहे नवीन मॉडेल्समध्ये मारुतीनेही सुधारणा केल्या असतीलच. "मारुतीचे मॉडेल्स वाईट" असं मला म्हणायचं नाही पण "मारुती सुझुकी असल्यामुळे मेंटेनन्स कमी आणी spare पार्टस पण स्वस्त" हे गृहीतक पुन्हा एकदा ताडून बघायला हवे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन५८८
व
विशुमित Fri, 07/07/2017 - 12:16 नवीन
माझाकडे पण टाटा ची इंडिका (DLS ) डिझेल कार आहे. पण नियमित सर्व्हिसिंग आणि एकदा टायर बदलण्या व्यतिरिक्त देखभालीचा इतर खर्च अजून तरी काही आला नाही. ही इंडिका देऊन Tiago घेण्याच्या विचारात आहे. चर्चा वाचतोय... मग विचार पक्का करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 07/07/2017 - 12:26 नवीन
इंडिका देऊन Tiago
पण टियागो तुलनेने लहान गाडी आहे. स्पेस कमी आहे (एकदा टेस्ट घेतली होती लेग रुम कमी वाटला, सीट्स पण थोडे कमी रुंदीचे वाटलेत) बाकी गाडी चालवायला अगदी सोपी, स्टिअर करणं एकदम छान वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
त
त्रिवेणी Fri, 07/07/2017 - 12:40 नवीन
झेस्टAMT दोन वर्षे झाली वापरतोय. मस्त चालतेय एकदम. टाटा न च्या गाडीचा ग्राउंड कलेअरन्स चांगला असतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/07/2017 - 13:11 नवीन
इंडिका व्हिस्टा डिझेल रॉक्स. सहा वर्षं विनातक्रार सर्व्हिस देतेय. मायलेजही २४-२५ किमीप्रलि.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 07/07/2017 - 13:57 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सतिश गावडे Fri, 07/07/2017 - 17:42 नवीन
माझ्या दोन कार्यालयीन मित्रांकडे टाटा टियागो आहेत. आणि ते आपल्या गाडीच्या निवडीवर खुश आहेत. :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Sun, 07/09/2017 - 17:31 नवीन
मी आत्ताच Hyundai Grand i10 बघून आलो. मला आवडली. नवीन एकोळी धागा काढण्या परिस इथेच कोणी सांगाल काय कशी आहे ती.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 07/09/2017 - 19:43 नवीन
मी आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात वाईट गाडी. इतर मॉडेल्सच्या तुलनेत जास्त किंमत, जास्त सर्व्हिसिंग कॉस्ट, वाईट सस्पेंशन, फक्त बारा किमीचा मायलेज, छोटी जागा. ड्रायव्हिंग जरा स्मूद आहे इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्रमोद देर्देकर Mon, 07/10/2017 - 02:22 नवीन
धन्यवाद एस साहेब. आता दूसरी गाडी बघणे आले. कोणी धाग्यात उल्लेखलेल्या गरजेसाठी एखादी गाडी सुचवाल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Tue, 07/11/2017 - 15:09 नवीन
i10 ग्रँड ही स्विफ्टच्या कॅटेगरीतली गाडी आहे. तेव्हा तुम्ही त्या कॅटेगरीतल्या पोलो, पुंटो, बोल्ट, मायक्रा, फिगो इत्यादी गाड्या पाहू शकता. स्विफ्टचे नवीन मॉडेल या वर्षीच्या शेवटी लाँच होण्याची शक्यता आहे. ते कसे दिसेल ह्याची एक झलक तुम्ही डिझायर ह्या नव्याने लाँच झालेल्या मॉडेलवरून पाहू शकता. मला टाटाची बोल्ट मग व्हॅल्यू फॉर मनी वाटली ह्या कॅटेगरीत. किंवा नवीन स्विफ्ट येईपर्यंत थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
क
कपिलमुनी Sun, 07/09/2017 - 20:31 नवीन
टाटा टिगोर कशी आहे ? झेस्ट आणि टिगोर मध्ये कोणती चांगली आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 07/09/2017 - 21:13 नवीन
बालेनोबद्दल कोणी बैजवार लिहिल काय? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 07/10/2017 - 03:07 नवीन
बलेनो मजबूत नाही. साध्या अपघातात देखील गाडीचे प्रचंड नुकसान आणि आत बसलेल्या लोकांना दुखापती होतात असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ए
एस Mon, 07/10/2017 - 03:52 नवीन
चंदीगडच्या अपघाताबद्दल बोलत असाल तर इतक्या भयानक वेगाने गाडी चालवून आदळल्यास जगातली कुठलीही कार तुम्हांला वाचवू शकणार नाही. भारतातही आता सर्वच कारना युरोपियन एनकॅप रेटिंगशी समकक्ष अशा सुरक्षा चाचणीस सामोरे जावे लागणार अशी घोषणा मध्यंतरी झाली होती. ते होता होता किती दिवस जातील ह्याची कल्पना नाही. ऑटो उत्पादक सहजासहजी ते होऊ देणार नाहीत. कारण एनकॅप रेटिंग मध्ये पास व्हायचे तर गाडीला किमान सहा एअरबॅग्स आणि भक्कम जाडजूड बॉडी असणे अत्यावश्यक असेल. विचार करा, अल्टोबिल्टो ला सहा एअरबॅग लावल्या तर ती इतक्या कमी किंमतीत विकणे शक्य होईल का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Mon, 07/10/2017 - 05:54 नवीन
ऑक्टोबर २०१७ पासून भारतात देखील कारला एअरबॅग्स असणे अनिवार्य होणार आहे. झाले तर उत्तम होईल. सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर ऑटो उत्पादक काहीही करू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Mon, 07/10/2017 - 03:45 नवीन
'प्रीमियम हॅचबॅक' या श्रेणीतील ह्युंदाई आय ट्वेन्टी आणि होंडा जॅझ यांच्याबरोबर स्पर्धा करायला मारुती सुझुकीकडे गाडी नव्हती. ही कसर बलेनोने भरून काढली. आणि या श्रेणीतील आता सर्वात जास्त वैशिष्ट्ये सर्वात कमी किंमतीत देणारी ही गाडी आहे. 'बलेनो' ह्या नावाचा जुन्या बलेनो मॉडेलशी काहीच संबंध नाही. बलेनो म्हणजे स्पेस, स्पेस आणि स्पेस. आतून गाडी खरोखरच मोठी आहे. भरपूर लेगस्पेस आहे. सीट्स कम्फर्टेबल आहेत. पुढच्या सीट मागे रेलल्या तरी मागे बसलेल्यांच्या गुडघ्यांना टेकत नाहीत आणि मागे तीन जण अगदी आरामात बसू शकतात. बूटस्पेस ही जॅझपेक्षा थोडीशीच कमी आहे.गाडीची लांबी ३९९५ मिमी आहे. लांब व्हीलबेस, रुंदीही जास्त आहे. हेडरूम थोडी कमी आहे. इंजिन अगदी स्मूथ आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १.२ लि. तर डिझेल व्हेरिएंट मध्ये १.३ लि. येते. बलेनो ही स्विफ्टपेक्षा शंभर किलोग्रॅमने हलकी आहे. त्यामुळे चालवायला निंबल आणि पिकअप जास्त आहे. पेट्रोलचा अॅव्हरेज २१ तर डिझेलचा २७ आहे. मला पेट्रोल व्हर्जन शहरात एसी चालू ठेऊन १६-१७ चा देते. गाडी दिसायला काही लग्झरी कार्सच्या डिझाईनवर बेतलेली आहे. हेड टर्नर. कुठे थोडा वेळ थांबलो की लोक हमखास विचारतात गाडीबद्दल. बलेनो ही दिसायला मला अत्यंत एलिगंट आणि सोबर गाडी वाटली. होंडा जॅझसुद्धा दिसायला चांगली आहे. पण तिचे टोयोटा इनोव्हासारखे रूप हे कारसारखे वाटत नाही. ह्युंदाई आय ट्वेन्टी ही मला भडक मेकअप करून लोकांची वाट बघणाऱ्या स्त्रीसारखी वाटते. तेव्हा त्या गाडीकडे मी बघतही नाही. सुरक्षिततेबद्दल विचाराल तर ड्युअल एसआरएस एअरबॅग्स आणि एबीएस विथ इबीडी हे सर्व व्हर्जनना डिफॉल्ट आहे. त्याचा खूप फायदा होतो. विशेषतः फोक्सवागेन पोलोवाले लोक बलेनोला कमकुवत कार म्हणतात, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. त्यांची इंडियन पोलो ही युरोपियन पोलोइतकी सेफ नसते हे ते सोयीस्कररित्या विसरतात किंवा त्यांना माहीतच नसते आणि फेसबुक वगैरेवर ते पोलोवर कसा हत्ती बसला तरी गाडीतील लोक सुरक्षित राहिले याचे व्हिडियो शेअर करत बसतात. ;-) सुझुकीचा पत्रा हा टाटाच्या गाड्यांइतका स्ट्राँग नसतो. तरीही युरोपियन एन कॅप रेटिंगमध्ये भारतीय हॅचबॅक पैकी कुठलीही गाडी पास होऊ शकेल की नाही याबाबत शंकाच आहे. आपण गाडी नीट चालवली तर फ्रंट इम्पॅक्टमध्ये जीवाला तितका धोका नसेल. शिवाय ह्या पेक्षा स्वस्त मॉडेल्समध्ये तर तीही फीचर्स नसतात. सुझुकी बलेनोचे सस्पेंशन डिसेंट आहे. अगदी मर्सिडीजसारखे नाहीये, पण म्हणून ह्युंदाईवाल्यांनी बलेनोला नवे ठेऊ नयेत. ह्युंदाई आय ट्वेन्टीचेही जास्त भारी वगैरे नाहीये. बाकी इतर फीचर्स वगैरे बहुतांशी सर्व आहेतच. इतके फीचर्स तुम्हांला त्याच किंमतीत इतर कुठल्याही गाडीत मिळणार नाहीत (प्रोव्हायडेड, टाटा त्यांचे या श्रेणीतील एखादे वाहन घेऊन येत नाहीत तोवर). मारुती सुझुकी असल्यामुळे सर्व्हिस व मेंटेनन्स कॉस्ट कमी असणारच हे सांगायला नको. नेक्सावाले चांगली सेवा देतात. पुढील सर्व्हिसिंग वगैरे हे एमजीएमच्या नेहमीच्या सर्व्हिस सेंटरला होते. त्यामुळे तोही प्रश्न नाही. आणि राहता राहिला पुनर्विक्रीचा प्रश्न, तर सुझुकीच्या गाड्यांना पुनर्विक्रीमूल्य हे नेहमी सर्वाधिक मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 07/10/2017 - 04:29 नवीन
एसभाउ, मस्त पोस्ट. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
व
विशुमित Mon, 07/10/2017 - 07:06 नवीन
छान माहिती... धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मैत्र गुरुवार, 07/13/2017 - 18:35 नवीन
कार चे लुक्स हे खूप वैयक्तिक मत असतं. उदाहरणार्थ मला इको स्पोर्ट चे front grill अजिबात आवडत नाही. फारच horrible वाटते. पण माझ्या एका सहकार्याने orange eco sport आवडीने घेतली जी मला भडक वाटते काही जणांना Verna स्टायलिश वाटते तर काही जणांना Vento चे सोबर डिझाईन पसंत पडते. i20 चे डिझाईन प्रिमियम हॅचबॅक चा बेंचमार्क समजले जाते आणि बरीच स्पर्धा येऊनही त्या मध्ये बदल नाही. ईंटीरिअर आणि फीचर्स मध्ये ह्युंडाई सर्वात उत्तम आहे. कारण तो त्यांचा सेलिंग पाॅईंट आहे. ह्युंडाई सहसा passenger comfort and premium feel यावर भर देते. बलेनो चे तीन महत्त्वाचे गुण जास्त रूंद आहे. त्यामुळे i20 आणि jazz पेक्षा स्पेस आहे. Infotainment system सगळ्यात चांगली आहे मायलेज, कितना देती है हा मारूती चा सेलिंग पाॅईंट. सर्वोत्तम मायलेज. ह्युंडाई चालूगिरी करून live mileage meter देतच नाही आणि अर्थातच कमी आहे. एक थोडा फायदा, थोडा तोटा - बलेनो फक्त 865 किलो kerb weight आहे. त्यामुळे जास्त मायलेज आणि कमी स्पीड वर उत्तम रिस्पॉन्स. या आकाराची गाडी कमी वजनाची असल्याचे तोटे स्वाभाविक आहेत. Jazz 1006kg, i20 1066 kg व्हील बेस i20 चा सर्वात जास्त आहे. पण आतल्या जागेत खूप फायदा नाही. पण दुसरा एक फायदा होतो. Wheelbase गाडी ची stability वाढवतो. i20 पेट्रोल ही काहीशी sluggish आहे. गिअर बदलावे लागतातच आणि सुरवातीला जो टाॅर्क लागतो तो बलेनो चा खूपच उजवा आहे. कारण ही स्वाभाविक आहे. कागदावर दोन्ही तिन्ही गाड्या जवळ आहेत bhp, torque यामध्ये, पण हॅंडलिंग मध्ये फरक आहे. यात बलेनो चांगली आहे. स्पोर्टी zippy गाडी आहे. सस्पेन्शन i20 चे निर्विवाद पणे सगळ्यात उत्तम आहे. बलेनो वाईट अजिबात नाही. चांगलीच आहे. i२० या बाबतीत नक्की उजवी आहे. मला i20 आणि मर्सिडीज दोन्ही चा रेग्युलर अनुभव आहे. आणि बलेनो विचारात घेतली होती, त्यामुळे दोन ठिकाणी टेस्ट केली. NCAP सेफ्टी रेटिंग तिन्ही चे जवळपास आहे. भारतीय पोलो युरोप पेक्षा फरक असला तरी भारतीय गाड्यांमध्ये सर्वात चांगला स्कोअर आहे. 2016 युरोपियन NCAP मध्ये तिन्ही गाड्या दोन एअर बॅग सह चार तारे मिळवून आहेत. i20 2015 पूर्वी पाच तारे होते. जास्त शहरात वापर, कम्फर्ट, रिच फील, स्मूथ आणि लूकस i20 उत्तम मायलेज, चांगला पिकअप, ड्रायव्हर फन, नवीन लूक बलेनो होंडा इंजिन, प्रिमियम, jazz सर्व्हिस मारूती सर्वात उत्तम, होंडा त्रास. ह्युंडाई अतिशय चांगला अनुभव, महाग स्पेअर्स रिसेल मारूती नेहमी चांगला. i20 रिसेल मध्ये चांगली टक्कर देते. कार ही आवड आणि कल असतो. गरज, प्राधान्यक्रम आणि खिसा या तीन गोष्टी वर फायनल माॅडेल ठरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अजया Mon, 07/10/2017 - 09:50 नवीन
बलेनो बघणे आले. - एक समाधानी होंडा जॅझधारक. आधीच्यासारखी मिळाली असती तर कायम होंडा जॅझच घेतली असती. पण ते माॅडेल आता बंद झालेय. नुकतीच इतर गाड्यांबाबत चर्चा सुरु झालीये घरी आणि हा धागा आला!
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Tue, 07/11/2017 - 11:39 नवीन
सुझुकी सेलेरियो कशीये मग ? स्वतः घेणार नसलो तरी जवळपास रोज जातोय याच गाडीतून .. जागा आहे गाडीत.. मस्त वाटली
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Wed, 07/12/2017 - 07:44 नवीन
मारुतीच्या सर्विस्चा दोन वेळा अनुभव आल्याने मी ती गाडी नको म्हणत होतो. ऑफिसच्या बाजूला नेक्साचे शोरुम आहे ओफिसमधे वेळ जात न्हावता म्हणून तिकडे इग्निस पहायला गेलो, बेस मॉडल ५.३५ लाखात पॉवर स्टेरिंग , पुढच्या २ पॉवर विंडो, एबीएस, २ एयर बैग्स, EBD एवढे सगळ देतायत गाडी बाहेरून चिवित्र वाटते पण आतून बरीच प्रशस्त आहे. भरपूर लेगरूम अणि बुट्स्पेस आहे. मायलेज फक्त टियागो पेक्षा ३ ने कमी आहे. टियागो ४ पॉवर विंडो आणि एयर बैग सहित ५.१० लाखात पड़तीये. त्यात एबीएस अणि EBD नाही. इग्निस टियागोला चांगला पर्याय वाटतोय. पण यूजर रीविव टियागो एवढे चांगले नाहीत. खास करुन मायलेज बद्दल.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 07/12/2017 - 09:19 नवीन
इग्निस पुढे मार्केटमध्ये कितपत चालेल याबाबाबत शंका आहे. नाहीतर गाडीचे इंजिन वगैरे सगळे बलेनोप्रमाणेच आहे. इग्निसचे ऑटोमॅटिक व्हर्जनही चालवायला फार छान वाटले. पण बजेट पाहून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
अ
अभ्या.. गुरुवार, 07/13/2017 - 06:49 नवीन
इग्निसचे मागच्या पिलरमुळे रेनॉ लोगन होणार आहे. इतका मोठा पिलर ट्रँगल देण्याऐवजी एक छोटी विंडो किंवा व्हेन्ट बसला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस गुरुवार, 07/13/2017 - 14:43 नवीन
हो, एक जपानी कार होती Fronte Coupé म्हणून. त्या कारवरून इग्निसचा तो C पिलर डिझाईन केलाय. पण त्यामुळे इग्निस ही कार अजूनच विचित्र दिसते.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 07/13/2017 - 15:23 नवीन
धागा टियागोचा पण टियागोबद्दल कुणी जास्त बोलत नाहीये ....!!
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Fri, 07/28/2017 - 07:39 नवीन
सतिश पाटील टाटा Tigor बघून या कि एकदा
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 07/28/2017 - 08:40 नवीन
टियागोपेक्षा तीच जास्त आवडली होती. पण किंमत १.५ लाख जास्त आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Fri, 07/28/2017 - 08:54 नवीन
मी स्वतः आधी कोणालाही न विचारता मारुती Celerio book केली होती (माझे बजेट तेवढेच होते ), पण घरी सांगितल्यावर, घरचे थोडे पैसे द्यायला तयार झाले मग Wagnor बुक करायला गेलो आणि तिथे Baleno बघितली (servicing ला आली होती). मग काय घरातून आणखी थोडे पैसे मागून घेतले आणि फायनल Baleno बुक केली. सांगायचे तात्पर्य एवढेच कि जी गाडी आवडेल ती बुक करून टाका.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 07/28/2017 - 19:20 नवीन
Ecco घ्या बेस्ट आहे, मी घेतली आहे, अगदी हातपाय पडून पैसे गोळा केले व वापरलेली गाडी घेतली. उत्तम आहे, माझा व्यावसायिक हेतू असल्याने मी परमिटची घेतली एवढेच.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Fri, 07/28/2017 - 20:06 नवीन
टाटा ची नेक्सान (Nexon) होतीये लाँच सप्टेंबरमध्ये , मीडिया राईडस चालू झाल्यात , सगळ्यांचा म्हणण्यानुसार खूप चांगली गाडी आहे.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Fri, 08/11/2017 - 06:43 नवीन
कोणती गाडी घ्यायचं ठरलं?
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 08/11/2017 - 09:29 नवीन
अजुन तरी टियागोच ठरलीए. दिवाळी पर्यंत येइल.
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ गुरुवार, 08/24/2017 - 11:56 नवीन
If anybody wants to buy a TATA MOTORS new car, please call me There is a 5000rs discount under the brand ambassador scheme of company. Exchange offer up to 30000Rs. on old vehicle also available. Vaibhav Nikam TATA MOTORS 07722076628 Vaibhav Nikam Quality Assurence (Engine)|Tata Motors Ltd. Commercial Vehicle Buisness Unit |Pune (020 – 6613 5124 | Mobile: 7722076628 Email: Vaibhav.nikam2@tatamotors.com
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 10/13/2017 - 11:43 नवीन
टाटा कंपनीत उच्च पदावर असलेल्या एका ओळखीच्या व्यक्तिकडून २.६५ लाखात zx टॉप मॉडल घेतली. अलॉय व्हील, एबीएस, एयर बैग, इनबिल्ट म्यूजिक सिस्टम, अणि AMC असलेली ४७००० किमी वापरलेली २०११ ची गाड़ी. व्यवस्थित देखभाल केली होती, आवडली म्हणून दसर्याच्या दिवशी घेउन टाकली. भरपूर ट्राफिकमधे एसी लावून १५ चा मायलेज दिलाय. अजुन हायवेला लॉन्ग ड्राइवला वापरली नाही. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/13/2017 - 14:17 नवीन
अभिनंदन! चांगले डील मिळालं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
स
सतिश पाटील Fri, 10/13/2017 - 14:23 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुबोध खरे Fri, 10/13/2017 - 11:58 नवीन
उत्तम काम केलंत. इंडिका ही अतिशय दणकट गाडी आहे. माझ्या नौदलातील दोन मित्रांचे ट्रक बरोबर अपघात झाले असतानाही दोघे ओरखडा सुद्धा न येता सहीसलामत बाहेर आले. इंडिकाचा ए सी आणि सस्पेंशन अतिशय उत्तम असते आणि आत मध्ये जागा भरपूर असते. ही गाडी आपल्याला पुढची पाच वर्षे तरी काहीही त्रास न येता वापरता येईल. इंडिकाचा एकच अवगुण(drawback) आहे. त्याला snob value नाही. पण रस्त्यावर महागात गाड्या आपल्या जवळ येत नाहीत. धक्का लागला तर आपला खर्च 4 आकड्यात आणि त्यांचा 5 आकड्यात येत असल्यामुळे असे साजूक लोक दोन हात लांबच राहतात. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Fri, 10/13/2017 - 12:34 नवीन
धन्यवाद खरे साहेब. एसी अणि सस्पेंशन खरेच चांगले आहे. अणि जागा भरपूर आहे. मागे सोफ्यासारखी सिट आहे. ३ जण आरामत बसतात. अणि स्नॉब व्याल्यु गेला उड़त. आपल्याकडे दूसरी एक टोयोटा ची गाड़ी आहे जी मी टूरिस्टला वापरतो.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 10/13/2017 - 14:50 नवीन
सस्पेंशन सोडून बाकी सर्व बाबतीत सहमत ! होंडा , ह्युंदाई , फॉक्सवॅगन यांचे सस्पेंशन टाटा पेक्षा चांगले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा