Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

II नऊची ती बस खास होती II

स — सिद्धेश्वर विलास पाटणकर, Fri, 07/07/2017 - 11:24
नऊची ती बस खास होती आतुर व्हायचो उठताक्षणी कधी एकदा गाठतो नटून थटून आलेली महाराणी लगबग चालू असे नेहमी आईची ती सारखी बडबड आताच लागला कामाला तर एवढी तुझी फडफड जणू गावात लग्न अन कुत्र्याची हडबड II तुका झाला होता तिच्यासाठी जीव माझा ज्ञानेश्वर सोपान अंतरी ते कपाळी सदैव तिच्या नावाचा टिळा होता II लाली पावडर लावून रोज धावायचो बघायचे राहून गेलेच तर रिक्षातल्या आरशात थोबाड बघायचो दोन रुमाल नेहमी खिशात सदैव दिमतीला असायचे ती येण्यापूर्वी एक थोबाड पुसण्यास अन नाही आली तर दुसऱ्यानं डोळे पुसायचे II दिवस असेच ढकलत होतो तिकिटावर तिकीट काढत होतो प्रवासी वाढत होते बसला तिच्या आजूबाजूला बसण्यासाठी झुरत होतो II सोबतच्या एका प्रवाशाने माझेच तिकीट कापले बघता बघता एके दिवशी त्यांच्या लग्नाचे पेढे वाटले जळून स्वप्नाची राख झाली नऊची बस आता बस्स झाली II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
785 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा