कॅनडामधील आय.टी. क्षेत्रातील नोकरीच्या संधी
नमस्कार मंडळी,
सन्माननीय डोनाल्डदादा ट्रम्प ह्यांच्या अमेरिका फर्स्ट ह्या धोरणामुळे एकंदरीतच H1B व्हिसा मिळवून अमेरिकेत जाणे हे बरेच कठीण झालेले आहे असे वाटते. तिकडे अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या कॅनडामध्ये सरकारने सुरु केलेल्या एका नवीन उपक्रमानुसार विशेष प्रावीण्य असलेल्या व्यक्तीना कॅनडात काम करण्याचा परवाना फक्त दोन आठवड्यात मिळणार आहे असे सकाळ साप्ताहिक मध्ये वाचले. मला बऱ्याच कन्सल्टन्सी मधून ई-मेल वा फोन येतात. प्रत्येकाच्या मेलमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोनच देशांचा उल्लेख असतो. तुम्ही फक्त व्हिसा काढा भरपूर डिमांड आहे तुमच्या स्किल सेटला असे सांगतात (तसे सांगावेच लागणार म्हणा :) ). त्या अनुषंगाने तुमच्यापैकी कुणाला कॅनडामधील आय.टी.च्या संधींबाबत माहिती असेल तर कृपया द्यावी.
१) कॅनडामधील आय.टी. क्षेत्र हे अमेरिका किंवा भारतासारखे विस्तृत आहे का?
२) कॅनडाचा पर्मनंट रेसिडन्स व्हिसा मिळवल्यास भारतातूनच कॅनडामधील कंपनीत नोकरी मिळवणे शक्य आहे का ? तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीत कुणी असा स्वत: व्हिसा काढून भारतातूनच कॅनडामधील कंपनीचा इंटरव्ह्यू देउन नोकरी मिळवली आहे का?
- जर्मनी मध्ये जन्म झाला आणि पारपत्र भारतीय आहे (उदा. आई वडील तिकडे होते आणि नंतर भारतात आले वगैरे )
- भारतात जन्म झाला आणि पारपत्र जर्मन आहे (उदा. नोकरीनिमित्त जर्मनी ला गेला आणि तिकडे नागरिकत्व मिळाले)
तर क्रमांक १ वाल्या माणसाला हरितपत्र लगेच मिळेल कारण तो जर्मन लोकांच्या रांगेतून जाईल (जी भारतीयांपेक्षा खूपच छोटी आहे ) आणि क्रमांक २ मात्र भारतीयांच्या रांगेतून जाईल त्यामुळे "थांबा आणि वाट पहा" या ठिकाणी सामान्य नोकरी आधारित उदाहरण लक्षात ठेवून वरील माहिती दिली आहे अर्थात तुम्ही शास्त्रज्ञ असाल किंवा ऑलिम्पिक पदक विजेते असाल अथवा भरपूर गुंतवणूक केलीत आम्रविकेत तर गोष्ट वेगळीत्यापेक्षा तुम्ही इलेक्ट्रीशिअन, प्लंबर वगैरे व्हा. चांगले पैसे कमवाल.हे वाक्य तुम्ही गंभीरपणे लिहिले की गमतीने हे कळले नाही. पण, ऑस्ट्रेलिया/कॅनडात इंजिनियर्सपेक्षा ट्रेड्समनना (प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, इ) जाणे जास्त सुकर असू शकते. कारण... या देशांत स्थलांतरीत होण्यासाठी / नोकरीसाठी वेगवेगळ्या विषयांखाली गुण दिले जातात. तिथली सरकारे तेथे कमतरता असलेल्या व्यवसाय/नोकर्यांची एक प्राधान्यक्रम यादी बनवते व त्यांच्यामध्ये प्राविण्य असणार्या उमेदवारांना वरचे जास्त गुण मिळतात. विसाच्या यादीतील अनुक्रम (अ) पात्रता आणि (आ) देशाची गरज या दोन मुख्य मुद्द्यांवरून ठरतो व वेळोवेळी वरखाली जातो. कॅनडाचे सरकार तर ही यादी सरकारी विभाग व खाजगी कंपन्यांना खुली ठेवते... व त्यावरून नोकरीची ऑफर मिळालेल्या उमेदवाराला अधिक ६०० गुण देते (जास्तीत जास्त १२०० गुण शक्य असतात). अर्थात उमेदवाराची पात्रता आणि देशाची गरज यांचे सर्वोत्तम गुणोत्तर जमल्याने ते नाव व्हिसाच्या यादीत बरेच वर जाते आणि ३ ते ६ महिन्यांत व्हिसा मिळण्याची शक्यता निर्माण होते. थोडक्यात, देशाला फायदेशीर ठरणार्या लोकांनी प्राधान्याने स्थलांतर करावे याकडे सरकार लक्ष ठेवते... जे उमेदवार व देश या दोघांच्याही फायद्याचे ठरते. याविरुद्ध, अमेरिकेची नोकरी/स्थलांतरीत व्हिसा व्यवस्था उमेदवारांच्या अर्जांच्या लॉटरीवर आधारीत आहे ! आणि त्यापेक्षा जास्त गमतीदार गोष्ट अशी की, "लॉटरीवर आधारीत पद्धत बंद करून कॅनडा-ऑस्ट्रेलियासारखी आपल्या देशाला फायदेशीर आणि उमेदवाराच्या गुणवत्तेवर आधारीत व्हिसा प्रणाली असावी", असे म्हणणार्या राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा तेथे विरोध आणि चेष्टा चालू आहे !