Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॅनडामधील आय.टी. क्षेत्रातील नोकरीच्या संधी

अ
अभिजीत अवलिया
Sat, 07/08/2017 - 16:33
🗣 82 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, सन्माननीय डोनाल्डदादा ट्रम्प ह्यांच्या अमेरिका फर्स्ट ह्या धोरणामुळे एकंदरीतच H1B व्हिसा मिळवून अमेरिकेत जाणे हे बरेच कठीण झालेले आहे असे वाटते. तिकडे अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या कॅनडामध्ये सरकारने सुरु केलेल्या एका नवीन उपक्रमानुसार विशेष प्रावीण्य असलेल्या व्यक्तीना कॅनडात काम करण्याचा परवाना फक्त दोन आठवड्यात मिळणार आहे असे सकाळ साप्ताहिक मध्ये वाचले. मला बऱ्याच कन्सल्टन्सी मधून ई-मेल वा फोन येतात. प्रत्येकाच्या मेलमध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोनच देशांचा उल्लेख असतो. तुम्ही फक्त व्हिसा काढा भरपूर डिमांड आहे तुमच्या स्किल सेटला असे सांगतात (तसे सांगावेच लागणार म्हणा :) ). त्या अनुषंगाने तुमच्यापैकी कुणाला कॅनडामधील आय.टी.च्या संधींबाबत माहिती असेल तर कृपया द्यावी. १) कॅनडामधील आय.टी. क्षेत्र हे अमेरिका किंवा भारतासारखे विस्तृत आहे का? २) कॅनडाचा पर्मनंट रेसिडन्स व्हिसा मिळवल्यास भारतातूनच कॅनडामधील कंपनीत नोकरी मिळवणे शक्य आहे का ? तुमच्यापैकी कुणी किंवा तुमच्या ओळखीत कुणी असा स्वत: व्हिसा काढून भारतातूनच कॅनडामधील कंपनीचा इंटरव्ह्यू देउन नोकरी मिळवली आहे का?

प्रतिक्रिया द्या
43247 वाचन

💬 प्रतिसाद (82)
इ
इडली डोसा Tue, 07/11/2017 - 09:12 नवीन
गेले १० महिने मी व्हॅंकुवर मध्ये राहात आहे. नवऱ्याचे इंट्रा कंपनी ट्रान्सफर वर्क परमिट असल्यामुळे मलाही स्पाउजल वर्क परमिट मिळाले. वर्क परमिट असल्यामुळे कॅनडाला जाऊन जॉब सर्च करण्याचा विचार होता. ( वर्क परमिट असेल तर जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण कंपनीला काही व्हिसा प्रोसेसिंग आणि त्याच्यासोबत येणारा खर्च करावा लागत नाही ) योगा-योगाने मलाही सेम कंपनी मध्ये जॉब मिळाला. व्हॅंकुवरमध्ये स्थलांतरित होण्यची ढोबळमानाने कारणे - दोघांपैकी एकाला खात्रीशीर जॉब - कुटुंबाची प्राथमिकता असलेल्या ऍक्टिव्ह जीवनमानासाठी पुरेपूर वाव - मुलीच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक सामाजिक वातावरण - पालकांना भेट देण्याकरिता किंवा स्थलांतरित होण्याकरिता व्हिसाची सुलभता - कॅनडातले सर्वोत्तम वेदर असलेले ठिकाण ( या वर्षी कमीत कमी -५ deg C आणि जास्तीत जास्त ३२ deg C ) - जागतिक क्रमवारीत राहण्यासाठी उत्तम ठिकाणांमध्ये सतत पहिल्या दहात स्थलांतरित होण्यापूर्वी केलेला विचार आणि प्रयत्न - सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे आणि ते कुठे उपलब्ध आहे. थोडक्यात तुमच्या प्रॉयोरिटीज काय आहेत? - पालकांना येण्यासाठी सुलभ अशी व्हिजा प्रोसेस ( पालकांचा वारंवार नाकारला गेलेला यूएस व्हिजा हे एक मुख्य कारण होते ज्यामुळे आम्ही यूएस बाहेर पर्याय शोधायला सुरुवात केली ) - कायम स्वरूपी रहिवासी (परमनंट रेसिडेन्सी)आणि नागरिकत्व यासाठी लागणारा वेळ - पगार आणि बचत आणि इतर गुंतवणूक यावर होणारा परिणाम ( यूएस च्या मानाने कॅनडामध्ये पगार कमी आहेत. शिवाय दोघांपैकी एकालाच जॉब मिळाला असता तर बचत ५०% ने कमी झाली असती ) - एकदा यूएस बाहेर पडायचे ठरवल्यावर नवऱ्याने सतत दोन वर्ष खूप नेटवर्किंग केले. म्हणजे कंपनीतल्या वेगवेगळ्या लोकांना जाऊन भेटणे आणि त्यांना दुसऱ्या देशात काही संधी असतील तर त्याबद्दल माहिती विचारणे किंवा आपली दुसरीकडे जायची तयारी आहे हे नोंदवून ठेवणे इत्यादी इत्यादी. ग्लोबल कंपनी असल्यामुळे युरोप, ऑस्ट्रेलिया, साऊथ अमेरिका अश्या इतरत्र संधी असतात - याशिवाय आम्ही स्वतःहून ऑस्ट्रेलिया PR साठी देखील प्रयत्न केले. मी त्यासाठी तीन वर्षांपूर्वी IELTS दिली, तसेच एका व्हिसा कन्स्लटिंग फार्म कडून पॉईंट असेसमेंट करून घेतली पण तिथली अनिश्चितता जास्त होती. म्हणून तो प्रयत्न पुढे नेला नाही. - शेवटी सगळ्या प्रयत्नाना फळ येऊन २०१६ च्या फेब्रुवारीत मुलाखतीचे राउंड पार पडून नवऱ्याला कॅनडामधली जॉब ऑफर मिळाली. - वर्क व्हिसा आणि एकाच कंपनी असली तरी वर्क परमिट यायला साधारण ६ महिने लागले (३महिने कागदपत्र जमा करण्यासाठी, ३ महिने प्रत्यक्ष अ‍ॅप्लिकेशन नंतर लागलेला वेळ) कॅनडात यायच्या आधी आणि आल्यानंतर - चांगल्या एरिआतले अपार्टमेंट रेंटसाठी लिस्ट झाल्या झाल्या लगेच जातात , त्यामुळे आम्हाला कंपनीने दिलेल्या इस्टेट एजन्टने स्काईपवर अपार्टमेंट दाखवले आणि आम्ही ते बघायच्या आधीच सिलेक्ट केले ( नवरा इंटरव्यूसाठी आला असताना साधारण या अपार्टमेंट कॉप्लेक्सच्या इथला एरिया बघून गेला होता. ) - मूव्हिग कंपनीकडून झाले आम्हाला स्वतःचा एक पैसा खर्च करावा लागला नाही. आधीचेच सामान आणता आल्याने नवीन सामान घ्यायला काही खर्च आला नाही. भारतातून फॅमिली घेऊन यायची असेल तर या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. - मेडिकल आणि इतर विमा - पहिले तीन महिने सरकारी विमा किंवा सरकारचे हेल्थ कार्ड/ केअर कार्ड मिळाले नव्हते तेव्हड्या काळात कंपनीने खाजगी विम्याची सोय केली होती. हा विमा वापरायची गरज पडली नाही. - ३ -४ महिन्यांनी केअर कार्ड आले , मध्यंतरी एकदा मुलीला किरकोळ आजारपणासाठी दवाखान्यात न्यावे लागले. रजिस्टर्ड जिपी नाही , जवळच्या वॉक इन क्लिनिकमध्ये १ तासात नंबर आला , मधल्या वेळात घरी जाऊन येऊ शकलो तिथे ताटकळत बसायला लागले नाही. तपासणी झाल्यानंतर एकही पैसा द्यावा लागला नाही फक्त केअर कार्ड दाखवून भागले. या कार्डवर ज्या गोष्टी कव्हर होत नाहीत त्यासाठी कंपनीतर्फे खाजगी विमा आहे. - सेव्हिंग यूएस पेक्षा साधारण ३०% कमी झाले आहे पण इतर गोष्टी ज्या करायला मिळत आहेत त्यामुळे त्याचे फारसे काही वाटत नाही - आल्यापासून जवळपासच्या ५-६ नितांत सुंदर ठिकाणांच्या एक एक दिवसाच्या सफरी झाल्या - सगळे मिळून (नवरा, मी आणि कन्या) या वर्षी स्कीईंग शिकलो. - नवर्‍याच्या इनडोअर आणि आउटडोअर रॉक क्लायंबिंगचे प्रमाण त्याच्या अपेक्षेनुसार वाढले - मुलीसाठी घराजवळच चांगले डे -केअर, लायब्ररी, खेळायला मोठे पार्क आणि स्विमिंग पूल मिळाले - शिवाय माझ्या आईचा व्हिसा होऊन गेल्या सहा सात वर्षात पहिल्यांदाच घरून कोणीतरी आम्हाला भेटायला आमच्या सोबत राहायला आले. - त्यामुळे एकंदरीतच या स्थलांतरातून अपेक्षित होत्या त्या गोष्टी होत आहेत आणि पुढेही होतील असा विश्वास आला आहे. तर एवढं सगळं घडाभर तेल नमनाला वाहण्याचा उद्देश असा कि अमुक एक देशात व्हिसा आणि नोकरी सहज उपलब्ध आहे हि एक बाजू झाली . तुम्हाला या स्थलांतरातून नक्की काय हवय त्याचा विचार करा हवं तर लिहून काढा. अशी संधी अजून कुठे दुसरीकडे उपलब्ध आहे का त्याचाही शोध घ्या. तुमच्या कौटुंबिक , सामाजिक आणि आर्थिक जीवनावर याचा काय परिणाम होईल आणि तो तुम्हाला अपेक्षित असाच आहे का किंवा स्वीकारण्याजोगा आहे का याचा विचार करा. या आणि अशा इतर बाजूही यशस्वी आणि आनंदी स्थलांतरासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत. शिवाय ट्रेमा, म्हात्रेकाका आणि स्रुजाने वर उत्तम माहिती दिली आहेच, कॅनडा इमिग्रेशनसाठी गव्हर्मेंट वेबसाईटवर शक्यतो सगळी माहिती उपलब्ध आहे. कॅनडा इमिग्रेशनसाठी काही फोरम असतील तर तेही वाचून बघा. नवीनच पास झालेल्या C -६ सिटिझनशिप बिल बद्दलही वाचा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 07/11/2017 - 18:03 नवीन
तुमचा स्थलांतरित होण्याचा उद्देश स्पष्ट पाहिजे. स्थलांतरित झाल्यावरचे पहिले ६ महिने/ वर्ष हे अगदीच वाईट जातात. नवीन देश, तिथल्या चालीरीती, हवामान, कामाच्या ठिकाणी जुळवून घेणे, घर मिळवणे आणि सेट करणे याच बरोबर आपले सगेसोयरे नसणे यामुळे फ्रस्ट्रेशन येतं. भाषेची पण अडचण सुरुवातीला जाणवते, जरी इंग्लिश असलं तरी उच्चारांमध्ये फरक असतो. त्यात काही वर्णभेद करणारे लोक भेटतात. कशाला इथे आलो असं वाटतं. मुख्यतः थंडीच्या दिवसात तर जेव्हा संध्याकाळी ४-४.३० लाच अंधार पडतो आणि कसंबसं घरी पोचून घरातच कोंडून घ्यावं लागत तेव्हा तर फारच होमसिक वाटतं. त्यात जर तुम्ही नोकरी नसताना आलात तर फारच त्रासाचं होऊ शकतं. जवळ असलेले रुपयातून कन्व्हर्ट केलेले CAD आणि १ CAD म्हणजे ५०-५२ रुपये हे गणित आपल्याला सतत त्रास देत राहतं. एकदा पाहिलं वर्ष काढलंत की मग पुढे तुम्ही रुळता. टोरोंटो आणि कॅलगरीमध्ये तर खूप भारतीय आहेत, सरदार तर खूपच. मराठी लोक पण बरेच आहेत. इडली डोसा: व्हॅंकुवर खूपच छान आहे असा ऐकलंय पण त्याबरोबर बरंच महाग आहे (कॅनडातील इतर शहरांपेक्षा) असं पण ऐकलंय. यूएस पेक्षा ३०% कमी सेविंग होतं म्हणताय, म्हणजे यूएस मध्ये $१०० सेव्ह करत होतात आता फक्त CAD ७० करता असं म्हणताय का भारतीय रुपयांच्या हिशोबाने म्हणताय का १ USD ~ ०.७५ CAD यामुळे म्हणताय? त्यात तुम्ही मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम धरला आहे का? कॅनडामध्ये खाण्यापिण्याच्या खर्च कमी येतो, पण टॅक्स आणि घराचं भाडं जास्त आहे असं मला वाटतं. बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
इ
इडली डोसा Fri, 07/14/2017 - 08:59 नवीन
व्हॅंकुवर मधे इन्कमलेव्हलची तुलना केल्यास घर विकत घेणं महाग आहे. पण भाड्याने घेणं कोणत्याही नॉर्थ अमेरिकन मोठ्या शहरात भाड्याने राहाण्यासारखचं आहे.
३०% कमी सेविंग होतं म्हणताय, म्हणजे यूएस मध्ये $१०० सेव्ह करत होतात आता फक्त CAD ७० करता
म्हणजे यूएस $१०० करत होतो ते आता यूएस $७० झाले आहे.
मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम धरला आहे का?
हे कंपनी कडुन कव्हर होतयं, पे चेक मधुन आमची कॉन्ट्रि जाते पण ती युएसपेक्षा कमी आहे.
टॅक्स आणि घराचं भाडं जास्त आहे असं मला वाटतं.
टॅक्सला युएस मधल्या टॅक्सशी तुलना केल्यास आम्हाला फार काही फरक नाही पडला. घर भाड्याचं वर आलचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अनिवासि Tue, 07/11/2017 - 13:31 नवीन
सर्व प्रतिसाद वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि जग किती बदले आहे हे जाणवले. १९५२ साली ( वय १९) परदेशात जाऊन अभ्यास करावयाचा विचार आला - माहिती काढायला सुरवात केली. मिळाली ०. मुर्खात काढणारे शेकडो ! खटपट चालू राहिली पासपोर्ट काहीही खळखळ न होता मिळाला . २००० रुपयाचे कर्ज वडील व त्यांच्या मित्रांमुळे मिळाले. आणि ऑक्टोबर ५२ला धुरकटलेल्या / काळोख्या संध्याकाळी लंडनमध्ये पोहोचलो. ओळखी नाहीत. मित्र नाहीत. आज ६५ वर्षानंतर हे सर्व वाचले कि वाटते आपली आजकाल काही वाट लागली नसती. मी फक्त SSC झालेला वेडा. आता सर्व आकाक्षिताना सुयश चिंतणे हाती आहे ते करतो. ( सर्व कर्ज व्याजासहित परत केले व वर दुसर्या मुका/मुलींसाठी देणगी पण दिली)
  • Log in or register to post comments
ह
हर्मायनी Wed, 07/12/2017 - 06:11 नवीन
काका.. तुमच्या त्यावेळच्या लंडन बद्दलच्या गोष्टी वाचायला आवडतील! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
प
पुंबा Wed, 07/12/2017 - 12:11 नवीन
खरोखर काका, तुमच्या त्या वेड्या साहसाबद्दल लिहाच. तुमचे अनुभव आजच्या पिढीतल्या माझ्यासारख्यांना मार्गदर्शक ठरतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/12/2017 - 12:19 नवीन
भारी आहे हे सगळे ! हे सगळे एका वेगळया लेखाद्वारे इथे सविस्तर लिहा अशी आग्रहाची विनंती आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
अ
अभिजीत अवलिया Wed, 07/12/2017 - 12:29 नवीन
१९५२ म्हणजे महायुध्दाने उध्वस्त झालेले लंडन. ते आजचे एक सुंदर वैभवशाली लंडन. हा प्रवास तुम्ही जितका काही अनुभवला असाल तो देखील वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
अ
अमित खोजे Tue, 07/11/2017 - 23:12 नवीन
वर्गातील बहुसंख्य मुलांनी अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्याबरोबर मीसुद्धा तयारी करून GRE वगैरे देऊन ठेवली परंतु मध्यमवर्गीय असल्याने आपल्याला त्यांच्यासारखे खर्च परवडणार नाही याची खात्री असल्याने पुढे काहीच हालचाल ना करता चुपचाप पुण्यात नोकरी पकडली. नंतर अमेरिकेत जाऊन राहिलेल्या मित्राने एकदा तो दिवाळीच्या सुट्टीत आलेला असताना पैशाचे गणित कसे मांडायचे ते समजावून सांगितले आणि मग प्रयत्न करून २ वर्षांनी अस्मादिक न्यूयॉर्क मध्ये दाखल झाले. २ वर्षात MBA करून H1 ला अर्ज केला व तो मिळाल्यावर नोकरी सुरु झाली. H1 लॉटरी नसण्याची आमची शेवटची बॅच - मे २०११. २०१२ पासून त्यांनी लॉटरी लावायला सुरुवात केली. लॉटरी सुरु झाल्यावर मला माझ्या कॉलेजमधील खालच्या वर्गातील मित्रांची काळजी वाटू लागली कारण बहुतांशीजण माझ्याप्रमाणेच शैक्षणिक कर्ज वगैरे काढून आले होते. एवढे पैसे खर्च करून कॉलेजमध्ये यायचे आणि H1 work visa मिळणयाची काहीही खात्री नाही हे समजल्यावर त्यांच्या पायाखालील जमीनच गेली. कॉलेज मध्ये असताना H1 आणि नोकरी मिळालेल्या वरील वर्गातील मित्रांचा हेवा वाटायचा. मला H1 मिळाल्यावर तो हेवा फक्त ग्रीनकार्ड मिळालेल्या लोकांवर गेला एवढाच फरक झाला. तब्बल ८ ते १० वर्ष तुम्हाला ग्रीनकार्ड मिळण्यासाठी थांबावे लागते हेच मी कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून ऐकत आलो होतो. आणि ते काही अंशी खरे पण आहे. तुमच्या कंपनीला हे माहित असते त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला सरासरी पगार एवढाच पगार देते. काहीही विशेष नाही. मग भले तुमच्या कडे बाजारातील कितीही अद्यावत माहिती-कला-ज्ञान असो. तेच जर तुमच्याकडे ग्रीनकार्ड असेल तर मात्र तुम्हाला बाजारभावाप्रमाणे नोकरी-मोबदला (कॉन्ट्रॅक्टर असाल तर दर ताशीच्या पैश्याचा दर) मिळतो. हे पाहून माझी चिडचिड झाली. त्यात लग्न केलेले असेल तर बायको कितीही शिकलेली व कितीही कार्यानुभवी असेल तरीही तिला घरी बसून स्वयंपाक व भांडीच करावी लागतात. (माफ करा - भांडी अस्मादिकांकडे असतात.) तेव्हा मग मी कॅनडाचा विचार सुरु केला व सर्व माहिती मिळवली. वर ट्रेंड मार्क यांनी सर्व प्रवेशाची माहिती दिली आहेच. ती सर्व पूर्ण करेपर्यंत १ वर्ष निघून गेले. अगदी अमेरिकेत MBA केले असले व त्यासाठी TOEFL झालेली असली तरीही परत IELTS बायको व मी दोघांनी दिली. दोघांचे सर्व कागदपत्रे - अमेरिकेतील व भारतातील दोन्ही - जमा केली. ६ महिने दाखवायचे पैसे जमा केले. ते गोळा करे पर्यंत अर्ज देण्याची तारीख उलटून गेली. (मे २०१३) मग परत पुढच्या वर्षी अर्ज भरला. (मे २०१४). तेव्हा काही कागदपत्रे परत गोळा करावी लागली. त्यानंतर मात्र ऑक्टोबर महिन्यात लगेच शारीरिक तपासणीसाठी बोलावणे आले. (असे बोलावणे आले कि समजावे तुमचा PR झाला.) ती सर्व तपासणी होऊन जानेवारी २०१५ मध्ये COPR (Confirmation of PR ) मिळाले. तेव्हा न्यूयॉर्क मध्ये चांगली नोकरी चालू होती. तेथील मॅनेजरने मला ग्रीनकार्ड करायचे का म्हणून विचारले हि होते. परंतु त्याला नाही म्हणालो. तो वेडाच झाला. 'का' असे विचारल्यावर जेव्हा त्याला कॅनडाच्या PR बद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला कि 'अगदी योग्य निर्णय घेतला आहेस. माझाही ग्रीनकार्ड आज ६ वर्ष झाली तरीही आलेले नाही. कॅनडात हेल्थ केअर मोफत असते ना? कसा अर्ज करायचा मलाही सांग.' ट्रेंड मार्क यांनी जसा अमेरिकेतच राहून कॅनडातील नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला तसाच मी सुद्धा केला. परंतु त्यात यश नाही आले. फोन नंबर जरीही +१ ने सुरु होत असेल तरीही नंबर लावल्यावर तो नंबर कोणत्या राज्यातील आहे ते लगेच दिसते त्यामुळे कॅनडामधील HR त्यांना फारसा भाव देत नाहीत. अगदी कॅनडातील मित्राचा पत्तासुद्धा दिला होता. त्यामुळे घरात बसून आपल्याला कॅनडात नोकरी मिळेल हि वेडी आशा बाळगू नका. तुम्हाला PR अथवा वर्क परमिट घेऊन प्रत्यक्ष इथे यावे लागेल. माझा न्यूयॉर्क चा नंबर असल्याने मला ३ मुलाखतींसाठी बोलावणे आले. तीनही वेळा मी न्यूयॉर्क ते टोरांटो (१० तास बस प्रवास) रात्री केला - सकाळी मुलाखत - कि परत त्याच दिवशी गाडीत बसून दुसऱ्या दिवशी नोकरीवर हजर असं उद्योग केला. ३ मुलाखतीत नंतर लक्षात आले हे असे काही जमण्यासारखे नाही. मग प्रयत्न थांबवले. चालू नोकरीचा राजीनामा दिला, गाडीत सामान भरले आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणून टोरांटोच्या दिशेनं प्रस्थान केले. टोरांटो Image removed. टोरांटो का? तर एक - न्यूयॉर्क पासून जवळ होते. मला माझ्या स्वतःच्या गाडीतूनच सर्व सामान नेता येणार होते. आणि दुसरे म्हणजे मला फक्त बँकेतच नोकरी हवी होती. टोरांटो कॅनडाची आर्थिक राजधानी आहे. सर्व पाचही बँकांचे मुख्य कार्यालय टोरांटोमध्ये आहे. बाकी हवामान वगैरे म्हणाल तर मला न्यूयॉर्क मध्ये असल्याने बर्फाची तशी सवय आहे. त्यामुळे फार फरक नाही पडणार असे सुरुवातीला वाटले. काय एक ४-५ डिग्रीचा तर फरक. पण तो एक गोड गैरसमज होता. नायगाराला इमिग्रेशन अतिशय छान झाले. इमिग्रेशन अधिकारी आपल्याशी हसून बोलतात हे पाहून तर फार आश्चर्य वाटले. इतके दिवस अमेरिकेत जाणे येणे असल्याने एअरपोर्टला दर वेळी भीती वाटायची कि आपल्याला आत सोडतील कि नाही कि परत पाठवतील? जरीही सर्व कागदपत्रे बरोबर असतील तरीही. परंतु येथे तर सर्व कारभारच वेगळा होता. सर्व काही छान हसून खेळून चालले होते. आमचे सर्व सामान - अगदी गाडीसकट - फुकट कॅनडात आले. (तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कॅनडात PR वर येता तेव्हा बाहेरील देशातून कितीही म्हणजे अगदी कितीही सामान आणा तुम्हाला त्यावर इम्पोर्ट ड्युटी भरावी लागत नाही. माझी गाडी अमेरिकेतील होती. कॅनेडिअनसना त्यावर टॅक्स भरावा लागला असता.) भारतातून येणार असाल तर साधारण मनाशी २ बॅगांशिवाय आपण फारसे आणत पण नाही. आल्यानंतर अगोदर जिथे मुलाखती दिल्या होत्या त्यांची पुण्याई कामाला आली व नोकरी मिळाली. कॅनडातील जॉब मार्केट अमेरिकेपेक्षा थोडे वेगळे आहे. येथे थोडा 'रेफरन्स' लागतो. अगदीच कोणीही तुम्हाला नोकरीवर सरळ सरळ घेत नाही. MBA मध्ये शिकलेला 'नेटवर्किंग इव्हेंट्सचा' सराव येथे कामाला आला. 'MeetUp' सारख्या समूहात जाऊन नवीन ओळखी बनवल्या. अगदी IT कामगार जरीही असाल तरीही नोकरी लगेच मिळणे थोडेसे मुश्किल आहे. 'कॅनेडीअन एक्सपेरियन्स' आहे का म्हणून विचारतात. 'अर्रे आत्ताच इथे पाऊल ठेवलाय अन कसाकाय मला कॅनडातील कामाचा अनुभव असेल? कोंबडी आधी कि अंड आधी?' असा विचार करून जळफळाटहि करून घेतला. उगीच 'IT skills are transferable skills ' म्हणून गवगवा करू नये. येथे पगार अमेरिकेपेक्षा जरा कमी आहे. म्हणजे असे कि जर तुम्हाला न्यूयॉर्क मध्ये वार्षिक १००,००० डॉलर पगार असेल तर तो येथे साधारण ६०,००० -७०,००० च्या घरात येतो. आयकर मात्र इथे जास्त आहे. १३% सेल्स टॅक्स - सर्व वस्तूंवर. अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये तो ८-८.५ आहे. त्यामुळे वस्तू महाग वाटतात. प्रवास खर्च मात्र न्यूयॉर्क सारखाच मला वाटला. रोज ६ डॉलर GO ट्रेनला - एका दिशेने - अर्ध्या तासाचा प्रवास करायला लागतात. (मी मिसिसागामध्ये राहतो. तेथून टोरांटो अर्ध्या तासावर आहे.) गो ट्रेन Image removed. Graduate लोक इथे भरपूर आहेत. PhD वाले पण बँकेत काम करतात. त्याच ६०-७० हजर वार्षिक पगारात. त्यामुळे आपल्या उच्च शिक्षणाचा माज येथे करू नयेत. तरीही सर्व डॉक्टर लोक इथे टॅक्सी चालवत नाहीत. उगीच नाही त्या गोष्टी ऐकू नयेत. सांगायचं उद्देश असा कि येथे PR वर यायचे असेल तर तुम्हाला तुमचे सर्व काही सोडून येथे यावे लागेल. It is a leap of faith. आल्यावर सर्व काही स्थिर स्थावर व्हायला थोडा वेळ लागेल. काही महिने लागतील. तेवढे दिवस थांबायची तयारी हवी. एकदा नोकरी लागली कि पुढील गोष्टी आपोआप मार्गी लागतात. मिसिसागा Image removed. भारतातून येणाऱ्या तुमच्या लहान मुलांसाठी तर कॅनडा उत्तम आहे. वेगवेगळ्या देशातील मुले शाळेत असतात. शाळा फुकट. मुलांचा सर्वांगीण विकास तर येथे सरकारी शाळेतच होतो. तसे विषयच शाळेत असतात. वेगळे क्लास लावावे लागत नाहीत. मात्र गणित येथे फारसे होत नाही असे वाटू शकते. मुलांना शिकण्यासाठी वेगवेगळ्या कला, खेळ अगदी भरपूर आहे. येथील मूलभूत सोयी सर्व अमेरिकेसारख्या असल्याने तसा फार फरक वाटत नाही. मोठमोठे रस्ते, बागा अगदी छान आहे. ओंटारियो हे राज्य तर तळ्याचे राज्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. दर एक किलोमीटरला एक तळे असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होणार नाही. गूगल मॅप बघा हवं तर. तळे Image removed.
वैधानिक इशारा :- अतिशय स्वच्छ हवेचा श्वसनास त्रास होऊ शकतो.
हेल्थ केअर फुकट. डोळे आणि दात यांसाठी तुम्हाला इन्शुरन्स लागतो तो तुमची कंपनी तुम्हाला देते. राहण्यासाठी म्हणाल तर १४०० - १८०० मध्ये १ अथवा २ बेडरूम चा कॉंडो तुम्हाला मिळू शकतो. येथे कॉंडो-अपार्टमेंट (फ्लॅट), टाऊन हाऊस (आपले रो हाऊस), सेमी डिटॅचड (डुप्लेक्स) व डिटॅचड(एकटे घर) अशी घरांची चढत्या क्रमाने घर प्रकार यादी असते. टाऊन हाऊस Image removed. इति - आयुष्यातील काही वर्षे कॅनडात नक्की घालवावीत. कुटुंबासाठी खूपच छान जागा आहे.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 07/12/2017 - 00:18 नवीन
सगळं पटलं. मी पुण्याहुन अल्लाद हातात ऑफर घेऊन् च कॅनडाला आले पण रेफरन्स मुळेच. आधी कामा साठी कॅनडाला यायचे त्याचा उपयोग झाला. त्यामुळे तेवढं सोडुन तुमचा आमचा सगळा मत्त अगदी बराब्बर जुळता बघा ! ता.क. आटोवा टोराँटो पेक्षा जास्त लिव्हेबल आहे. दोन शब्द संपले, आता मी बसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे
ट
ट्रेड मार्क Wed, 07/12/2017 - 17:06 नवीन
आटोवा आणि टोरोंटो मध्ये एकदा थंडीत येणे झाले होते. तेव्हा आटोवाला उणे ३३ डिग्री सेल्सिअस तापमान अनुभवले. तशी उणे २०-२२ डिग्रीची सवय असूनही ते २ दिवस जी काही वाट लागली होती ते शब्दात सांगता येणार नाही. सगळीकडे बर्फ आणि त्यात अरुंद रस्ते यामुळे माझ्या मनात आटोवा पेक्षा टोरोंटो बरे अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. एक तर मी नॉर्थ कॅरोलिनापासून ड्राईव्ह करून आलो होतो. रात्री ८ वाजता हॉटेल सापडेना. त्यात अरुंद रस्ते, बर्फ आणि नो एंट्र्या यांनी वैताग आणला. मी अगदी डाउनटाउन मध्ये राहिल्यामुळे असेल, पण जरा बाहेर गेल्यावर चांगला एरिया वाटला. अर्थात २ दिवसांचा अनुभव काही ग्राह्य धरण्यासारखा नाही, त्यामुळे तिथे राहणाऱ्यांनी सांगितलेले जास्त बरोबर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
उ
उपाशी बोका Wed, 07/12/2017 - 20:27 नवीन
कॅनडातली थंडी म्हणजे एकदम बेक्कार. व्हँकुवर त्यातल्या त्यात बरे. पण शेवटी कायै की जिकडे पोटापाण्याची सोय होणार तिथेच राहावे लागते. आणि मग हळूहळू त्याचीपण सवय होते आणि मग तीच जागा एकदम भारी वाटायला लागते. मनुष्याचा स्वभावच आहे हा. त्यामुळे संधी मिळाली तर जरूर जा, उगीच थंडीचा बाऊ नको, काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 07/13/2017 - 15:39 नवीन
मी फक्त अनुभव म्हणून सांगितलं. बाकी थंडी काय आणि उन्हाळा काय जिथे आपल्याला पोटापाण्याची सोय होते, कुटुंबाला सुरक्षित वातावरण मिळतं आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळतं तिथे राहायचं. माझी बहीण फोर्ट मॅकमरेला रहाते. तिथे उणे ५० पर्यंत ताप(?)मान जातं. ते कॅलगरी पासून उत्तरेकडे ६०० किलोमीटर आहे. नेहमीप्रमाणे मी ड्राईव्ह करून जावे असा विचार करून कॅलगरी ते फोर्ट मॅक असा कारने फेब्रुवारीमध्ये गेलो. वाटेत इतकी तुरळक वस्ती होती की फोर्ट मॅक मध्ये अगदीच ५०-१०० घरं असतील असं मला वाटत होतं. जायला इतका वेळ लागला की अजून थोडं पुढे गेलो तर उत्तर ध्रुव येईल. पण तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला कारण जवळपास ७०,००० घरं असलेलं ते गाव आहे. त्याहून मोठा धक्का म्हणजे बरीच मराठी लोक राहतात, माझ्या बहीणचा मराठी गृप ३० कुटुंबांचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपाशी बोका
र
रेवती गुरुवार, 07/13/2017 - 20:23 नवीन
फोर्ट मॅकमरेबद्दल पहिल्यांदाच ऐकलं. तेथे मराठी कुटुंबे राहतात हे वाचून तर मजाच वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
व
विनोद१८ Fri, 05/01/2020 - 16:29 नवीन
......अतिशय उत्तम व सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही. चांगले मार्गदर्शन झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे
र
रुपी Wed, 07/12/2017 - 00:00 नवीन
खूप माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 07/12/2017 - 06:19 नवीन
धन्यवाद इडो आणि अमित ...
  • Log in or register to post comments
क
कौशी गुरुवार, 07/13/2017 - 01:03 नवीन
सोपे नाही तर कठिण पण नाही... नोकरी असेल तर सर्व नीट.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 07/13/2017 - 13:36 नवीन
धाग्यावरील माहितीपूर्ण प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अनिवासि गुरुवार, 07/13/2017 - 17:17 नवीन
माझ्या मागच्या प्रतिसादाला मिळालेले प्रतिसाद वाचून धन्य वाटले. मी जरूर माझ्या परदेश वास्तव्याविषयी लिहीन. सध्या माझ्या लहानपणातील पुण्यातील आयुष्याबद्दल लिहीत आहे. एक दोन आठवड्यात संपेल नंतर हा प्रकल्प. माझे पुणे - माझे लंडन - माझे विश्व असे ८५ वर्षाच्या मस्त आयुष्याचे म्हातारा होण्यापूर्वी शब्दांकन करावयाची इच्छा आहे. पाहू कसे जमेल ते. मिपाकरांच्या वरील प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जुइ गुरुवार, 07/13/2017 - 18:29 नवीन
तुमच्या पुण्याच्या वास्तव्याविषयी देखील इथे वाचायला आवडेल! बा़की या लेखातून खूप चांगली माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/13/2017 - 18:36 नवीन
अरे वा ! तर मग त्या सगळ्या लेखनाची एक लेखमालाच टाका की इथे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
ट
टिवटिव गुरुवार, 07/13/2017 - 18:38 नवीन
__/\__ ___/\__ __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
ए
एस गुरुवार, 07/13/2017 - 19:58 नवीन
तुमचे अनुभव मिपावर वाचायला नक्कीच आवडेल. जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
र
रेवती गुरुवार, 07/13/2017 - 20:24 नवीन
मस्तच! लेखमालेची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
प
पुंबा Fri, 07/14/2017 - 06:55 नवीन
लिहाच काका.. आम्ही वाट पाहतोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
र
रामदास२९ Fri, 07/14/2017 - 11:04 नवीन
अनिवासि काका - तुम्ही जरूर तुमच्या लन्डन च्या अनुभवा विषयी लिहा. तुम्ही वर्णन कराल ते लन्डन म्हणजे अपुर्वाइ मधे पुलन्नी आम्हाला दाखवलेल लन्डन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिवासि
र
रामदास२९ Fri, 07/14/2017 - 11:06 नवीन
_/\_ _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
स
सौन्दर्य गुरुवार, 07/13/2017 - 23:52 नवीन
सुरवातीचे काही प्रतिसाद वगळता एकूण सगळ्यांनीच फार छान आणि विविध दृष्टीकोनातून माहिती दिली. ह्यामुळेच मला 'मिसळपाव' आवडते.
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Fri, 07/14/2017 - 09:03 नवीन
आय टी एक्प्रेस एन्ट्री संदर्भात ही माहिती कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Fri, 07/14/2017 - 10:07 नवीन
अतिशय उपयुक्त माहिती .. @अमित खोजे, इडली डोसा, ट्रेड मार्क .. अजून कोणी राहिला असल्यास .. क्षमस्व .. मला वाटतय .. बाकिच्या हिरवळी च्या देशा (ऑस्ट्रेलिया, न्यूझिलन्ड, इन्गलन्ड) विषयी माहिती द्यावी ..
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ गुरुवार, 04/30/2020 - 17:26 नवीन
तिथे बँकिंग क्षेत्रात काय संधी आहेत?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा