Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला आजवर कधीच रडू आलं नाही निपचित पडलेल्या कलेवरांच

ग — गरजू पाटिल., Sat, 07/08/2017 - 21:17
मलाआजवर कधीच रडू आलं नाही निपचित पडलेल्या कलेवरांच कि कधी चिड आली नाही त्या देहधारी नामधारी आत्म्यांची मला कधीच राग आला नाही त्या बंदुकाधाऱ्यांचा कि मला कधी भिती वाटली नाही हिंस्र झालेल्या श्वापदांची ना मला कधी घृणा वाटली त्या बलात्कारी अंगांची मी रडले मानवतेच्या र्‍हासामुळे, खुप रडले मला चिड आली माझ्या षंढ राहण्याची तुमच्या षंढ असण्याची मला राग आला त्या बंदुकधाऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांचा, त्यांच्या मानसिकतेचा, त्यांच्या गळ्यात पट्टे होते त्यांना ओळखी होत्या मला भिती वाटली त्या पट्टे धरणाऱ्यांची मला घृणा वाटली त्या बलात्काऱ्यांच्या संस्कारांची, संस्कृतीची, मानसिकतेची त्यांच्या जातीची, धर्माची त्यांच्या मनुष्य असण्याची आणि तुम्हा अखंड मानव जातीची विधाता विधाता सारं काही झूठ असतं, मला ठाऊक आहे मी आजवरच्या साऱ्या संहारांची साक्षी आहे, अगदी तुमच्या असण्याच्या हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या ना आजवर तो कधी आला ना येईल, नाही येणारच नाही, तेव्हा त्याच्या नावे गळे काढणारांनो, गळे कापनारांनो, कालची गोष्ट सांगू. तो आला इवलसं रोपटं घेऊन, त्याच्या इवल्याश्या हातांनी त्यानं माझी कुस उजवलीं पण माघारी येऊन त्यानं माझ्या पदरात पाणी नाही, दोन थेंब सांडले रक्ताचे, रोपट्यासाठी की फोफावावं रक्त पिऊन त्यानहीं तुमच्यासारखं पण नाही. पुरेसा रंग ही नसलेलं रक्त मुळांशी आलं अनं त्यांनही शोषणं श्वास घेणं बंद केलं अनं ते रोपटही उन्मळून पडलं माझ्या कुशीत मलां रडू आलं आज ही दोन्हीं कलेवरं पाहून मला चिड आली राग आला तुमचा त्या बंदुकधाऱ्यांचा मला घृणा वाटली वर्षानुवर्षे मला बलात्कारणाऱ्या अंगांची मला खरंच आज भिती वाटली हिंस्त्र झालेल्या श्वापदांची तुम्हा अखंड मानव जातीची

प्रतिक्रिया द्या
1019 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गरजू पाटिल. Sat, 07/08/2017 - 21:24 नवीन
२०१४ च्या पेशावर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्यात १३४ लहानग्यांचा जीव घेतला गेला तेव्हा लिहीलेला खर्डा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा