मेथी कॉर्न पुलाव
Primary tabs
साहित्य
१/२ कप मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न)
३/४ कप चिरलेली मेथी
२ मध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून
२ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२०० ग्रॅम बासमती तांदूळ, धुवून, अर्धा तास भिजत घालून
१ मोठा चमचा तूप (किंवा तेल)
५ ते ८ काळेमिरे
१ तुकडा दालचिनी
३ ते ४ लवंग
३ ते ४ वेलदोडे
१/२ चमचा हळद (ऐच्छिक)
मीठ चवीनुसार
२ कप गरम पाणी
कृती
यंदा पावसाच्या कृपेने बाल्कनीत लावलेली मेथी भरपूर आली, त्यामुळे हि एक झटपट पण छान पाककृती करता आली.
पातेल्यात तूप गरम करून, त्यात खडे मसाले (काळेमिरे ते वेलदोडे) एक ते दोन मिनिटे परतून घ्या. उभा चिरलेला कांदा घालून, कांदा २ ते ३ मिनिटे परतून घ्या.
ह्यात चिरलेली मेथी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मक्याचे दाणे घालून मध्यम आचेवर चांगले ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.
ह्यात भिजवलेला तांदूळ (पाणी निथळून), मीठ आणि हळद (वापरत असल्यास) घालून मिश्रण अजून थोडं परतून घ्या, ह्यात आता २ कप गरम पाणी घालून, एक उकळी येऊ द्या. गॅस कमी करून, पातेल्यावर झाकण ठेवून पुलाव शिजवून घ्या. हाच पुलाव कुकर मध्ये करत असाल तर २ शिट्ट्या काढून घ्या.
गरम गरम पुलाव दह्या सोबत खायला घ्या!
फोटो छान!
कॅान आणि मेथीची पाने फुलं सजावट झकास!
मेथी पाने अगोदर घातल्याने कडू होतो का?
नाही मेथी परतल्याने कडूपणा कमी होतो, कॉर्न मुळे गोडसर तर हिरव्या मिरच्या आणि काळे मिरे मुळे तिखटपणा....
स्पेशली ती फुलांची आयडिया फारच आवडली. लौकरच करून बघेन
लइच भारी पदार्थ करता राव तुम्ही!
तोंडाला पाणी सुटले. फोटो तर झकास! नक्की करून पाहीन.
फोटो तर काय आहेत एक एक!
ती मक्याच्या दाण्यांची फुलेही फारच देखणी आहेत.
काय फोटो!! तो मेथी, कॉर्न आणि कांदे एकत्र परततानाचा फोटो सुद्धा काय सुंदर आहे!
शेवटचा तर झकासच!!
सगळ्यांचे आभार!
वाह, मस्तच!
मस्त माधुमेहीसाठी फारच चांगला.
पाहताच त्या पाकृला, कलिजा खलास झाला !
वाहवा!
गणपा, सानिकातै ह्यांच्या एलिट क्लब चा वारसा तुम्ही पुढे नेताय.. :)
येऊ द्या मस्त मस्त पाककृती.....
बाबो जबराट मला ती दिझाइन फारच आवड्लीय :)
अतिशय सुंदर ...........
सजावट तर अप्रतिम
असाच पालक कोर्न पुलावहि करता येतो.
मस्त फोटो आणि कृती!
छान दिसतो आहे पुलाव..
स्वाती