Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परीक्षा

म — माम्लेदारचा पन्खा, Sun, 07/09/2017 - 09:07
परीक्षेला बसवलं आहेस तू अशा देवा किती पानं लिहितोय तरी वेळच संपत नाही इतकी अवघड परीक्षा काय ही कामाची हजारदा वाचला तरी तुझा प्रश्नच कळत नाही ! परीक्षेचं वेळापत्रक तरी आधी सांगायचं असतं कोणालाही असं थेट पेपरला बसवायचं नसतं अभ्यासक्रम वेगळा आणि हे प्रश्न भलतेच आहेत गोंधळ झाला तरीही वर मार्क मिळवायचे आहेत ? मागे एकदा दिला होता मी धैर्याचा एक पेपर त्याचं काय झालं पुढे ते कळलंच नाही नंतर आता चालू आहे सहनशक्तीची अफाट चाचणी करतोस तरी कशी तू असल्या प्रश्नांची जुळवणी ? एक पेपर झाला की मध्ये थोडा वेळ द्यायचा असतोय तुझ्या शाळेत मात्र मी सतत परीक्षेलाच कसा बसतोय पेपर संपव तुझे सगळे आता, सांग मी पास की नापास मनापासून उत्तरं देतोय म्हणून किती द्यायचा तो त्रास ? कळतंय मला की मीही तुझा एक आवडता शिष्य आहे आता तरी सांग आधी देवा की माझं काय भविष्य आहे तू शिक्षक आणि तूच परीक्षक तरीही कठीण पेपर हा माझा निकाल राखून ठेवलायस, खास सोहळ्यात देणार का ?

प्रतिक्रिया द्या
1583 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
संदीप-लेले Mon, 07/10/2017 - 20:10 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/11/2017 - 02:36 नवीन
नवनीत खा आणि परीक्षेला बसा /उभे राहा
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 07/11/2017 - 10:47 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा