Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

II शहराकडून "बा" चा फून आला II

स — सिद्धेश्वर विलास पाटणकर, Mon, 07/10/2017 - 10:23
शहराकडून "बा" चा फून आला केल्या केल्या विचारू लागला कोण टाकून गेला लेंडूक आपल्या शेतामंदी ? म्या म्हटलं माझ्याशिवाय हाय कोण इथं ? तुमास्नी ह्ये कोण बोललं तिथं ? "बा"ने घपकंन हासडून शिवी लावली गाडीस चावी निघाला परतीस गावाकडं म्या बी धावलो धपाधप लेंडूक शोधाया शेताकडं घेता वास चहूकडं नाक साफ चोंदून गेलं च्या मारी माझ्या अपरोक्ष कोण ह्ये शेत शिंपून गेलं ? घेतली कुदळ फावडी हाती कराया खाली वर माती फुलं पसरली चहुकडं जागोजागी लावली उदबत्ती सूर्य ढळाया लागला चंद्रमा दिसाया लागला कुदळ चालूच व्हती लेंडकांसाठी अचानक एक मनात इचार आला रोम रोमांच उभा झाला दुरुन एक गोटा आणला शेंदूर तयास फासला सांजवेळी गावात जाऊन देव शेतात आल्याचा बोभाटा केला लोकं धावली शेताकडं कुणी पैके घेऊन तर कुणी फळ घेऊन घालू लागली त्या गोट्यास साकडं बा पुरता गोंधळून गेला बघता बघता मिसळून गेला येड्यावानी गर्दीमधी सैरभैर झाला लेंडकामुळं शेतात आली व्हती लक्ष्मी आता पुढचं वाढलेलं व्हतं फक्त बसून खायचं व्हतं सात जन्मी सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
909 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा