Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उद्यानांचे सुशोभीकरण ( संशयास्पद चाल म.न .पा. ची )

स
सिद्धेश्वर विलास पाटणकर
Wed, 07/12/2017 - 15:00
🗣 29 प्रतिसाद
फार पूर्वी जर आपल्याला माहित असेल तर महानगर पालिकेच्या उद्यानात कुंपण म्हणून एक कडू वनस्पतीचा वापर केला जायचा .. त्या वनस्पतीचे नाव मला माहीत नाही आता .. पण पूर्वी माझ्या कॉलेजमध्ये मी संशोधन करत असताना एका विद्यार्थी मित्राने त्या वनस्पतीवर भरपूर शोधनिबंध सादर केले होते .. माझी त्यावर त्याच्याशी चर्चा देखील झाली ... त्या वनस्पतीचे फायदे ऐकून तर मी चाट पडलो होतो .. त्यातील एक म्हणजे कित्येक मीटरपर्यंत ती डास आणि माश्याना लांब रोखू शकत होती .. मला अजूनही आठवतंय .. आम्ही सारे आमच्या येथील उद्यानात बिनधास्त खेळायचो .. आजची परिस्थिती आज आपण सारे बघतो ते उद्याने निव्वळ बनकामाच्या फुलझाडांनी सुशोभित केलेली असतात .. त्यामुळे काही विषारी कीटकही त्या फुलझाडांमुळे आकर्षित होतात .. मागे लोकसत्तामध्ये वाचताना तर मला चीड आली ... एका मुलीचा विषारी कीटकाने चावा घेतल्याने अकस्मात मृत्यू .. ती फक्त उद्यानात तिच्या वडिलांसोबत बॅडमिंटन खेळात होती ... तिथे तिला काहीतरी चावले .. तिने त्याला मारले देखील .. घरी आल्यावर तिला मळमळु लागले आणि इस्पितळात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू ... काय तर म्हणे त्याचा ऍंटीडोट उपलब्ध नव्हता ... ह्या अश्या विचित्र केसेस पूर्वी तर वाचनात आल्या नव्हत्या ... एक मात्र नक्की .. ती औषधी झाडं का काढली .. का कुणी सोयीस्कर रित्या काढली .. हे सीशोभीकरण आहे कि म . न. पा .ची एक विशेष चाल आहे .. त्यामागे काही अर्थकारण आहे का कि अजून काही ? त्या औषधी झाडांची आजही तेवढीच गरज आहे जेवढी पूर्वी होती .... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
8316 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
प्रसाद_१९८२ Wed, 07/12/2017 - 15:07 नवीन
.... आपले मत या विषयावर आवश्यक आहे ... -- नक्की कोणत्या विषयावर ??
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Wed, 07/12/2017 - 15:37 नवीन
त्या औषधी वनस्पतीवर ... जिचा उपयोग आजही लोक खेड्यापाड्यात गुरंढोरं येऊ नयेत म्हणून करतात .. त्या विषयावर
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/12/2017 - 15:50 नवीन
ती वनस्पती कडू मेंदी असावी. त्याचे पान तोडले तरी हात कडू होत असत आणि साबणाने समूळ धुवावे लागत. आमच्या सोसायटीत कुंपणाला होती. पण त्यामुळे डास होत नाहीत असे मात्र नव्हे.हा एक दुवा पण आहे. http://www.loksatta.com/thane-news/benefits-of-a-living-fence-for-planting-1125289//lite/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/12/2017 - 15:51 नवीन
http://gardentia.net/2014/01/10/kadu-mendi-koynel/
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 07/12/2017 - 15:58 नवीन
सूचना चांगली आहे. औषधी वनस्पती लावली जावी.
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Wed, 07/12/2017 - 16:00 नवीन
धन्यवाद खरे साहेब .. इथे या लिंकमध्ये जो हँगिंग गार्डनचा उल्लेख केलेला आहे तीच वनस्पती .. आजही तिथे आहे .. या वनस्पतीमुळे डास होतं नाहीत हे हि खरे आहे .. माझ्या मित्राचे शोधनिबंध मी वाचले आहेत .. तो संशोधनदरम्यान नेहेमी गटाराशेजारून डास पकडून आणायचा आणि त्या वनस्पतीच्या बनवलेल्या अर्कामध्ये बंद करून ठेवायचा ...
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 07/16/2017 - 09:50 नवीन
शोधनिबंधामधे नाव नव्हतं काय? कुठल्या उण्वर्सि्टीत हो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
आ
आदूबाळ Wed, 07/12/2017 - 16:01 नवीन
'त्या' औषधी वनस्पतीचं नाव काय आहे?
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Wed, 07/12/2017 - 16:04 नवीन
खरे साहेबानी पाठवलं आहे ते असावं बहुधा .. कडू मेहेंदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सतिश गावडे गुरुवार, 07/13/2017 - 05:28 नवीन
मेहंदी नाही. तुम्ही म्हणताय तशी वेगळी कुंपण म्हणून लावली जाणारी कडू वनस्पती आहे. आमच्याकडे मेती म्हणतात (खायची मेथी वेगळी) आमच्या लहानपणी एक अफलातून कल्पना होती या वनस्पतीबद्दल. आताही असेल. एरव्ही कडू लागणारा या वनस्पतीचा पाला सापाचे विष अंगात भिनल्यावर गोड लागतो म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
स
सतिश गावडे गुरुवार, 07/13/2017 - 05:30 नवीन
आता डॉ. खरेंनी दिलेल्या दुव्यावर फोटो पाहिला. हीच ती वनस्पती. आमच्याकडे कडू मेहंदी न म्हणता मेती म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूड Wed, 07/12/2017 - 17:50 नवीन
'त्या' औषधी वनस्पतीचं नाव काय आहे?
त्याच्याशी काय घेणं देणं आहे? आपल्याला रतीब घालता आला म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
च
चष्मेबद्दूर गुरुवार, 07/13/2017 - 18:10 नवीन
माझ्या आठवणीत ही वनस्पती कुंपणाला असायची आणि तिला हात लागला असेल तर आमची आई आम्हाला हात धुतल्या शिवायकाही खाऊ देत नसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सिद्धेश्वर विल… Wed, 07/12/2017 - 16:04 नवीन
एक निंबळक म्हणून गाव आहे .. सोलापूर रोडला ... त्या गावात मी वर्षाकाठी एकदा तरी जातो .. तिथे प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे त्या गावात कडुलिंबाची काडीपण जाळली जात नाही .. का तर म्हणे त्या घरातून साप निघेल आणि तो सर्व नष्ट करेल .. त्या गावात आजही कडुलिंबाची प्रचंड प्रमाणावर झाडे आहेत .. तिथे गेल्यावर एक वेगळाच आल्हादायक आनंद मिळतो .. शुद्ध हवा .. कुठलाही कीटक नाही ..
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 07/12/2017 - 18:00 नवीन
छान महिती ! आख्यायिकेतल्या भितीनुसार वारसा जपला गेलाय ! भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिद्धेश्वर विलास पाटणकर
अ
अभिदेश Wed, 07/12/2017 - 18:05 नवीन
गाव नगर रोडला आहे , सोलापूर नाही ..
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Wed, 07/12/2017 - 23:36 नवीन
निगडीची झाडे असावीत. गुरे अजीबात खात नाहीत. कायम गीरहीरवीगार असतात, ५ ते १० फुटापर्यंतच वाढतात. बर्र्‍याच ठीकाणी कुंपणाला वापरतात.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/13/2017 - 03:46 नवीन
ओ ते निगडी आकुर्डी नाही, निर्गुडी म्हणत्यात त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
स
सतिश गावडे गुरुवार, 07/13/2017 - 05:22 नवीन
आमच्याकडे* निंगडी म्हणतात. *दक्षिण रायगड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कपिलमुनी गुरुवार, 07/13/2017 - 06:24 नवीन
सगा सर , तुम्हीं 'आमच्याकडे' शब्दकोश का प्रकाशित करत नै ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कंजूस गुरुवार, 07/13/2017 - 11:11 नवीन
तो कडू मेंदा! याच्या पांढय्रा फुलांची तिपेडी वेणी करता येते. पण कुण्णाला नको असायची.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 07/13/2017 - 11:13 नवीन
कडुलिंब , निर्गुडी आणी दगडी या औषधी वनस्पतींचा पाला जखमेवर उपयुक्त असतो .
  • Log in or register to post comments
स
सरल मान गुरुवार, 07/13/2017 - 13:53 नवीन
dodonaea plant बोलतात त्याला...
  • Log in or register to post comments
स
सरल मान गुरुवार, 07/13/2017 - 14:31 नवीन
http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Dodonaea+viscosa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरल मान
क
कलंत्री Fri, 07/14/2017 - 13:15 नवीन
घाणेरीच्या झाडाजवळ डास फिरकत नाही असे वाचले आहे. काही वनस्पती या किटक भक्षकही असतात. तुळशीच्या रोपावरही संध्याकाळी डास बसतात आणि तेथेच चिटकून राहतात.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Fri, 07/14/2017 - 14:29 नवीन
माणसांना चावण्याचं काम डासीन बाई करतात, ते ही अंड्यांच्या पोषनासाठी, मग डासोबा कशावर जगतात? ते झाडांच्या कोवळ्या फांद्यांमधुन जिवन रस शोषुन जगतात असं ऐकुन आहे, हे जर खरे असेल तर, त्या औषधी झुडपाच्या प्रकारात तथ्य आहे असे म्हनावे लागेल.
  • Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ Sat, 07/15/2017 - 05:19 नवीन
सादर लेखातील उदाहरण म्हणजे specific केमिकल्सची ऍलर्जी असू शकते. जर तिथे खरंच विषारी कीटक असतील तर अशा केसेस सारख्या घडल्या असत्या ज्या सुदैवाने घडत नाहीयेत. मागे एका व्यक्तीचा मृत्यू धनुर्वात प्रतिबंधक इंजेक्शनच्या ऍलर्जीमुळे झाल्याचे ऐकिवात आहे (त्या व्यक्तीने आयुष्यात ते इंजेक्शन पहिल्यांदाच घेतले होते). असो! बाकी औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या गरजेबद्दल सहमत!
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 07/15/2017 - 11:40 नवीन
लेखात उल्लेखलेली वनस्पती म्हणजे कोयनेल किंवा कडू मेंदी हीच आहे. हिचे शास्त्रीय नाव clerodendrum inerme असे आहे. हिला छोटी छोटी पांढरट गुलाबी फुले येतात. पराग केसर गुलबट असतात. देठ थोडे लांब असल्याने एकात एक गुंफून वेणी करता येते. फुलांना मंद वास असतो. सार्वजनिक बागांमध्ये कुंपणाला किंवा पायवाटांच्या बाजूबाजूने कोयनेल लावतात. हिची योग्य छाटणी करून वेगवेगळे आकार देतात. त्यामुळे कुंपणाची शोभा वाढते.
  • Log in or register to post comments
र
राही Sat, 07/15/2017 - 13:35 नवीन
आपल्याकडे लोकमानसात कोयनेल हे औषध म्हणून हिवतापाशी जोडले गेले आहे. पण हिवतापावरचे क्विनाइन हे औषध ज्या वनस्पतीत असते ती सिंकोना (cinchona) ही वनस्पती अगदीच वेगळी आहे. तिचा क्लेरोडेन्ड्रम इनेर्मे शी काहीच संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा