पुस्तक
ते पुस्तकच आहे.
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड.
एकदा तू वाचलेलं.
तू तिथं नसताना
मी वाचलेलं.
तिसरं कुणीही ते वाचलेलं नाही.
एकदा तू, नंतर मी.
कथा तुझ्या डोळ्यांनी वाचली
मी तुझे डोळे वाचले.
ते पुस्तकच आहे? अजूनही?
दूर तुझ्या घरात ठेवलेलं
काचेआड...
-शिवकन्या
💬 प्रतिसाद
(2)
प
प्राची अश्विनी
Sun, 07/16/2017 - 03:54
नवीन
क्या बात! रविवारी सकाळी अशी सुंदर कविता म्हणजे दिवस चांगला जाणार हे नक्की.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Mon, 07/17/2017 - 07:16
नवीन
अप्रतिम..
- Log in or register to post comments