Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

...नवल!

स — सत्यजित..., Sun, 07/16/2017 - 13:03
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल! कुणी पारधी ना कधी भेटला कुणी साधले हे निशाणे..नवल! कुणी हात सोडून अर्ध्यावरी बरे घेत आहे उखाणे..नवल! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
2955 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
राघव Tue, 07/18/2017 - 18:29 नवीन
असे शब्द.. अर्थात ओथंबलेले! समजूनही पुन्हा वाचणे.. नवल! भाषेत अपुल्या कशी ती करामत! पुन्हा भाव "तो".. उमजणे.. नवल! गझल खूप आवडली. शेवटचा ट्विस्ट कातिल! :-)
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 07/19/2017 - 09:13 नवीन
सुंदर !!! वरची राघव यांची उत्स्फूर्त दाद ही आवडली !
  • Log in or register to post comments
स
सानझरी Wed, 07/19/2017 - 09:38 नवीन
फारच सुंदर!!!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 07/19/2017 - 17:49 नवीन
राघव खूप भरभरुन दाद दिलीत,त्याबद्दल आभारी आहे मी आपला! मितान,सानझरी...आपलेही मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
S
Swapnaa Tue, 07/25/2017 - 15:24 नवीन
Khup chan
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा