Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महावितरण वीजबिलाचा झोल

म
मार्मिक गोडसे
Mon, 07/17/2017 - 13:09
🗣 69 प्रतिसाद
जून महिन्यात महावितरणच्या सगळ्याच ग्राहकांची वीजबिलं नेहमीपेक्षा अधिक आल्याची तक्रार होती. जे ग्राहक तक्रार करायला गेले त्यांना उन्हाळ्यात पंख्यामुळे बिल जास्त येते असं कारण सांगितले. मी बिल नीट बघितले तर आमचे बिल १ महिन्याचे नसून १.३ महिन्याचे होते. म्हणजे ९ दिवस उशीरा मिटर रिडींग घेतले होते, त्यामुळे अधिक युनिट पडल्याने बिलही जास्त आले होते . बाबा तक्रार करायला महावितरणच्या कार्यालयात गेले, तेथील अधिकार्‍याने उशीरा रिडींग घेतल्याचे मान्य केले. पुढील महीन्यात ८-९ दिवस आधी रिडींग घेतले जाईल ,त्यामुळे पुढचे बिल कमी येईल. खरोखरच पुढील महिन्याचे बिल ०.७३ महिन्याचे म्हणजे २२ दिवसाचे आले , बिल कमी आल्याचे समाधान वाटले. वरवर पाहता ह्यात आपले काही नुकसान झाले नाही असं वाटेल, परंतू प्रत्यक्षात महावितरणने ग्राहकांच्या खिशातून पैसे चोरले आहेत. ज्या ग्राहकांचा नेहमी महिन्याचा वीज वापर १०० किंवा वरील स्लॅबच्या आत असेल त्यांचे रिडींग १.३ महिन्याने घेतल्याने काही युनिट वरच्या स्लॅबमध्ये गेल्याने तितक्या युनिटला अधिक दर लागल्याने त्या ग्राहकाला नाहक भुर्दंड पडला. पुढील महिन्यात लवकर रिडींग घेतले तरी त्या ग्राहकाला त्याचा काहीही फायदा झाला नाही,कारण जरी एक महिन्यानी रिडींग घेतले असते तरी त्याचा वीज वापर ठरावीक स्लॅबच्या आतच आला असता. ह्याला महावितरणची छुपी भाववाढ म्हणायचे काय? वीजबिलातील 'आकार' हे नक्की काय असतात हे कळतच नाही. नोव्हें.१६पर्यंत वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वीज शुल्क व इंधन समयोजन आकार ह्यांचा समावेश होता. डिसें.१६ पासून त्यात वहन आकाराची भर पडली.वीज आकार स्थिर ठेवले जातात व बाकीचे आकार वाढवून वीज ग्राहकांची लूट केली जाते. स्थिर आकार एक वर्षात २०% ने वाढला. ग्राहकाला बुचकाळयात टाकणार्‍या ह्या आकारांची खरोखरच आवश्यकता आहे का?

प्रतिक्रिया द्या
20244 वाचन

💬 प्रतिसाद (69)
म
मार्मिक गोडसे Wed, 11/01/2017 - 20:53 नवीन
तेच मी त्यांना विचारतोय इथे राजकीय धुळवड कशासाठी? आणि मी तेथे दिलेल्या प्रतिसादात त्यांनी उल्लेख केलेल्या व्यक्तीवर आगपाखडही केलेली नाहीये. उगाचच पिरपीर चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुबोध खरे गुरुवार, 11/02/2017 - 04:40 नवीन
माफ करा पण अत्यंत बालिश वाटला प्रतिसाद! सरकारी कामे अर्थपूर्ण संबंधाशिवाय होत नाही लिहिले तेथे लगेच निश्चलनीकरणाची पिंक टाकण्याची गरज होती का? त्या धाग्याचा राजकारणाशी किंवा प्रचलित अथवा माजी सरकारशी संबंध हि नव्हता. म्हणून इथे लिहिलं कि राजकारण तुम्हीच आणता तर तुम्हाला प्रतिसाद बालिश वाटला. बढिया है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
थ
थॉर माणूस गुरुवार, 11/02/2017 - 19:06 नवीन
तेथे लगेच निश्चलनीकरणाची पिंक टाकण्याची गरज होती का?
अहो तिथले तिथे मिटवा ना, इथे कशाला घेऊन येताय? त्या धाग्यावर त्यांनी काय लिहीले त्याचा प्रतिवाद इथे संदर्भ नसताना करण्यालासुद्धा पिंक टाकणेच म्हणतात, यांच्यात आणि तुमच्यात काय फरक मग? खरेसाहेब, मनापासून सांगतो... तुमच्या जुन्या लेखनाविषयी फार आदर आहे. पण एकदा तुमचे गेले काही प्रतिसाद तुम्हीच पहा. इतर काही आयडींचा कार्यक्रमच एका ठराविक अजेंड्याभोवती असल्याने त्यांचे अशा प्रकारचे प्रतिसाद अपेक्षीत वाटतात. तुमच्याकडून निदान मला तरी ही अपेक्षा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 11/03/2017 - 05:16 नवीन
आपल्या मताचा आदर आहे. ट्रोलांच्या नादाला न लागणे हे बरोबर. पुन्हा असे होणार नाही याची काळजी घेईन धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
व
विशुमित गुरुवार, 11/02/2017 - 06:22 नवीन
अवांतर: "बालिश" शब्दावरून वरून पवार साहेबांचे २-३ दिवसापूर्वीच स्टेटमेंट आठवले. असो.. इथल्या चर्चे मध्ये दुरुयान्वे कोणता संबंध नाही. शब्दासाठी पोच पावती होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुबोध खरे Wed, 11/01/2017 - 19:45 नवीन
वीज नियामक आयोगाने 01 /04/2017 पासून घरगुती ग्राहकांसाठी निर्धारित दर असे आहेत. 0-100 युनिट 3 रुपये 101 ते 300 युनिट 6.73 रुपये 301 ते 600 युनिट 9.7 रुपये 501 ते 1000 युनिट 11.2 रुपये 1000 च्या वर 12.48 रुपये. यात फक्त 100 युनिटपेक्षा खाली असणाऱ्या ग्राहकांना सबसिडी आहे ( गरीब आणि पिछडे इ इ) बाकी कुणालाही काहीही सबसिडी नाही. उगाच सबसिडी घरगुती ग्राहकांना मिळते म्हणून बोंबा बॉम्ब मात्र करत आहात. घरगुती ग्राहक ( सुद्धा) शेतकऱ्यांना क्रॉस सबसिडी देतात ही वस्तुस्थिती आहे वरील आकडे माझ्या स्वतःच्या विजबिलातील आहेत 23/ 10 /2017 च्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मार्मिक गोडसे Wed, 11/01/2017 - 20:18 नवीन
यात फक्त 100 युनिटपेक्षा खाली असणाऱ्या सबसिडी आहे ( गरीब आणि पिछडे इ इ) बाकी कुणालाही काहीही सबसिडी नाही. उगाच सबसिडी घरगुती ग्राहकांना मिळते म्हणून बोंबा बॉम्ब मात्र करत आहात. तुमचा वापर १०० युनिटपेक्षा जास्त झाला तरी पहिल्या १०० युनिटला सवलतीचाच वीजदर लावला जातो. त्यात गरीब श्रीमंत असा भेद केला जात नाही. त्यात सगळे घरगुती ग्राहक येतात. तुमचे घरगुती वीजबिल तपासून खात्री करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 11/02/2017 - 04:46 नवीन
गोडसे बुवा आपलंच खरं करण्यासाठी कशाला शुद्ध थापा मारताय? लहान मुलाला पण समजतं कि १०१ युनिट झाले कि सगळ्याच्या सगळ्या १०१ युनिट वर रुपये ६. ७३ ने पैसे भरावे लागतात. आणि ३०१ च्या वर युनिट झाले तर ९ रुपये ७० पैशाने सगळ्या युनिटवर पैसे भरावे लागतात. वर म्हटलेल्या २३/१०/२०१७ च्याच बिलात ३२८ युनिट झाले त्यांचे २११६.५५ रुपये झाले आहेत इतर अधिभार समायोजन वगैरे वेगळे. हिशेब करून पहा. पडलं तरी नाक वरच हि वृत्ती डोक्यात जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 11/02/2017 - 05:38 नवीन
100*3.0 = 300 200*6.73 = 1346 28*9.7. = 271.6 एकूण होतात 1917.6 रू. तुमच्या बिलात दाखवले आहेत 2116.55 रू. 198 रू. जास्त दाखवले आहेत. तुमच्या हिशोबाने 328*9.7=3181.60 रू. होतात. म्हणजे 1065 रू. कमी बील दाखवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 11/02/2017 - 06:14 नवीन
ते इंधन समायोजन आकार आणि वीज शुल्क मिळून बिल २७२९. ३२ रुपये झाले आहेत आणि त्यात निव्वळ थकबाकी / जमा ७७. ५४ रुपये मिळवले आहेत.( हे सर्व काय आहे माहित नाही) मिळून बिल रुपये २८०६. ८६ होते. अगदी २११६ रुपये धरले तरीही प्रति युनिट रुपये ६.४५ होतात आणि वीज निर्मितीचा खर्च ४ रुपये ५० पैसे आहे. मग हि सबसिडी सबसिडी ची बोंबाबोंब का चालू आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 11/02/2017 - 08:09 नवीन
जा पहिले त्या लहान मुलाला विचारा , मला(तुम्हाला) ९.७० ₹ वीजदर का बरं लावला नाही? जा पहिले त्या लहान मुलाला विचारा इं.स.अा. काय आहे? जा पहिले त्या लहान मुलाला विचारा वहन आकार काय आहे? जा पहिले त्या लहान मुलाला विचारा आयोगाने वीज निर्मिती खर्च किती ठरवून दिलाय? १.६७ युनिट नंतर सबसिडी दराने वीज आकार लागत नाही(४.५०₹ वीज निर्मिती खर्च धरला तर) ह्याचा अर्थ १६७ युनिट वीज वापरकर्ते गरीबच पकडायचे, फक्त १०० पर्यंतचे नाही.आणि असे लाखोंनी वीजग्राहक आहेत. माझ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा वीजबिलाचे आकार नीट समजून घ्या, वीज कर सोडल्यास सगळेच पैसे आपण महावितरणच्या घश्यात कोंबत असतो, तरी महावितरण तोट्याच्या बोंबा का मारतोय हे ही विचारून या. चौकशी केली तर तुम्हालाच फायदा होईल. मला बऱ्याच वेळा झाला आहे. आता व्यक्तिगत शेरेबाजी बंद करा, सगळ्याच मुद्यांवर तुम्ही तोंडावर आपटला आहात. बघा जमतंय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 11/02/2017 - 13:53 नवीन
उगी उगी )))--((((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Sat, 10/28/2017 - 11:44 नवीन
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/maharashtra-plans-to-cut-power-tariff-for-farmers-aims-to-install-solar-pumps-in-fields/articleshow/46183846.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/28/2017 - 11:45 नवीन
https://economictimes.indiatimes.com/industry/energy/power/maharashtra-plans-to-cut-power-tariff-for-farmers-aims-to-install-solar-pumps-in-fields/articleshow/46183846.cms
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 11/04/2017 - 14:20 नवीन
कालच्या अ‍ॅग्रोवन मधील लेख वीज कंपन्यांचा उफराटा कारभार
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 17:21 नवीन
"अ‍ॅग्रोवन" मधील लेख ना! हरयानातील अशिक्षित लोकांना देवीलाल सांगायचे की धरणातील पाणी वीजेकरता वापरल्यावर त्यातील सत्व नष्ट होते व असे सत्वहीन पाणी शेतीला देऊन शेतकऱ्यांना फसवितात. वरील लेखातील खालील परिच्छेद वाचून देवीलालांची आठवण आली. "वीज वितरण कंपनीकडून हाताशी असलेली एकूण वीज प्राधान्याने शहरी ग्राहक, उद्योग वगैरे अन्य क्षेत्रांना पुरवून उरलीसुरली निष्प्राण झालेली वीज ग्रामीण व शेतकरी ग्राहकांकडे वळवली जाते. उष्ट्या पत्रावळीतून जी काय शितं हाती लागतील, त्यावर लोकांनी आपली भूक भागवावी, अशी एकूण सरकारची आणि व्यवस्थापनाची अपेक्षा असते."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 11/04/2017 - 17:50 नवीन
कृपया चुकीचे अर्थ काढण्यात ऊर्जा वाया घालवू नका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/04/2017 - 17:54 नवीन
चुकीचे अर्थ मी काढत नसून लेखातील चुका दाखवित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sat, 11/04/2017 - 19:03 नवीन
तुम्ही म्हणता तसे चुकीचे नाहीये .पूर्ण लेख वाचा. निकृष्ट दर्जाचा वीजपुरवठा व त्यामुळे पंपांचे होणारे नुकसान ह्या संदर्भाने लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा