Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले

स — सिद्धेश्वर विलास पाटणकर, Tue, 07/18/2017 - 12:53
स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले अरे लेकानो मारले कसले चांगले उभे आडवे हाणले पुढे गेलो तर काय ? जंगली हत्तींचा कळप चालून आला बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला भिरकावून दिले गगनात सारे अजुनी आहेत ते बनुनी गगनी तारे याच तार्यांचे पाठ गिरविता तुम्हासी न ठावे असे मीच करविता मखलाशी चालू असे मनाशी बहुत लढे उशी घेऊन उशाशी लढता लढता लाथ पसारे बायको उठुनी झाडू मारे स्वप्न मोडिता सत्य अवतरे मारलीस का कधी खरी कबुतरे ? सिद्धेश्वर विलास पाटणकर C

प्रतिक्रिया द्या
1334 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
सिरुसेरि Tue, 07/18/2017 - 13:08 नवीन
मस्त कविता . "झेंडुची फुले" आठवली .
  • Log in or register to post comments
स
सिद्धेश्वर विल… Tue, 07/18/2017 - 15:01 नवीन
धन्यवाद सिरुसेरी .... माफ करा पण एक सत्य सांगतो .. मी बिलकुल वाचनाच्या वाट्याला जात नाही ... मला वृत्तपत्र वाचायला फार आवडते आणि मी ते नेहेमी कसाही वेळ काढून वाचतो .... रविवारी नुसतं वाचत नाही तर अक्षरशः चाळून काढतो ... हीच काय ती माझी वाचनाची आवड ....
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 07/18/2017 - 15:23 नवीन
मस्त. भारी लिहिलय.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा