Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवकवीस्तोत्र

म — माम्लेदारचा पन्खा, Wed, 07/26/2017 - 18:40
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

प्रतिक्रिया द्या
15588 वाचन

💬 प्रतिसाद (41)
स
सत्यजित... Wed, 07/26/2017 - 19:08 नवीन
लै भ्भारी!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Wed, 07/26/2017 - 21:03 नवीन
=))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/27/2017 - 03:02 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/27/2017 - 03:18 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे गुरुवार, 07/27/2017 - 03:25 नवीन
;)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/27/2017 - 07:05 नवीन
ज्याला पाहिजे फक्त कौतुक | मर्कट लीलेस लाईक | शब्द रचतो जो एकावर एक | तो निंदेचाच धनी|| आठवा सावित्रीबाई फुले | ज्यांनी झेलले शेणाचे गोळे आता जग वाहते फुले | पुतळ्यावरती जयांच्या || बोल बोबडे बालकाचे | त्यावर हसणे इतरांचे | म्हणौनी तयांना बालकाचे | दगड मारणे का बरोबर || दगड मारण्या जी शिकवते | ती माता नव्हे वैरीण असते | लांब रहाणेच बरेच असते | अशा दैत्यी पासौनी || जो हतोत्साही होउन जातो | तो खरा कवी कधीच नसतो| जो या सर्वांना पुरुन उरतो | कवी ऐसा वंदावा || जो असतो शब्दांचा ईश्वर | त्यास जगाची नसते फिकीर | शब्दांच्या दुनियेचा जो मिहीर | तोच कवी जाणावा || ऐसा कविश्र्वर वंदावा | यथोचीत आदर त्याला द्यावा | देव्हार्‍यात त्याला बैसवावा |इश्वराच्या शेजारी || पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 07/27/2017 - 07:54 नवीन
गुरुदेव . . . . . !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 07/27/2017 - 09:46 नवीन
तुम्हा दोघांनाही दंडवत! कविता आणि विडंबन दोन्ही रापचिक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 07/27/2017 - 13:59 नवीन
खरोखरच प्रतिभावान आहात पैजार बुवा. नमस्कार घ्या. पंखा साहेबांचे पण मूळ काव्य भारीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड गुरुवार, 07/27/2017 - 15:14 नवीन
ह्या काव्यासाठी एक मस्तानी दिली तुम्हाला पैजारबुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 07/28/2017 - 07:27 नवीन
कोणती? ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 07/28/2017 - 08:17 नवीन
कोणती हा प्रश्र्णच येत नाही कारण सूड बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल नाहीत आणि आम्हीही बाजीराव नाही आहोत हे आम्हा दोघांनाही पक्के माहित आहे. प्रश्र्ण फक्त इतकाच असू शकतो की सुजाताची? कोंढाळकरची? का गुजरची? पण हा प्रश्र्ण विचारायचा मला अधिकार पोचत नाही. त्यामुळे मस्तानी हवी असेल तर सूड जिथे बोलवेल तिकडे मला जावे लागेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 07/28/2017 - 08:44 नवीन
अहो कोणती म्हणजे मँगो मस्तानी कि सीताफळ मस्तानी कि गुलकंद मस्तानी असे! :D :D .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रचेतस Fri, 07/28/2017 - 08:56 नवीन
गुजरचीच सर्वोत्तम. सुजाता/कोंढाळकरवाले मस्तानीच्या नावाखाली पातळ श्रीखंड देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कंजूस Fri, 07/28/2017 - 10:05 नवीन
पातळ श्रीखंड नसलेली म्हणजे कशी ते तुमच्याच शब्दात वर्णन करा ना गडे। (ठर्राव सूचक कंज्यूस, अनुमोदन आत्मुस )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/28/2017 - 14:18 नवीन
म्हणजे लस्सी आणि ताक ह्यात जसा फरक असतो तशी. मस्तानी पिता यायला हवी, चमच्याने खाता नव्हे.(त्यातले आईसक्रीम सोडून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
श
शार्दुल_हातोळकर Fri, 07/28/2017 - 20:18 नवीन
सुपर्ब कविता पैजारबुवा !! क्या बात है !! दंडवत __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ए
एस गुरुवार, 07/27/2017 - 08:38 नवीन
आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।।
या कडव्याकरिता शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्या!!!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 07/28/2017 - 11:22 नवीन
एस मलाही हेच कडवे अप्रतिम वाटले. भारीच......!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नावातकायआहे Fri, 08/18/2017 - 05:52 नवीन
बाडिस...! लैच आवडल्या गेले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
प
पुंबा गुरुवार, 07/27/2017 - 09:26 नवीन
हाहाह्हा... तुमचे आणी पैजारबुवांचेदेखील काव्ये फर्मास झाली आहेत.. हहपुवा..
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 07/27/2017 - 09:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 07/27/2017 - 09:57 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 07/27/2017 - 10:41 नवीन
दोन्ही काव्ये जबरा जमली आहेत.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 07/27/2017 - 11:11 नवीन
मस्त जुगलबंदी !! पैजारबुवा रॉक्स !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/27/2017 - 11:17 नवीन
=)) =)) =)) मापंची कविता मुळात सुंदर । तीवरी ज्ञापैंचा कळस टोकदार । आमच्याकडून घ्याव्या वारंवार । टाळ्या आणि हशा ॥
  • Log in or register to post comments
स
सानझरी गुरुवार, 07/27/2017 - 11:24 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 07/27/2017 - 11:28 नवीन
मूळ काव्य आणि त्यावर पैजारबुवांचा कळस, दोन्ही भारीच.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 07/27/2017 - 11:40 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 07/27/2017 - 11:40 नवीन
:))
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 07/27/2017 - 12:45 नवीन
मापंची मुळ कविता आणि पैजार बुवांची कविता दोन्हीही आवडल्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप-लेले गुरुवार, 07/27/2017 - 17:25 नवीन
दोन्ही कविता झकास :)
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 07/27/2017 - 17:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 07/27/2017 - 17:34 नवीन
पण पैजारबुवा आमच्याकडून नमस्कार घ्या .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/28/2017 - 03:59 नवीन
गोविंदराव आणि नानोबांचे पैजार फार भारी.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/28/2017 - 12:19 नवीन
हे गोविंध्राव कोण म्हणे? ;) पण मापं झबरदस्त लिव्हलाय आणि आमचं माऊलीचं तर काय इचारायचं. शिस्तीत टोला सीमापार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Sat, 07/29/2017 - 03:57 नवीन
मापं हो! आता सेल्फिकरांवर बोधामृतवाणी हून जाऊ द्या।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा Fri, 07/28/2017 - 10:08 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
ल
लीलाधर Fri, 07/28/2017 - 20:17 नवीन
पै माऊली आपले विडंबन काय पण टोला हाणलाय कोपरापासुन दंडवत घ्यावा माऊली ..
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Sat, 07/29/2017 - 05:54 नवीन
दोन्ही कविता आवडल्या गेल्या आहेत
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 08/15/2017 - 18:18 नवीन
दोन्ही रचना उत्तम! आवडेश!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा