पाककृती
फुडोग्राफी २०१७
Primary tabs
नमस्कार मंडळी,
गेली दिड वर्ष मी मिपा वर आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याच पाककृती टाकत आहे/टाकतो आहे. तुम्हा सर्वांकडून वेळोवेळी मिळालेली दाद, प्रोत्साहन ह्याने हुरूप वाढत आहे. यंदा, पुण्यात एक वेगळे प्रदर्शन भरत आहे, (ह्याबद्दल मला देखील फेसबुक वरून कळले. गम्मत म्हणून मी माझी काही छायाचित्र पाठवली, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझी काही छायाचित्रे देखील ह्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत). आपण पुण्यात असाल, तर प्रदर्शनास नक्की भेट देऊन, सगळ्या छायाचित्रकारांचे प्रोत्साहन वाढवाल ह्यात शंका नाही, म्हणून हे आग्रहाचे आमंत्रण! फूड फोटोग्राफी बद्दल इतर छायाचित्रकारांकडून अनेक गोष्टी शिकायची संधी ह्या प्रदर्शनामुळे मला मिळणार आहे, ह्याचा आनंद नक्कीच आहे!
अभिनंदन केदार .
व्वा व्वा केदार, मस्तच...अशीच प्रगती होत राहू देत....
तुमची इतर चित्रे( प्रदर्शनात नसलेली) इथे टाका.
निदान दुधाची तहान ताकावर भागवूनघेऊ.
सहमत
आणि प्रदर्शन झाले की प्रदर्शनातलीही इथे देऊ शकता.
अभिनंदन केडी!
+ १
अभिनंदन!!!
खूप छान.
अभिनंदन केडि सर.
अभिनंदन.
अभिनंदन. छानच.
हार्दीक अभिनंदन !
अरे वा.. छानच! अभिनंदन!
अभिनंदन केदार.
शनिवा,, रविवार पुण्याबाहेर असल्याने हे प्रदर्शन चुकणार.
सगळ्यांचे मनापासून आभार! प्रदर्शनात दिलेले बहुतेक फोटो इथे पाककृतीनं मध्ये टाकलेले आहेत, आता जे प्रदर्शनात दाखवण्यात येतील ते टाकेन इथे. मला देखील अजून मी दिलेल्यापैकी नक्की कुठले आणि किती फोटो प्रदर्शनात दाखवतील हे एक सरप्राईज असणार आहे.
आता एकदा भेटलच पाहिजे !!!
Food Glorious Shoot!
मी येईन बघायला जमल तर
व्वा व्वा छानच हार्दिक अभिनंदन
कधी टाकणार आहात फोटो ?
इथे बघा
ह्या पाककृतीचा फोटो प्रदर्शनात होता