सुधा मूर्ती बिझिनेस क्लास
साधारण पार्श्वभूमी "
-सुधा मूर्तींनी बिझिनेस क्लास चे बोर्डिंग कार्ड घेऊन रांगेत उभे असतांना एका बाईने त्यांना "ह्यो स्पेशल क्लास हाये तुमी तिकडे जावा, आले उठून गुरांच्या कळपातले " सदृश काहीतरी बोलली
-सुधा ताई संतापल्या पण शांत राहिल्या आणि त्यांनी विचार केला तेव्हा कळले कि त्यांच्या साध्या कपड्यात त्या बिझिनेस क्लास वाल्या दिसत नव्हत्या
-आपले बोर्डिंग कार्ड दाखवून त्या बै ला शांत करण्या ऐवेजी त्या स्वत:च शांत बसल्या
ट्रान्स्फर सीन
-एक समारंभ जिथे सुधा ताई अध्यक्षा आणि ह्याच त्या बाई आता स्वतः सध्या कपड्यात अवतीर्ण झाल्या आणि सुधातैंना बघून चकित झाल्या आणि मग नियतीचा न्याय सिध्द झाला
आणि
जिकडे तिकडे चर्चेला सुरुवात झाली ... आता आमचे काही शिम्पल प्रश्न १. मुळात हा सगळा किस्सा घडला तो घडला, तो मिडिया पर्यंत इतका पोहोचवला कुणी ? विमान तळावर आणि त्या समारंभात दोन्ही ठिकाणी हजर असलेल्यांपैकी ह्या दोघीन व्यतिरिक्त अजून तिसरा कुणी होत? असता तर शक्यता आहे कि तो सुधा तैना तो ओळखत असावा (तसेही त्यांना चेहेर्याने ओळखणारे विमान तळावर आजूबाजूला अनेक जन असणारच पण ते असो .... २. बिझिनेस क्लास मधल्या सोडाच पण एकोनोमित प्रवास करणारे ह्यांना चित्रविचित्र पोशाखात प्रवास करणारे सह प्रवासी बघण्याची सवय असते आणि मुळातच तिथे अपरिचित व्यक्तीला असला भोचक पणा करून कुणी फालतू सल्ले देईल अस वाटत नाही ३. त्यातून हि बऱ्याच वेळेला एखादा नवखा असेल तरत्याला मदत म्हणून अमुक करा किंवा इथून जा किंवा अस करू नका असे (भारतात तरी) नम्र पाने सांगितले जाते आणि ते कधी कधी योग्य हि असते. साध लोकल मध्ये सुद्धा फर्स्ट क्लास मध्ये शिरणारा फर्स्ट क्लास मधला "वाटत" नसेल तर त्याला समज दिली जाते, ह्यात त्याला दंड होऊ नये हि भावना (बाकीच्या स्नोबिश भावने बरोबर) असतेच
४. समजा त्या बाई पुन्हा भेटल्याच नसत्या तर सुधा तैंनी काय केले असते, त्या रागवलेल्या तशाच राहिल्या असत्या, त्यांनी एखादा लेख लिहिला असता कि अजून काही का आपल्याला हि घटना कळलीच नसती
५. बिझिनेस क्लास तसा छोटा असतो त्यामुळे त्या बाईंनी सुधातैना विमानात बघितले नसेल हे जरा कठीण वाटते.
६. अतिश्रीमंत लोकांमध्ये आम्ही एकोनोमीने प्रवास करतो असा बोभाटा करून वागण्याची मध्यंतरी लाट आली होती ह्या निमित्ताने ते परत बिझिनेस / फर्स्ट (विमानाचा फर्स्ट , वर म्हटलेला लोकल चा फर्स्ट क्लास होता) क्लास मधून जायला लागले का ते नेहेमीच तसे जात होते ...
--६.a खिशात करोडो रुपये असतांना तुम्ही एकोनोमीने जाता आणि त्याची व्यवस्थित जाहिरात करता ह्यात तुमचा साधेपणा दिसतो कि प्रसिद्धी लोलुपता ? का दोन्ही ?
काय म्हणता ?
'आय' स्पेशालिस्ट=)) =)) "मराठी" भाषेला एक नवीन शब्दप्रयोग बहाल केला आहे तुम्ही :)