महाराष्ट्रात इंधनचोरीचे रॅकेट,आपण काय करु शकतो??????
सध्या महाराष्ट्रात पेट्रोलचोरीचं रॅकेट उघडकीस येत आहे.पुर्वी पेट्रोलमध्ये भेसळ करत होते ,आता तो मार्ग बंद झाल्यावर हा नवीन प्रकार सुरु झाला आहे.
काय आहे प्रकरण???
गाडीत इंधन सोडताना ते मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवलेली असते,ज्यावर आकडे दिसतात त्याच्याआत ही सिस्टीम असते.सध्या या सिस्टीममध्ये गडबड करुन काही मीलीलीटर इंधनाची चोरी करुन रोज लाखात नफा कमावला जात आहे.यात सगळेच पेट्रोलपंपचालक सामील आहेत.लोक सुटं पेट्रोल घ्यायला कॅन घेऊन आल्यास त्यांना मात्र योग्य पेट्रोल दिले जाईल अशी खबरदारी घेऊन हा गोरखधंदा चालू आहे.यात वरपर्यंत पैसा पुरवून प्रकरणं दाबली जात आहेत.
आपण काय करु शकतो?
शक्य असल्यास तक्रार करावी पण त्याचा उपयोग होईल याची गॅरंटी नाही.
या धाग्यावर तुम्हाला शंका असलेल्या अश्या चोरचिलटांचा जाहीर उल्लेख करुन इतरांना सतर्क करता येईल.
शक्यतो सुटे पेट्रोल वा डीझेल घ्यावे,यात बराच कुटाणा असला तरी हे रॅकेट जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत हाच पर्याय आहे.
ग्राहकहीतासाठी सादर.धन्यवाद.
प्रतिक्रिया