Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबाचं मन!

ज — ज्योति अळवणी, Mon, 07/31/2017 - 05:51
एवढस पिल्लू... My bundle of joy हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय? आईने वाढवलं... जन्माला घातलं! तुझं नाव लावून हातात तुझ्या दिलं... आहेस तू... असणारच आहेस! माझं सगळं तर आईच बघते आहे.. घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे! आपापलं जगणं आपण जगतोच आहे! खरंय पिल्ला... वेळ नाही दिला.. माझं नाव आणि फक्त पैसा दिला! आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं! वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन मन सारं कधीतरी मोकळं करीन पिल्लू जसजसं मोठं झालं आकाश त्याला बोलावू लागलं बेटा आता मीपण थोडा मोठा झालोय दमलो... थोडा बसिन म्हणतोय.. जमलंच तर कधी मागे बघ! बाबा असेलच त्याला किमान 'हाय-हॅलो' म्हण; खरच केली कायम धावपळ.. आसुसलो तुझ्या प्रेमाला मी पण.. काय करू पण 'बाबा' झालो तुझ्या जन्माने जवाबदार झालो शापित असतं हे बाबा असणं.. पिल्लाचं मन आईतच असतं!

प्रतिक्रिया द्या
3178 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
संदीप-लेले Mon, 07/31/2017 - 16:11 नवीन
व्वा, मनातलं बोललात ! "वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन" ... "शापित असतं हे बाबा असणं.. पिल्लाचं मन आईतच असतं!" अगदी खर !
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 07/31/2017 - 16:29 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 07/31/2017 - 18:33 नवीन
थोडे निगेटिव्ह वाटत आहे, मुलगी बापाची व मुलगा आईचा असेच पाहत वाढलो, देव दयेने मला पहिली मुलगी आहे ;) बाप म्हणून जबाबदारी कमी असते / नसते असे नसते हो. लिहले असते पण काय "मी"पणा दाखवत आहात असा आरोप होईल म्हणून गप्प बसतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 07/31/2017 - 19:47 नवीन
दशानन जी, वाढत्या वयातली मुलं कसं दुखावतात वडिलांचं मन आणि अनेकदा स्त्री इतकं मोकळेपणी मनातल्या भावना सांगता न आल्याने दुःखी झालेल्या बाबाच मन इतकंच सांगायचा प्रयत्न केला आहे मी.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 07/31/2017 - 22:05 नवीन
खुप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/01/2017 - 05:01 नवीन
छान...
  • Log in or register to post comments
य
योगेश लक्ष्मण बोरोले Tue, 08/01/2017 - 16:48 नवीन
मोजक्याच पण उत्तम शब्दात मांडलीत. मनाला भिडली कविता.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Wed, 08/02/2017 - 18:33 नवीन
मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 08/03/2017 - 05:03 नवीन
बाबा एक बाजू सांभाळत असतो, कित्येक वेळा त्याला भावना असूनही भावनाविवश होता येत नाही, मनातले मोकळेपणाने सांगता येत नाही. आई जातायेता मायेचं पांघरूण घालते, पिल्लाला सांभाळून घेते म्हणून कदाचित आईशी मुलांची जवळीक जास्त होते. हे सर्व कवितेत छान मांडलं आहे. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 08/13/2017 - 07:16 नवीन
धन्यवाद सौंदर्य
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा