काचेपलिकडचं वास्तव!
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं ।
मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।।
आतमध्ये शिरताच माझ्या
साधेपणाचे पाश तुटतात ।
साऱ्या सुप्त इच्छांना मग
शक्यतेचे पंख फुटतात ।।
दिपून जातात डोळे, काही दिसेनासं होतं ।
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।१।।
चोहीकडे दिसतात मला
जेव्हा वैभवाचे सडे ।
आणि लखलखणारी सुखं
रोखून बघतात माझ्याकडे ।।
कसं सामोरं जावं त्यांना
मला खरंच कळत नाही ।
माझं आणि पाकीटाचं, मत
काही केल्या जुळत नाही ।।
भर पावसात कोरडं राहावं, माझं अगदी तसं होतं ।
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।२।।
अपेक्षांना समजावत मग
मी इच्छांशी भांडत राहतो ।
दोन्ही बाजू त्याच तरीही
नवं गणित मांडत राहतो ।।
सभोवतालच्या सगळ्यांना
हे समीकरण जमतं कसं ।
भांबावलेलं वास्तव इथे
आभासात रमतं कसं ।।
उत्तर याचं शोधताना माझं मन वेडंपिसं होतं ।
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं..... ।।३।।
स्वतःवरचा ताबा माझा
मला मनापासून भावतो ।
हसरा खिसा न थकता
रिकाम्या हातांना समजावतो ।।
आपल्याला जे खरंच लागतं
ते अगदी थोडं आहे ।
पण नेमकं ओळखायचं कसं
हेच खरं कोडं आहे ।।
साऱ्या घटनेचा प्रभाव
मग सरतो काही क्षणामध्ये ।
केवळ एकच प्रश्न उरतो
आणि माझ्या मनामध्ये ।।
फुलपाखराचं पुन्हा एकदा सुरवंट कसं होतं ।
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं ।
मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।।४।।
💬 प्रतिसाद
(11)
च
चांदणे संदीप
Tue, 08/01/2017 - 13:32
नवीन
कविता आवडली!
Sandy
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 08/01/2017 - 14:02
नवीन
फारच मस्तं.
- Log in or register to post comments
य
योगेश लक्ष्मण बोरोले
Tue, 08/01/2017 - 16:44
नवीन
व्वा! मजा आली.
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 08/01/2017 - 20:21
नवीन
कविता छान आहे. आवडली.
- Log in or register to post comments
स
सानझरी
Wed, 08/02/2017 - 10:32
नवीन
आवडली कविता.. मस्तं!!!
- Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी
Wed, 08/02/2017 - 14:23
नवीन
आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार!!
- Log in or register to post comments
स
संदीप-लेले
Wed, 08/02/2017 - 14:36
नवीन
व्वा, छान ! आवडली
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Wed, 08/02/2017 - 16:59
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 08/02/2017 - 21:03
नवीन
छान कविता. आवडली!
- Log in or register to post comments
स
समाधान राऊत
गुरुवार, 08/03/2017 - 19:52
नवीन
शाबास रे भाई
- Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी
Mon, 08/07/2017 - 09:17
नवीन
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!
- Log in or register to post comments