Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जेथे जातो तेथे....

च — चामुंडराय, Fri, 08/04/2017 - 04:07
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालतो तयाला हाती धरुनिया गेलो कोठेही तरी देतो आधार दाखवितो मार्ग सदैव मजला सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा तयासी मी सदा खेळतो कौतूके नेट वरी सुखे संचार अंतर्बाही बॅटरी होता डाऊन जीव कासावीस धाव घेतो सत्वर चार्जर कडे इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा जगात नेटवर्क्स विविध अनेक ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी बॅलन्स तो संपतो असा भरभर रि-फिलचे बळ अंगी देई देवा रात्री साथ देई माझिया उशाशी प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या नानाविध रिंग-टोन भुलवी मजला फोटो, चलतचित्रे ठेवीतो हृदयी सुखद त्या सगळ्या आठवणी माझ्या जळी, स्थळी, पाषाणी असे तत्पर टिपण्या हसरी सेल्फी छबी माझी न पडे प्रश्न कसा टाइम पास खेळे गेम खेळीया प्रसंगी माझा ध्यानी मनी सदैव चिंतन तयाचे सांगावा इकडून तिकडे क्षणार्धात जोडुनिया आभासी जगाशी मजला सर्वज्ञ श्री गोगलदेवा दर्शन घडवी करणेषु मित्र कार्येषु दास असा तो प्रियतम् सखा माझा बरे झाले देवा तू मोबल्या निर्मिला विसरुनी जगाला स्व मग्न जाहलो जेथे जातो तेथे तोच माझा सांगाती तोच माझा सांगाती....

प्रतिक्रिया द्या
2025 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ए
एस Fri, 08/04/2017 - 09:28 नवीन
हा हा हा! एकच नंबर!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 08/09/2017 - 01:54 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
रुपी Wed, 08/09/2017 - 02:40 नवीन
मलाही आधी ते S भाऊच वाटत होते, पण त्यांच्या ख.व.मध्ये गेल्यावर कळले की ते Ace भाऊ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
च
चामुंडराय Wed, 08/09/2017 - 03:01 नवीन
स्वारी बर्का एक्का भाऊ तुमचे नाव चुकल्या बद्दल. तुम्ही कुठला एक्का म्हणायचे - बदाम, किल्वर कि चौकट? एक इस्पीकचे आहेत म्हणे त्यामुळे ते नाही विचारले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
स
सौन्दर्य Sat, 08/05/2017 - 06:55 नवीन
जेथे जातो तेथे मी त्याचा सांगाती चालवितो मज हाती धरोनिया.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 08/16/2017 - 02:20 नवीन
हे छानच आहे. तो माझा सांगाती ऐवजी मीच त्याचा सांगाती :) आता हि कल्पना धरून आणखी कडवी ऍडवा सौन्दर्य सर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
प
पद्मावति Wed, 08/09/2017 - 10:26 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 08/17/2017 - 06:44 नवीन
एकच नंबर!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा