Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अस्वस्थ बरसात

र — रवि बदलापूरेकर, Fri, 08/04/2017 - 18:50
अस्वस्थ बरसात अशीच अवचित आली सर ती पावसाची, सोबत दाटून आली सय तुझ्या आठवणींची तो पाऊस बेफाम तो वारा मदहोश, ती चिंब बरसात असलेली तुझी साथ ते गारठलेले हात ते उष्ण श्वास, होणारे ते स्पर्श हवेहवेसे सारे क्षण आली होतीत मिठीत जेव्हा कडाडली होती वीज, होते मानले किती आभार मी तिचे मनातल्या मनात त्या न संपणार्‍या गप्पा तुझ्या ते न विरणारे हास्य तुझे, आता छळते ही बरसात सदा जेव्हा आठवतात ते क्षण पुन्हा भिजतोय आजही मी तसाच साजणे चिंब तुझ्या आठवणीत, बरसणार्‍या या जलधारात वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत - रवि बदलापूरेकर

प्रतिक्रिया द्या
1531 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ध
धर्मराजमुटके Tue, 08/15/2017 - 12:13 नवीन
छान आहे कविता ! आवडली. मात्र आम्ही जात्याच अरसिक असल्यामुळे आम्हाला पावसात गेल्यावर फक्त थंडीच वाजते. असल्या रोमँटिक भावना जागृत होण्यासाठी काय करावे लागते ? अर्थात आता जाणून घेण्यात काही फायदा नाही म्हणा पण तेवढाच आपल्या इथल्या मंडळींना झाला तर झाला उपयोग !
  • Log in or register to post comments
र
रवि बदलापूरेकर गुरुवार, 08/24/2017 - 15:05 नवीन
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित Wed, 08/16/2017 - 20:01 नवीन
भिजतोय आजही मी तसाच साजणे चिंब तुझ्या आठवणीत, बरसणार्‍या या जलधारात वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत
  • Log in or register to post comments
र
रवि बदलापूरेकर गुरुवार, 08/24/2017 - 15:06 नवीन
आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
त
तृप्ति २३ गुरुवार, 08/17/2017 - 21:40 नवीन
खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया. Marathi kavita
  • Log in or register to post comments
र
रवि बदलापूरेकर गुरुवार, 08/24/2017 - 15:13 नवीन
तुमची कविता वाचली, छान झाली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तृप्ति २३
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा