Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे.

अ
अनामिका
गुरुवार, 10/16/2008 - 09:48
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4127 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मनीषा गुरुवार, 10/16/2008 - 10:03 नवीन
अगदी योग्य शब्द .. नेताजींचा मृत्यु विमान अपघातात झालाच नव्हता असे म्हणतात .. कोणी म्हणतात नंतर त्यांचे वास्तव्य नाशीक येथे होते . नेताजींच्या डायर्‍या आणि काही जुने फोटो तिथल्या एका व्यक्ती जवळ सापडले म्हणे ..पण -- ते जर नेताजीच असतील तर ते अज्ञातवासात का राहीले असावेत ? आणि त्यांच्या डायर्‍या आणि फोटो एखाद्या व्यक्तीकडे असणे म्हणजे ते नेताजी असल्याचा पुरावा होउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 10/16/2008 - 10:16 नवीन
नेताजी हयात असले काय आणि नसले काय असा काय फरक पडतो. पन्नास वर्षे एखादा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहु शकतो यावर विष्वास बसत नाही
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/16/2008 - 10:31 नवीन
>>पन्नास वर्षे एखादा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहु शकतो यावर विष्वास बसत नाही सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/16/2008 - 10:55 नवीन
नेताजींसारखा माणूस खरेच इतके दिवस अज्ञातवासात नसता राहीला. कारण चीनचे आक्रमण बघून खरेच संतापून उठला असता. परत 'आझाद हिंद' घेऊन शत्रूवर तुटून पडला असता. त्यामुळे नेताजी विमानअपघातून वाचले असतीलही पण भारताबाहेरच कुठेतरी राहीले असतील असे वाटते. अवांतर: ते लोक विज्ञानात नवीन शोध लावतात आणि आम्ही इतिहासात :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सागर गुरुवार, 10/16/2008 - 10:48 नवीन
पन्नास वर्षे एखादा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहु शकतो यावर विष्वास बसत नाही १००% सहमत नेताजीं सारखा कट्टर देशभक्त अज्ञातवासात राहीन ते ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर. अशक्यच.... (देशभक्त) - सागर
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/16/2008 - 10:54 नवीन
पुर्ण बातमी येथे आहे ! - दुवा जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/16/2008 - 12:04 नवीन
उन्होंने बताया सुभाषचंद्र बोस साढ़े सात वर्ष बस्ती जिले में, ढाई वर्ष अयोध्या में तथा तीन वर्ष सिविल लाइन फैजाबाद में रहे। आजादी के बाद नेताजी के छिपे रहने के बारे में पूछे जाने पर उन्होंने बताया कि ब्रिटिश शासन से देश की आजादी के मौके पर दो इकरारनामे हुए थे जिसमें भारत पाकिस्तान का बंटवारा और नेताजी को जिंदा या मुर्दा ब्रिटेन को सौंपना शामिल था। यह अनुबंध 2002 तक लागू रहा। हे कारण असू शकेल. आपल्या हरामखोर नेत्यांनी त्यांना इंग्रजांच्या हाती दिलंही असतं.
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 10/16/2008 - 12:49 नवीन
गांधी-नेहरूंमुळे स्वराज्य मिळाले हे सारखे बिंबवल्यामुळे अनेकांना तसेच खरे वाटते (दे दी हमे आझादी बीना खड्ग बीना ढाल...). तसेच काहीसे नेताजींच्या अपघातातून वाचणे नसेल ना असे देखील वाटते. ....नेताजी को जिंदा या मुर्दा ब्रिटेन को सौंपना शामिल था। यह अनुबंध 2002 तक लागू रहा। नेहरू तसे करू शकले असते इतपत मान्य (अमेरिकेत / मेक्सिकोतरहाणार्‍या क्रांतिकारी पांडूरंग सदाशिव खानखोजे यांना स्वातंत्र्यानंतर "वाँटेडःम्हणून अटक करून परत पाठवले होतेच!). तरी देखील असा करार झाला असता तर तो एकट्या नेहरू-गांधींबरोबर होऊ शकला नसता. तसेच, जर तो करार नेताजींना माहीती होता (म्हणून ते बाहेर आले नाहीत) तर तो इतरांना पण माहीती असला पाहीजेच. जरा तर्कच लढवायचे असतील तर असे म्हणता येईल की: (पूर्णपणे तर्क याला कुठलाही संदर्भ नाही!) "नेताजी दुसर्‍या महायुद्धात हिटलर, जपान आदी फॅसिस्टांच्या बाजूने होते." अर्थातच महायुद्धानंतर आंतर्राष्ट्रीय बंधनांप्रमाणे त्यांना नाझी समजून वाँटेड केले असले तर आश्चर्य वाटायला नको. त्यात मग त्यांनी जर काही गुप्त समझौता करून आपल्या हाताखालील सैन्याला आपल्या अज्ञातवासाच्या मोबदल्यात मोकळे केले असले तर वरील मुद्दा लागू ठरतो..."
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 10/16/2008 - 14:44 नवीन
माझ्या माहीतीनुसार दुसर्‍या महायुद्धान॑तर ब्रिटिशा॑नी 'युद्धखोर' ठरविलेल्या लोका॑ची जी यादी होती त्यात नेताजी॑चे नाव होते. मी आजही जालावर थोडेफार शोधले पण अचूक माहीती मिळत नाही. खालील बातमीही वाचावी http://www.indianexpress.com/res/web/pIe/ie/daily/19990721/ige21014.html गोबेल्स डायरीत नेताजी॑ना ब्रिटिशा॑नीच ठार मारले असा उल्लेख आहे. सत्य कधीच बाहेर येणार नाही असे मला वाटते. एकतर खूपच जुनी गोष्ट आहे व कदाचित ते सत्य फारच जहाल असू शकते म्हणून जाणूनबुजून पुरावे नष्ट केले असतील.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 10/16/2008 - 23:21 नवीन
काही मुद्दे...
  • नेताजींच्या अस्थींची डिएनए चाचणी अद्यापपर्यंत केलेली नाही...(त्यांच्याच आहेत ना त्या अस्थी?)
  • अद्यापपर्यंत डझनावर संशेधकांनी त्यांचे गुप्त अहवाल सरकारला दिले. एकदाही एकही अहवाल गुलदस्त्यातून बाहेर आला नाही. म्हणे की जर सत्य बाहेर आले तर देशाच्या (गांधी/नेहरुंच्या?) प्रतिमेला तडा जाईल.
  • नेताजींनी जमा केलेली व खर्च न झालेली संपत्ती कुठे गेली... आठवा एक-एका शहरातून त्यांची सूवर्णतुला केली होती. असे शेकडो ठिकाणी धन जमा झाले होते. ... (विचार)... त्यांचे धन लाटण्यासाठी अपघातातून वाचल्यावर (वा अपघात न करताच) त्यांना गायब केले गेले असेल का? त्यांना गायब करणे कोणाच्या हिताचे होते?.... याचा तुटक संदर्भ महानायक वा सरदार पुस्तकात वाचल्याचे आठवते (चु भू द्या घ्या).
आपला, (साशंक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
अ
अनामिका Fri, 10/17/2008 - 09:45 नवीन
सहमत.केन्डे तुमचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत्?नेताजींच्या विमानाला अपघात झाला असेल असे धरुन चालले तरि तो का झाला आणि तो करण्यामागे कुणाचा हात होता हे पुन्हा गुलदस्त्यातच राहिले. या सगळ्या रहस्यांमुळेच नेहरु गांधी व काँग्रेस यांच्या एकुण हेतु बद्दलच संशय निर्माण होतो मनात. "अनामिका"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा