मी आणि पुस्तकं
त्यांच्या माझ्या दुराव्याची खबर
अजून आमची आपसकी बात है .
माझा सगळा क्षोभ पुरवायला बाकी बरंच काही आहे.
चार पाच मिनीटाचं हाफ लाईफ असलेले गुंते आता परवडतात.
अंग काढून घेतलं असं म्हटलं तरी यांची कुजबुज सुरु होते .
इतके सनातनी फंडे यांचे ....
घर आवरलं तेव्हा चार शब्द बोलायला हवेत म्हणून ज़रा चाळून बघीतली चार पानं तर,
धुवायला टाकलेल्या कमीजाचे खिसे उलटे करून तपासावेत बायकोने
तसेच अगदी ,
मेंदूचे कप्पे उलट सुलट करून गेले,
अगदी तंतोतंत ...
जाऊ दे फट म्हणतात तशी साली आपलीच व्हायची ब्रह्महत्या म्हणून
सरळ आंघोळीलाच गेलो .. आणि झालो मोकळा.
तशी त्यांच्या माझ्या दुराव्याची गोष्ट अजून आपसकीच आहे
💬 प्रतिसाद
(4)
प
पुंबा
गुरुवार, 08/10/2017 - 07:29
नवीन
_/\_
अप्रतिम..
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
गुरुवार, 08/10/2017 - 08:16
नवीन
नाही ......
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 08/10/2017 - 17:54
नवीन
:)
रिलेट झाली.... ही मुक्तछंदी!
- Log in or register to post comments
N
NAKSHATRA
Fri, 01/22/2021 - 03:52
नवीन
आपले लिखाण अप्रतिम आहे
- Log in or register to post comments