Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गंमत

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 08/10/2017 - 12:15
नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक, "गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !" यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली.. ..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही, "मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"

प्रतिक्रिया द्या
2335 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ए
एस गुरुवार, 08/10/2017 - 16:57 नवीन
भन्नाट कविता.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 08/10/2017 - 17:25 नवीन
मस्तच. "मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !" खुप आवडलं.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 08/11/2017 - 08:15 नवीन
सुरेख रचना! Sandy
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 08/11/2017 - 11:15 नवीन
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा