((तो मला आवडत नाही))
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते"
जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन
माझ्या अंगाशी कसाही झोंबतो
तेव्हा तो मला आवडत नाही
जेव्हा किरकोळ वादातून तो मला
हिंसकपणे Get out you bitch म्हणतो
तेव्हा तो मला आवडत नाही
माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर
मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो
तेव्हा तो मला आवडत नाही
मी एकटीच आवरून बाहेर जाताना
तो एकटक संशयानं बघतो
तेव्हा तो मला आवडत नाही
जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो
त्याला कशी जिरली हिची
असाच आसुरी आनंद होतो
तेव्हा तो मला आवडत नाही
माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं
त्याला काहीच सोयरसुतक नसतं
तेव्हा तो मला आवडत नाही
मी खपून केलेले खाण्यापिण्याचे पदार्थ नाही आवडले
तर तो माज आल्यासारखा इतस्ततः फेकून देतो
तेव्हा तो मला आवडत नाही
तो अपरात्री कामावरून आल्यावर, माझ्या गादीवर
मी अर्धवट झोपेत, माझी इच्छा नसताना त्याला हवं ते करतो
तेव्हा तर तो मला अजिबातच आवडत नाही
एवढं करुनही 'बायको माझ्याच जीवावर जगतेय
आणि मीच तिला पोसतोय' असं जेव्हा तो निर्लज्जपणे म्हणतो
तेव्हा तर तो एकेकाळी माझी आवड का होता हे मलाच कळत नाही !
💬 प्रतिसाद
(8)
व
वरुण मोहिते
Fri, 08/11/2017 - 20:45
नवीन
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sat, 08/12/2017 - 00:34
नवीन
जबऱ्या जमलंय!
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 08/12/2017 - 04:30
नवीन
विडंबन कुठलं? तुम्ही तर समाजातली विदारक वस्तुस्थितीच मांडली आहे. खूप छान!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/12/2017 - 04:53
नवीन
विषय दुसरा असता तर कविता आवडली असे ही लिहीता आले असते.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Sat, 08/12/2017 - 08:39
नवीन
:-) मस्तच लिहीलयं!!!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Sat, 08/12/2017 - 14:42
नवीन
अत्यंत योग्य आशय
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/14/2017 - 12:34
नवीन
लैच भारी जमलय...!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 08/14/2017 - 14:13
नवीन
.
- Log in or register to post comments