Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"काय करता येईल?"

उ
उपयोजक
Sat, 08/12/2017 - 12:28
🗣 55 प्रतिसाद
गेल्या काही महिन्यांपासून जिथे मिपाकर आहेत असे WhatsApp,फेसबुक समुहांवर एक वाक्य हमखास ऐकू येतं,"पूर्वीचं मिपा राहिलं नाही आता!" याच विषयावर काही मिपाकरांशी बोलताना तीन मुख्य मुद्दे समोर आले ते असे. १. काही जुने वाचनीय लिहिणारे मिपाकर आता फारसे लिहित नाहीत.या लेखकांचा मिपावर दबदबा होता.त्यामुळे सकस लिखाणात थोडा कमी असणारा मिपाकर लिहिण्यापूर्वी अनेकदा विचार करायचा.आपण यांच्यासारखं दर्जेदार लिहू शकू की नाही याबद्दल धाक असायचा.तो सध्या कमी झालाय.कोणीही,कोणताही विषय आणतं मिपावर!किंवा काहीही प्रतिसाद दिला जातो.लेखनाचा दर्जा सुधारायला हवा;तसाच प्रतिसादांचाही सुधारायला हवा. आता हे जुने बौध्दीकदृष्ट्या सकस असं लिहिणारे मिपाकर सध्या का लिहित नाहीत? त्यांना काही खटकतंय का? की लिहिण्यासाठी खरंच पूर्वीइतका वेळ नाहीये त्यांच्याकडे?त्यांनी कृपया इथे व्यक्त व्हावं. किंवा नवीन लेखकांच्या लेखनाचा दर्जा उंचावण्यासाठी मिपा जे प्रयत्न करतं आहे ते कुठे कमी पडताहेत का? २. मिपाचं डिझाईन बदललंय.पूर्वी प्रत्येक नवीन धाग्याचं संपूर्ण शीर्षक वेबपेजवर दिसायचं.आता तसं होत नाही.यात वेळ जातो.हे स्वरुप थोडं किचकट वाटतं. पूर्वीचंच सुटसुटीत डिझाईन परत नाही का ठेवता येणार? काय हरकत आहे? ३. काही वेळा अकारण ट्रोलिंग किंवा कंपुबाजी होते.(यामुळे कदाचित नवीन चांगले लेखक मिपाकर अव्यक्त राहू शकतात.)अर्थात ती इतर मराठी संस्थळांवरही कमी- अधिक प्रमाणात होतच असते.पण त्यामुळे इथल्या ट्रोलिंग किंवा कंपुबाजीचा प्रश्न निकालात किमान कमी नाही होऊ शकणार.त्यासाठी इतर संस्थळांचा विचार न करता मिपावर असं होऊ नये म्हणून काय करता येईल? WhatsApp किंवा अशाच सोशल ग्रुप्सवर मिपाकर गप्पा मारतात,चर्चा करतात.मग त्यांना इकडे यायला वेळच मिळत नाही.लिहिणं होत नाही.सगळं तिथेच बोलून घेतात.असाही एक मतप्रवाह आहे. तर इथे सांगायला आवडेल की वरील विषयाची चर्चा आधी अशाच एका समुहात झालेली आहे.बरेच मिपाकर तिथे आहेत.त्या चर्चेतूनच हा धागा बनवला आहे. तर एकंदरीत मिपाचा पूर्वीचा किंबहुना शक्य झाल्यास त्याहूनही अधिक चांगला स्तर,दर्जा निर्माण करण्यासाठी काय करता येईल,काय उपाय करता येतील यावर चर्चा अपेक्षित आहे. हे सगळं तुम्ही का करताय? मिपाची काळजी घ्यायला मिपाचे चालक,मालक,संपादक मंडळ समर्थ आहे.तुम्ही का काळजी करताय मिपाची? मिपा जसं आहे तसं पुढे जाईल.मिपाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.असंही विचारलं जाऊ शकतं. पण मग याला विलंब का लागतो आहे?कि जे आहे जसं आहे तसं स्विकारत पुढे जायचंय? सगळेच काही उत्तम लेखक होऊ शकत नाहीत.पण आताशा मिपावर हे चांगल्या लेखकांचं प्रमाण खुपच कमी झालंय.ही चिंतेची बाब नाही का? सामान्य मिपाकराने ही चिंता व्यक्त करावी की नाही? तेवढा अधिकार सामान्य मिपाकराला असावा की नाही? धाग्यावर वरील समस्यांच्या उपायांबद्दल चर्चा अपेक्षित आहे. याच समस्या परत वेगळ्या शब्दांत मांडून धागा भरकटवू नये ही विनंती!
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
12926 वाचन

💬 प्रतिसाद (55)
प
पैसा Tue, 08/15/2017 - 07:20 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
झ
झेन Mon, 08/14/2017 - 13:12 नवीन
या धाग्यावर प्रतिसाद देताना सुध्दा अनेकांनी कीती सकारात्मक सूचना दिल्या आहेत. त्यासाठी मिपावर यावसं वाटतं.
प
प्रसाद_१९८२ Mon, 08/14/2017 - 13:12 नवीन
पुर्वी मिपावर खालील उत्तर दिले जायचे Image removed.
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/15/2017 - 10:29 नवीन
एकदा तुमचे लिखाण मिपावर प्रकाशित केले की त्याला बऱ्या वाईट प्रतिक्रिया येणारच. जर विरुद्ध प्रतिक्रिया नको असतील तर लेख टाकताना लेखकाने तसा डिस्क्लेमर टाकावा म्हणजे लेख न आवडल्यास विरोधी प्रतिक्रिया येणार नाहीत आणि वाद देखील होणार नाहीत. हे लिहिण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कलादालन विभागात एक धागा आला होता ज्यात नाही आवडले तरी सांगा, त्यातूनही शिकायलाच मिळेल असे लेखिकेनेच लिहिलेले होते. त्या धाग्यावर संक्षीनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला होता ज्यात त्यांना काय आवडले नाही व ते कशाकरिता हे योग्य शब्दात नमूद केले होते. पण धागालेखक व अन्य काही सदस्य संक्षींवर तुटून पडले. नाही आवडले तरी सांगा, त्यातूनही शिकायलाच मिळेल असे लिहायचे पण प्रत्यक्षात तसे कुणी योग्य शब्दात सांगितले तरी त्या सदस्यांवर तुटून पडायचे हे आवडले नाही. माझे तर वैयक्तिक मत आहे की जर तुम्हाला एक लेखक किंवा कलाकार म्हणून प्रगती करायची असेल तर विरोधी प्रतिक्रियांतून जास्त शिकायला मिळते. सगळ्यांनी छान छान, मस्त मस्त म्हटले की नकळत आपण स्वत:ला ज्ञानी मानू लागतो आणि त्यामुळे आपलीच प्रगती खुंटते.
व
विशुमित Tue, 08/15/2017 - 12:41 नवीन
"देश प्रेमी" चित्रपट टीव्ही वर चालू आहे. त्यातले हे गाणे ह्या धाग्यावर समर्पक वाटले. नफ़रत की लाठी तोड़ो, लालच का खंजर फेंको ज़िद के पीछे मत दौड़ो, तुम प्रेम के पंछी हो देश प्रेमियों, आपस में प्रेम करो देश प्रेमियों ... देखो, ये धरती, हम सब की माता है सोचो, आपस में, क्या अपना नाता है हम आपस में लड़ बैठे, हम आपस में लड़ बैठे तो देश को कौन सम्भालेगा कोई बाहर वाला अपने घर से हमें निकालेगा दीवानों होश करो, मेरे देश प्रेमियों ... मीठे, पानी में, ये ज़हर न तुम घोलो जब भी, कुछ बोलो, ये सोच के तुम बोलो भर जाता है गहरा घाव जो बनता है गोली से पर वो घाव नहीं भरता जो बना हो कड़वी बोली से तो मीठे बोल कहो, मेरे देश प्रेमियों ... तोड़ो, दीवारें, ये चार दिशाओं की रोको, मत राहें इन, मस्त हवाओं की पूरब पश्चिम उत्तर दक्खिन वालों मेरा मतलब है इस माटी से पूछो क्या भाषा क्या इसका मज़हब है फिर मुझसे बात करो, मेरे देश प्रेमियों ...
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा