Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साडी नेसणे ही आदिम ,कालबाह्य प्रथा स्त्रीयांनी बंद करावी का????

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Mon, 08/14/2017 - 16:53  ·  लेख
लेख
साडी!!! कुणी साडी म्हणतात,कुणी लुगडं ,कुणी आंग्लाळलेले सारी म्हणतात.पण प्रकार एकच.नेसण्याच्या पद्धती अनेक असल्या तरी कुठलीच पद्धत स्त्रीयांना कंमर्टेबल असेल असे वाटत नाही.नौवारी,पाचवारी,गुजराती एक ना एक अनेक नेसण्याच्या पद्धती. तर!!! विषय डोक्यात यायला कारण म्हणजे मागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो.गाडी नेली न्हवती त्यामुळे बसने प्रवास करत होतो.एका बस स्टॉपवर उभा होतो.बाजुच्या टपरीवरुन सिगारेट घेऊन ती ओढत शहरी लोकांची धावपळ बघत उभा होतो.शेजारी हालचाल जाणवली ,बघितले तर एक ललना बसची वाट बघत चलबिचल करत उभी होती.हातात मोठी पर्स होती, वैतागलेली वाटत होती याअर्थी नक्कीच कुठेतरी कामाला असणार ,तिथुन सुटल्यावर तिची घराकडे जायची घाई चालली होती. एक बस लांबुन येताना दिसली ,तशी ती थोडी पुढे होऊन लगबग करायला लागली.पुणेरी वायझेड पीएमटी वेगात येऊन फक्त थांबल्यासारखि करत निघायला लागली तशी ती ललना धावतच चढायचा प्रयत्न करण्यासाठी बसकडे झेपावली.पुढच्या क्षणाला तिचा पाय साडीत अडकून तिचा कपाळमोक्ष झाला.तिला ' उठवायचे ' निमित्त करत दोन तीन पन्नाशीचे काका लोक सरसावले.कशासाठी सरसावले हे लिहीत नाही .अश्यावेळी हात साफ करुन घेणारे आंबटशौकीन फार असतात,त्यातलेच हे होते.मी सिगरेट हातात असल्याने लांबच थांबुन हे बघत होतो.बस केव्हाचीच निघुन गेली होती.उठुन उभे राहील्यावर तिने पाणि पिले.एव्हाना माझी सिगरेट संपत आल्याने मी ती विझवली व तिच्याशी संवाद साधायला तिच्याजवळ गेलो. मी.-- लागलं का मॅडम? ती- नाही,थोडंसं हाताला लागलं मी--साडीत पाय अडकून पडलात ना? ती-- हो. मी--ड्रेस असता तर पड्ला नसतात!(ड्रेस-पंजाबी या अर्थी) ती-- हो ना, मी-- ड्रेस का वापरत नाही ? ती-- घरी चालत नाही ड्रेस घातलेलं. संवाद आता खाजगीत चालला होता ,अशावेळी मी काहीतरी निराळेच पचकतो म्हणून आवरते घेतले.माझी बस आली तसा मी बसमध्ये चढलो.मागे वळून बघितल्यावर तिने फक्त स्मित केले. मग विचार करु लागलो,कुठल्या वायझेडने पुरुषांना धोतर व बायकांना साडी हा प्रकार सुरु केला असेल.? काय आहे या पेहरावात मिरवण्यसारखे? .एक कापड ज्याला ना कसली शिलाई आहे ना आकार उकार.ते अंगावर गुंडाळुण फिरायचे.पुरुषांनी कामाचे निमित्त करुन धोतरातून सुटका करुन घेतली.पण बायका मात्र त्याच आदिम वेशभुषेला चिकटून राहील्या आहेत.न्हवे त्यांना तसे रहावे म्हणून फोर्स केले जाते. काम करणार्या स्त्रीयांनीच फक्त कंम्फर्टेबल वेशभुषा करावी असा काही दंडक नाही.घरात असणार्या स्त्रीयानीही पंजाबी अथवा तत्सम कपडे वापरले तर काय वाईट आहे.? घरात साडी नेसुन स्वयंपाक करताना पदर पेटून आजवर कीती स्त्रीया मेल्या आहेत याची तर गणतीच नाही. तर संस्थळावरील स्त्री पुरुष दोघांनीही या विषयी चर्चा केलेलि आवडेल. १.साडी नेसने हे तुम्हाला आदिम वाटते का ? २.साडीमध्ये कंम्फर्ट नसावा/ नाही असे माझे मत आहे.आपले काय मत आहे.? ३.साडीला संस्कृतीशी का जोडले जाते? म्हणजे साडि नेसणारी सुसंस्कृत व इतर वेशभुषा करणारी स्त्री ही बदफैली वा चालू असते!! (पंजाबि ड्रेस,जिन्स टीशर्ट कंफर्टेबल आहे स्त्रीयांसाठी असे माझे मत आहे.लेगिंग्ज मला प्रोव्होकेटीव्ह वाटतात ,त्यावर एक धागाही काढला होता.कृपया त्यावरुन विषयांतर नको)

प्रतिक्रिया द्या
15048 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 08/24/2017 - 12:06 नवीन
साडी अयोग्य, लेगिंग अयोग्य. मग तुम्हीच एखादे नवीन वस्त्र डिझाईन करा पाहू. कशी आहे कल्पना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
च
चिनार गुरुवार, 08/24/2017 - 06:12 नवीन
हो ना राव..मला तर टफीभाऊंच्या पुढच्या धाग्यची भीती वाटतेय..कदाचित ते असंही लिहितील.. "वृक्षवल्लींनी बाहेर टाकलेला प्राणवायू भीक म्हणून नाकावाटे शरीरात घेण्याची आदिम आणि कालबाह्य प्रथा मानवाने बंद करावी का? मानव याबाबतीत स्वयंपूर्ण कधी होणार?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समाधान राऊत
इ
इरसाल गुरुवार, 08/24/2017 - 12:57 नवीन
चिनार्‍या.......उं !!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा