Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मांडतो आहे नव्याने...

स — सत्यजित..., Wed, 08/16/2017 - 14:09
चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे! सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे! जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे! वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे! काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
4663 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ए
एस Wed, 08/16/2017 - 15:03 नवीन
तिसरे कडवे भारी आहे!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 08/16/2017 - 15:20 नवीन
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे! क्या बात!
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 08/16/2017 - 16:28 नवीन
फारच छान!!!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Wed, 08/16/2017 - 19:44 नवीन
एस,प्राची अश्वीनी,पलाश...प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 08/16/2017 - 21:44 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 08/17/2017 - 11:20 नवीन
धन्यवाद रुपी!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/18/2017 - 21:04 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Sat, 08/19/2017 - 05:40 नवीन
"तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!" हि ओळ मस्तच
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/24/2017 - 07:25 नवीन
काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!
क्लास...! लैच आवडली ओळ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/24/2017 - 14:22 नवीन
सत्यजित..., गझल आवडली. विशेषत: नावचं कडवं खास आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 08/24/2017 - 20:43 नवीन
अमरेंद्र,हरवलेला...प्रतिसादाबद्दल धन्यवाद! बिरुटे सर,गा.पै.जी, आपलेही मनःपूर्वक धन्यवाद! आपले प्रतिसाद पाहून-वाचून आनंद झाला!
  • Log in or register to post comments
M
mr.pandit गुरुवार, 08/31/2017 - 12:18 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 08/31/2017 - 12:32 नवीन
कविता आवडली..!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 08/31/2017 - 22:29 नवीन
पंडितजी,विशुमित धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा