Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्रिकेट

अ
अमरेंद्र बाहुबली यांनी
Wed, 08/16/2017 - 18:52  ·  लेख
लेख
क्रिकेट इंग्रज गेले पण गुलामगिरी ची सवय भारतीयांत भिनवून. याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट. बाकी जगात नाही पण भारतीय ऊपखंडात हा खेळ अगदी डोक्यावर घेतला जातो.कामधंदे सोडून क्रिकेट मँच बघत बसणारे फक्त नी फक्त भारतातच सापडणार. जगातले ईन मीन अकरा देश हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. पण भारतीयांच्या बूध्दीवर काय गारूड केलंय ह्या खेळाणे देव जाने. ह्याचा फायदा Bcci सारख्या संस्थांनी उचलुन तिथल्या अधीकार्यांनी रग्गड कमाई केली. व करताहेत. आम्हा 125 कोटी भारतीयांना आँलीम्पीक मध्ये सुवर्णपदक न मिळाल्याची, फुटबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा न भेटल्याची कोणतीच खंत नसते. पण भारत पाकिस्तान बरोबर हारला तर......हाय हाय. जसं स्वताच्या घरात कोणी मेल्यासारखं सुतंक पाळतील. बर ठीक आहे समोर पाकिस्तान होता म्हणून वाईट वाटलं वैगेरे पण ईतर खेळात पाकिस्तान सोबत हारल्यावर कसे ईतकं दुःख होत नाही??? मागे मारीया शारापोव्हा who is sachin tendulkar?? बोलल्यावरून तर कहरच झाला. समाजमाध्यमात यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहिली गेली. पण क्रिकेट ला भारतीय उपखंडा बाहेर कोणी कुत्र विचारत नाही ह्यात तीची काय चुकी???... शेवटी अतीक्रिकेट मुळे भारतात ईतर खेळांकडे दुर्लक्ष होतंय का? आणि ह्या दुर्लक्षा मुळे 125 कोटी लोकसंख्येचा भारत आँलम्पीक सारख्या जागतीक स्पर्धांमध्ये पदकं मिळवायला कमी पडतोयं का?? मीपाकरांच मत??

प्रतिक्रिया द्या
18280 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 08/19/2017 - 17:04 नवीन
बरोबर गा.पा. साहेब! आणी देशी वाहीणीवर क्रिकेट दाखवणे ही बंद व्हावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
द
दुर्गविहारी Sun, 08/20/2017 - 07:21 नवीन
अश्या रितीने क्रिकेटच्या धाग्याने अर्धशतकी मजल मारल्याबध्ध्ल अमरेंद्र बाहुबली यांनी गदा, आपलं बॅट उंचावून मि.पा.करांना धन्यवाद द्यावा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 08/20/2017 - 10:52 नवीन
हा हा हा! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
प
पगला गजोधर Sun, 08/20/2017 - 10:56 नवीन
50 निम्मित कट्टप्पाच्या टपरिवारिल 1 कटिंग देऊन अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 08/02/2024 - 13:47 नवीन
१४० कोटीच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या देशाची पदकासाठी वणवण अजूनही सुरू आहे. पदतालिकेत एक दोन कांस्य रौप्य सह भारत ४४ व्या स्थानावर आहे. ह्याला कारण फालतू खेळ क्रिकेट नी भारतीयांचे मूर्ख क्रिकेटप्रेम आहे हे अजूनही भारतातील लोकांना उमगले नाहीये.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Mon, 08/05/2024 - 15:35 नवीन
अमरेंद्र बाहुबली, या बाबतीत तुमचं बरोबर दिसतं आहे. मात्र यावर क्रिकेट हाच उपाय असू शकतो. क्रिकेटच्या प्रत्येक तिकिटावर व प्रक्षेपणाच्या प्रत्येक व्यवहारावर क्रीडाकर बसवून तो पैसा इतर खेळांच्या विकासासाठी वळवता येऊ शकेल. काय म्हणता? आपला नम्र, -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
च
चौकस२१२ Wed, 08/07/2024 - 04:33 नवीन
हे बरोबर आहे , तसे असेल हि कोणाला माहिती आहे का? पण मुळातच मैदानी खेळासाठी सरकार बरोबर जनतेत हि काहीतरी असले पाहिजे नुसते सरकार वर ओरडून काय होणार ? पोषक वातवरण सगळ्याच खेळांना सगळ्याच देशात समानतेने कसे होईल , युनाइटेड किंग्डम मध्ये फुटबॉल जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा त्यांची वसाहत म्हणून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियात किंवा कॅनडात नाही ! निसर्ग म्हणा किंवा ..... असो ... मूळ धागा कर्त्याला चर्च ऐवजी राळ उठवण्यात जास्त रस दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा
क
कॉमी Wed, 08/07/2024 - 05:52 नवीन
खेळ आनंदासाठी असतो. जर लोकांना क्रिकेट मध्ये आनंद मिळत असेल तर ते क्रिकेटच बघणार. ऑलिम्पिक मेडल नही मिळाले तर नही मिळाले. इतका त्रागा करण्यासारखे त्यात काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/07/2024 - 06:35 नवीन
लोकाना जाणून बुजून फक्त क्रिकेट दाखवलं जातं, इतर खेळातील खेळाडूंकडे सरकार लक्ष देत नाही त्यामुळेच मेडल्सची वानवा आहे. क्रिकेटर्स वर सरकार दौलतजादा करत असते पण इतर खेळाडूना लाथडले जाते, धनराज पिल्लेना सरकारने जाहीर करूनही घर दिले नव्हते, सरकारी ऑफिसमध्ये अनेक चकरा मारल्या त्यांनी. ऑलिम्पिक गाजवणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद ह्यांच्या जागी सचिन तेंडुलकर सारख्याला भारतरत्न देण्यात आला. असे भेदभाव करणारे हरा* सरकारे भारतात असतील तोपर्यंत इतर खेळात मेडल मिळवायची आशा सोडून द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
च
चौकस२१२ गुरुवार, 08/08/2024 - 02:42 नवीन
हे बरोबर आहे , तसे असेल हि कोणाला माहिती आहे का? पण मुळातच मैदानी खेळासाठी सरकार बरोबर जनतेत हि काहीतरी असले पाहिजे नुसते सरकार वर ओरडून काय होणार ? पोषक वातवरण सगळ्याच खेळांना सगळ्याच देशात समानतेने कसे होईल , युनाइटेड किंग्डम मध्ये फुटबॉल जेवढा प्रसिद्ध आहे तेवढा त्यांची वसाहत म्हणून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियात किंवा कॅनडात नाही ! निसर्ग म्हणा किंवा ..... असो ... मूळ धागा कर्त्याला चर्च ऐवजी राळ उठवण्यात जास्त रस दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा
क
कर्नलतपस्वी Mon, 08/05/2024 - 16:48 नवीन
व्वा अबा हे मात्र बाकी खरं. क्रिकेट गायरान आहे. चरायला भरपूर ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
च
चौकस२१२ Wed, 08/07/2024 - 02:43 नवीन
हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे , पण त्यात काही नवीन नाही , जसे पुण्यात दोन प्रकारचे लोक असतात एक चितळेंना त्यांचे उत्पादन ना बघता बहिषकर घालणारे आणि दुसरे चितळे जे काही विकतील त्यावर डोळे झाकून विस्वास ठेवणारे आणि घेणारे तसेच क्रिकेट बद्दल भारतात आहे , हे टोक नाही तर ते टोक काही देशात फक्त एका खेळावर सगळं नसते त्यामुळे ऋतू प्रमाणे खेळ असतो तिथे असे दिसत नाही एकूणच मैदानी खेळ या बाबत भारतात आनंदच आहे हे हि सत्य आहे ( त्याला अनेक का रणे आहेत काही योग्य काही अयोग्य ) पण म्हणून क्रिकेट चा दुस्वास करावं हे हि योग्य नाही इतर अनेक देशात हि एकाच खेलाकडे लक्ष दिले जाते उदाहरण छोटा सा कतार किंवा सौदी तिथे सॉकर / फूट बॉल / कॅनडात आईस हॉकी ( कानडा आणि युनाइटेड स्टेट्स वसली ती ब्रिटिशांमुळेच तरी तिथे क्रिकेट उगवले नाही भारत त्याचे पीक आले .. सामोआ सारखा छोटा देश रग्बी डोकयावर घेतो आई पी एल हा एक करमणुकीचा खेळ आहे (जसे प्ऑस्ट्रेल्यात पॅकर सर्कस सुरु झाली तसे ), त्यातून भारतातही उलाढाल वाढ हली तर चांगलेच आहे कि .... सरकारने कोणता खेळ जोपसण्यावर पैसे खर्च करावा हा वेगळं प्रश्न आहे हे मान्य
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा