मांजर बोक्या
#मांजर_बोक्या
लहान होतो तेव्हा आम्ही एक खेळ खेळायचो मांजर बोक्या. एखादा दादा, मामा किंवा काका सारखा व्यक्ती दोन लहान मुलांना घेऊन हा खेळ खेळायचे म्हणा, नाहीतर खेळवायचे. एक मुल समोरच्या हातात व एक दूसरे दुसऱ्या हातात, एक पुढे, एक मागे, गोल गोल फिरायची व तो खेळवनारा दादा वैगरे स्वत:भोवती फिरायचा. समोरचे मुल मांजर तर मागचे बोक्या, या बोक्याला धावून धावून ती मांजर पकडायची असे. बोक्याला वाटायचे आपण त्या मांजरीला तिच्या पेक्ष्या जास्त वेगाने धावुन सहज पकडू , परंतू त्या मांजर बोक्याचे नियंत्रण त्या मोठ्या व्यक्तीच्या हातात राहायचे त्यामुळे त्याने ठरवले तर मांजर बोक्याला सहज सापडे, नाहीतर बोक्या बिचारा गोल गोल फिरत राही पण मांजर मात्र गवसायची नाही.
आयुष्य ही असेच तर नाही ना? आपण बोक्या बनून सुखाच्या मागे धावत राहतो आणि सुख मांजर बनून पुढे पुढे पड़त राहते. आपल्याला सुख गवसु द्यायचे की नाही नियती वेळो वेळी ठरवत असावी.
सुधीर
17/8/17
प्रतिक्रिया