कॅबेज अँड क्रिस्पी नूडल पकोडा
Primary tabs
साहित्य
१ पॅक मॅग्गी नूडल्स, फक्त मसाला घालून शिजवून
१ लहान कोबी, उभा पातळ चिरून
१ कप पातीचा कांदा, चिरून
१ ढोबळी मिरची लांब चिरून
१५ ते २० लसूण पाकळ्या, बारीक चिरून
अर्धा इंच आलं, बारीक चिरून
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२ ते ३ चमचे शेझवान सॉस [आवडीनुसार कमी/जास्त)
१ चमचा काळीमिरी पावडर
अर्धी वाटी बेसन
पाव वाटी कॉर्नफ्लॉर
मीठ चवीनुसार
तळणी साठी तेल
गेले २ दिवस पाऊस पडत होता, म्हंटल नेहेमीच्या कांदा भजी पेक्षा जरा वेगळं करून पाहावं. मग हि इंडो-चायनीज भजी केली, गरम भजी आणि शेझवान सॉस कॉम्बिनेशन उत्तम झालेलं. ह्यात नूडल्स मुळे एक मस्त कुरकुरीतपणा येतो. मुलांनी आवडीने संपवली!
कृती
नूडल्स नेहेमी शिजवतो तसे शिजून घ्या. फक्त भाज्या घालू नका. नूडल्स शिजवून निथळत ठेवा. नूडल्स कात्रीने थोड्या कमी लांबीच्या कापून घ्या. एका भांड्यात नूडल्स, भाज्या, शेझवान सॉस, काळीमिरी पावडर घालून मग त्यात कॉर्नफ्लॉवर आणि लागेल तेवढं बेसन घाला. (साधारण अर्धा कप पेक्षा किंचित कमी लागतं).
मिश्रण एकजीव करून घ्या. [हे घट्टसर भिजवायचंय, लागलं तर किंचित पाणी घाला]. चवीनुसार मीठ घालून मिश्रण थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवा. कढई मध्ये तेल गरम करून, चमचा किंवा फोर्क ने भज्या तेलात सोडून, मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम भजी शेझवान/टोमॅटो सॉस सोबत खायला घ्या!
व्हॉट ऍन आयडिया सरजी!
काय तरी एक एक चीजा निघतात तुमच्या पोतडीतून, केडी!
_/\_
@काय तरी एक एक चीजा निघतात तुमच्या पोतडीतून, केडी!››› प्लस वण! केडी इज येडी!
फोटू व कृती आवडली.
तीन दिवस रिपरिपणार्या पावसात ही अशी पाकृ म्हणजे किती जीवघेणा प्रकार आहे याची कल्पना आहे काय ???!!!
तोंडाला पाणी सुटून सुटून डिहायड्रेशन व्हायला आलंय :)
:-))
हा पकोडा खाण्याऐवजी नुसता बघत बसाव वाटतय....
अहाहा!
जोपर्यंत तुम्ही काही खायला घालणार नाही !!
(असं म्हटलं तरी तुफान आहे हो पाककृती )
डॉक, जरा सवड काढून या पुण्यात....मग करू एक धम्माल कट्टा
आयतं आमंत्रण भेटतयं डॉक. मी पण येतो..
फोटू व पाकृ दोन्ही मस्त.
नेहमी प्रमाणे खूप चविष्ट दिसत आहे
वाह!
वा!
काय भन्नाट कल्पना!
फोटोबद्दल नेहमी वेगळं काय लिहिणार? खासच!
करून बघायला हवं
वाह क्या बात है.. कसल्या भन्नाट रेसेपी असतात तुमच्या
फोटो पण एकदम खतऱ्या आलाय सॉस आणि कांदयाबरोबर, टू गूड !!
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख
टेम्प्टिंग दिसतंय. पण नूडल्स भजी हे नाव वाचून पूर्वीही असा प्रश्न पडला होता की शिजवलेल्या /
कच्च्या, कशाही नूडल्स तळल्या तर किती तेल पीत असतील.