भारतीय इतिहासातले विज्ञान - प्रश्न-उत्तरे (सर्व समावेशक धागा)
गेले काही दिवस मिपावर या विषयावर चर्चा होत आहे.
विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !
डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts )
पण वरच्या चर्चातुन फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही - याचे कारण प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना आपण नीट काळजी घेत नाही. कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची असली तर एक सिरियसनेस पाहिजे आणि कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. उगाच हवेत प्रश्न विचारून आणि हातवारे करून उत्तरे देण्यात काही हशील नाही.
या विषयासंबंधी प्रश्न असणारे लोक या धाग्यावर मुद्देसूद प्रश्न विचारू शकता.
प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना घ्यायची काळजी -
१. एका प्रतिसादात एकच प्रश्न विचारावा. भरमसाठ प्रश्नाची जंत्री नको. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारावेत, सब्जेक्टिव्ह (ज्याची नेमकी उत्तरे देता येणार नाहीत) असे प्रश्न विचारू नयेत. Subjective information or writing is based on personal opinions, interpretations, points of view, emotions and judgment. Objective information or analysis is fact-based, measurable and observable.
२. उत्तरे देताना संदर्भासहित लिहावे. कोणतेही ब्रॉड स्टेटमेंट करू नये, जेवढे माहितीये तेवढेच सांगावे.
टीप - इतिहास या विषयात रस असणाऱ्यांना खालच्या वेबसाईट आवडतील.
https://www.reddit.com/r/AskHistorians/
https://history.stackexchange.com/
https://skeptics.stackexchange.com/
जुन्या /प्राचीन गोष्टी आपण विज्ञानाच्या कसोटीवर तोलून मापून पहिल्या पाहिजेतविज्ञानाच्या कसोटीवर म्हणजे फक्त आत्ता माहित असलेल्या थिअरीज आणि उपकरणे वापरून त्यावेळच्या गोष्टी सिद्ध करणे? फक्त निरीक्षणाने आणि प्रयोग करत करत खाणीतून आयर्न ओर काढून त्यापासून साधं लोखंड कसं बनवायचं याची कृती आणि मग तिथून पुढे त्यात फॉस्फरसचे प्रमाण किती असले म्हणजे ते गंजरोधक होते हे सगळं शोधून काढलं! आकाशात दिसणाऱ्या ग्रहताऱ्यांचे साध्या डोळ्यांनी फक्त निरीक्षण करून त्यांच्याविषयी एवढी माहिती गोळा केली असेल? शहराच्या बाहेर, जिथे दिव्यांचा प्रकाश नसतो, अश्या ठिकाणी गेल्यावर आकाशात तारकांचा खच दिसतो. त्यातले आपल्या सूर्यमालेतले ग्रह कोणते, नक्षत्र कोणते, सूर्याभोवती आपण फिरतो हे सर्व कसं शोधून काढलं असेल? २७ नक्षत्रांची माहिती ज्योतिष शास्त्रात खूप आधीपासून वापरली जाते. विज्ञानाच्या दृष्टीने ज्योतिष थोतांड आहे म्हणतात पण ग्रह आणि नक्षत्र तर खरे आहेतच. आता ज्या काळात प्रवासाची साधनं लिमिटेड होती त्या काळात पृथ्वी गोल आहे हे सांगायला आणि तिचा परीघ एवढा अचूक सांगायला निरीक्षणाची कुठली पद्धत वापरली असेल?कसली गडबड, हे त्या काळच्या लोकांचं उच्च स्किल आणि गणिती दृष्टी यांचं प्रतीक आहे.आता यात गडबड अशी आहे की काही शे वर्षांपूर्वी फक्त निरीक्षणातून एवढं सगळं करून दाखवणारे आणि न गंजणारे लोखंड बनवू शकणारे आपले पूर्वज होते आणि आता आपण म्हणतो साधा लोखंडी नांगराचा फाळ बनवायला विसावं शतक उजाडायला लागलं? १५००-२००० वर्षांपूर्वी जे निरीक्षणाने आणि प्रयोग करत करत साध्य केलं होतं तेच आता आपण १०० वर्षांपूर्वी केलं हे विचित्र आहे. पुराणातल्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल बोलायचं तर सुश्रुत आणि शालिहोत्र यांच्याबद्दल वाचा.शहाजहान वैज्ञानिक होता?शहाजहानने फक्त पैसे पुरवले, आराखडा करणारे आणि बांधणारे वेगळेच होते... ज्या बिचाऱ्यांचे हात तोडण्यात आले. पण तो विषय वेगळा. तर, सध्या आपण जे आपल्याला ज्ञात आहे किंवा जे सध्या माहित असलेल्या विज्ञानाने साध्य होतंय तेवढंच मानतोय. म्हणजे जमिनीवरून वाहतुकीसाठी इंधनावर चालणाऱ्या गाड्या, हवेतून जाण्यासाठी इंधनावर चालणारे विमान हेच आपण सत्य मानतोय. यापलीकडे पण प्रवासाची साधनं असतील का? टेलिपोर्टेशन चा उल्लेख आला आहेच आणि त्याची चेष्टाही करून झाली आहे. पण पुढच्या १०० वर्षात ते साध्य झालं तर? मग ज्याप्रमाणे लोखंडाचं झालं त्याचप्रमाणे असं शक्य असेल का की जी गोष्ट काही शे वर्षांपूर्वी माहित होती किंवा करता येत होती तीच मधल्या काळात माहित नव्हती आणि आता आपण परत पहिल्यापासून संशोधन करून तेच साध्य करायचा प्रयत्न करतोय? सध्या अशी एक थिअरी मांडली गेलीये की ब्लॅक होल्स ही दुसऱ्या मितीत जाणारी वोर्महोल्स असू शकतात. त्या मितीत अजून वेगळी युनिव्हर्स असू शकतात अशी शक्यता आहे. आता गम्मत बघा मल्टिव्हर्स चा उल्लेख आपल्या पुराणात बऱ्याच जागी आढळतो. कदाचित सप्तलोक म्हणल्यावर लक्षात येईल. सध्या या वोर्महोल्सचा प्रवेशद्वार म्हणून वापर करून दुसऱ्या युनिव्हर्समध्ये जाता येईल का याचा शोध चालू आहे. तुम्ही टौरेड वरून आलेल्या माणसाची गोष्ट ऐकली असेल. हा कदाचित दुसरीकडून चुकून आपल्या मितीत तर आला नसेल? माझं मत: आपल्याला माहित नसलेल्या असंख्य गोष्टी जगात आहेत. आपण आत्ताची फूटपट्टी लावून सगळं मोजायचं म्हणलं तर बऱ्याच गोष्टी कल्पनेच्या बाहेरच्या असतील. कोणतीच गोष्ट १००% खरी किंवा खोटी आपण म्हणू शकत नाही. कारण १०० वर्षांपूर्वी हातात मावणाऱ्या एका उपकरणातून जगभरात संपर्क साधता येईल या कल्पनेलाही लोकांनी मुर्खात काढलं असतं, पण तेच आता साध्य आहे. त्यामुळे असं म्हणायला वाव आहे की कदाचित त्यावेळच्या टेकनॉलॉजीचा अजून आपल्याला शोध लागला नसेल! अवांतर: नेटफ्लिक्स वर "White Rabbit Project" नावाची एक मालिका आहे. शक्य असल्यास बघा.