बाप्पाचा नैवेद्यः बेसनाच्या वड्या
Primary tabs
साहित्य-
दोन मेजरिंग कप्स बेसन,
एक मेजरिंग कप साखर,
साखरेच्या अर्धे पाणी,
पाऊण मेजरिंग कप साजूक तूप,
अर्धा मेजरिंग कप दूध,
आवडीप्रमाणे बदामकाप,
काजूचे काप,
वेलचीपूड एक टीस्पून.
कृती-
प्रथम ४ टेबलस्पून तूप व सर्व दूध घालून बेसनाला दोन्ही हातांच्या तळव्यांनी चोळून घेणे. हे मिश्रण जाड चाळणीने चाळून घेणे.
जड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत उरलेले तूप घालून बेसन परतण्यास सुरुवात करावी. सतत हलवत रहावे नाहीतर तळात बेसन करपेल.
आंच मध्यम ठेवावी. मी लहान बर्नरवर मध्यम आंच ठेवली होती.
आधी परतायला जड वाटणारे मिश्रण परतले जाईल तसतसे हलके होऊ लागेल.
रंग फार बदलू देऊ नये. खमंग वास येताच ताटात बेसन काढून गार होण्यास ठेवावे. त्याच पातेल्यात मोजून ठेवलेली साखर व पाणी घालावे.
ज्यांच्याकडे कमी गोडीची साखर मिळते त्यांनी दोन टेबलस्पून जास्त घ्यावी. आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. तो होताच वेलचीपूड व बेसन घालावे.
नीट हलवून गॅस बंद करावा.
तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण घालून वरून बदामाचे काप लावून सजवावे. दहा ते पंधरा मिनिटांनी वड्या पाडाव्यात व थंड झाल्यावर काढाव्यात.
बर्फी मऊ हवी असल्यास बेसन पाकात घातल्यावर लगेच आंच बंद करावी. खुटखुटीत वड्या हव्या असल्यास आणखी एखादा मिनिट परतावे.
.
.

मस्त दिसत आहेत वड्या! बेसन लाडूला पर्याय. आणि सुक्या मेसूरपाकापेक्षा कितीतरी चांगले.
अरे वा!मस्त दिसताहेत!
मस्तच दिसत आहेत वड्या.
आता गणपतीत करता येतील.
आहाहा... लयं भारी ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राँझा राँझा करदी वे मैं आपे राँझा होई, राँझा राँझा सद्दो नी मेनू हीर नु आखो कोई... :- Raavan
वड्या फारच छान दिसत आहेत ग रेवती,
स्वाती
क्लास्स!! खुप सुरेख दिसताहेत ग वड्या.
वाह मस्तच वड्या
रेवाक्का, खूप सुरेख आहेत ग या वड्या.. मस्त फोटो.
पाक म्हटलं की हादरतेच मी. पण आता या नक्की करून पाहीन.
मस्त, अप्रतिम फोटो...
यम्मी जाल्यात अगदी :)
झकास झाल्यात ग वड्या,रेवाक्का
वाह... मस्त, यम्मिलिशस् वड्या. फोटो देखील अप्रतिम.
एक प्रश्न - यांची चव बेसन लाडवा सारखीच लागते का?
नाही. वेगळी लागते.
मस्त!
फोटोही सुरेख आलाय.
मस्त दिसतायत वड्या.. एकदा करून बघेन मी आणि सांगेन तुला.. तो एकदा लवकर येउदे म्हणजे झालं.
मोहनथाळासारख्या वड्या दिसतायेत.
रंग व फोटो सुरेख वड्यांचा.
खुप सुरेख दिसताहेत वड्या. मेसूरपाकासारख्या
छान पा़कृ ! बेसनाच्या वड्या म्हणल्यावर माझ्या आईच्या हातच्या बेसनाच्या वड्यांची आठवण झाली !!
आगद साजूक दिसताहेत की वड्या !
बरेच दिवस शोधत होते ही पाकृ जालावर. पण नीट होत नव्हत्या. आता करून बघेन !
वा!