Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माजलेल्या बाबाची कहाणी

ब — बाजीप्रभू, Wed, 08/30/2017 - 03:02
WA वर एक पोस्ट वाचली कि, संदीप खरे यांना विनंती आहे कि, जेलमधे एकत्र आलेल्या बाबांसाठी "जमलेल्या बाबांची कहाणी" असं एखादं गाणं आहे का? ती वाचून किडे वळवळले आणि जमलेल्या बाबांऐवजी "माजलेल्या बाबांची" असं विडंबन करण्याची इच्छा झाली. कृपया बदल सुचवा म्हणजे WA वर मित्रांवर शायनिंग मारता येईल. चाल: "दमलेल्या बाबांची कहाणी" बाबारूप पाहिलेल्या त्या दोघीजणी उतरलेले ढोंग डोळा वासनेचे पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही न्याय कशी मागू कोणी सोबतीला नाही झोपेतच घेतो बाबा नवं पाखरू कुशीत निषेधाचे थर बाबा उडवी ठुशीत सांगायची आहे माझी वेदना तूला माजलेल्या बाबाची ही कहाणी तूला… ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना आटपाट नगरात भक्ती चाले भारी छानछोकी बाबा करी दासजीवा वरी रोज सकाळीस बाबा भजनात बोले गोष्ट सांगायचे स्वतः नर्मदेचे गोटे कळलेच नाही जाणे गुफेतील जरी होऊ सावधान राहू आपल्याच घरी प्रधानाच्या गावामधे मारू गुप्त फेरी खऱ्या खुऱ्या न्यायासाठी कष्ट थोडे जरी घालेन मी बाबाच्या या हाथात बेड्या माजलेल्या बाबाची ही कहाणी तूला… ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना आता गेला आहे बाबा पुरता अडकून हल्ली त्याला कोठडीत पाहते दुरून असा कसा न्याय देव लेकराला देतो वर्ष वर्ष जातो आणि उशिरानं येतो बालपण गेले माझे गुज निसटून सुटे काय बाबा आता वरच्या कोर्टात? बाबावर आता लोकं रकाने लिहितील आठवेल का गं माझ्या वेदना कुणा? नामशेष होईल का ही बाबांची जमात? आता तरी साक्षर होवो आपला समाज माजलेल्या बाबाची ही कहाणी तूला… ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना

प्रतिक्रिया द्या
2421 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ध
धर्मराजमुटके Wed, 08/30/2017 - 09:18 नवीन
मस्त ! आवडले !
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 08/30/2017 - 09:39 नवीन
+१ आवडले ..!! बालपण गेले माझे गुज निसटून सुटे काय बाबा आता वरच्या कोर्टात? बाबावर आता लोकं रकाने लिहितील आठवेल का गं माझ्या वेदना कुणा? नामशेष होईल का ही बाबांची जमात? आता तरी साक्षर होवो आपला समाज
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 08/30/2017 - 10:15 नवीन
जबरदस्त जमलंय.. व्हॉट्सॅपवर फिरू लागेल ही पोस्ट काही दिवसात..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा